Shrinking water levels at Pavana Dam highlight growing water scarcity concerns in Pune region saam tv
मुंबई/पुणे

Dam Water Level: पुणेकरांची चिंता वाढली! पवना धरणात २४ टक्के पाणी, इतर धरणांची स्थिती काय? ताजी आकडेवारी आली समोर

Pavana Dam Current Water Level June 2026: मावळमधील पवना, कासारसाई आणि आंध्रा धरणातील पाणीसाठा मोठ्या प्रमाणात घटला आहे. पाऊस उशिरा आल्यास पुणे आणि पिंपरी-चिंचवड परिसरात पाणी टंचाई निर्माण होण्याची शक्यता प्रशासनाने व्यक्त केली आहे.

Omkar Sonawane

दिलीप कांबळे, साम टीव्ही

पुणे: मावळवासीयांची जीवनवाहिनी आणि पिंपरी-चिंचवडला पाणीपुरवठा करणाऱ्या पवना धरणात सध्या केवळ २४.०७ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. कडक उन्हाळ्यामुळे धरणातील पाण्याचे मोठ्या प्रमाणावर बाष्पीभवन होत असून पाणीपातळी सातत्याने कमी होत आहे. हा पाणीसाठा जून अखेरपर्यंत पुरेल, असा अंदाज पवना पाटबंधारे विभागाने व्यक्त केला आहे. मात्र वेळेत पाऊस न झाल्यास नागरिकांना पाणीटंचाईला सामोरे जावे लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे पाटबंधारे विभागाने नागरिकांना पाणी जपून वापरण्याचे आवाहन केले आहे.

कासारसाई धरणात २७.१५ टक्केच पाणीसाठा; पाणी जपून वापरण्याचे आवाहन

मावळ आणि मुळशी तालुक्यातील दहा गावांना सिंचन व पाणीपुरवठा करणाऱ्या कासारसाई धरणात सध्या केवळ २७.१५ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. मान्सून लांबणीवर पडण्याची शक्यता लक्षात घेता पाणीटंचाई उद्भवू नये यासाठी धरण प्रशासनाने दक्षता घेतली आहे. शेतकरी, कारखानदार तसेच दहा गावांतील नागरिकांनी पाणी काटकसरीने वापरावे, असे आवाहन कासारसाई पाटबंधारे विभागाने केले आहे.

आंध्रा धरणात ३३.३८ टक्के पाणीसाठा; जूनअखेरपर्यंत पुरेल

मावळ तालुक्यातील महत्त्वाच्या आंध्रा धरणात सध्या ३३.३८ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. हे धरण तळेगाव-आंबी एमआयडीसी, मावळातील काही गावे आणि पिंपरी-चिंचवडच्या काही भागांना पाणीपुरवठा करते. धरणातील पाणी पुढे इंद्रायणी नदीला येऊन मिळते. सध्याचा साठा जूनअखेरपर्यंत पुरेल असा अंदाज असला तरी, वेळेत पाऊस न झाल्यास पाणीटंचाई निर्माण होऊ शकते. त्यामुळे आंध्रा पाटबंधारे विभागाने नागरिकांना पाणी जपून वापरण्याचे आवाहन केले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

PF खात्याची संपूर्ण माहिती आता WhatsApp वर! ही प्रोसेस करा फॉलो अन् मिळवा PF Balance, Claim Status आणि KYC ची माहिती

Wednesday Horoscope : पैसा, धनलाभ आणि प्रगतीचा योग! ‘या’ ७ राशींवर लक्ष्मीची कृपा, वाचा बुधवारचे राशीभविष्य

Maharashtra News Live Update: राज्यातील अनेक तालुक्यात दुष्काळजन्य परिस्थिती

Maharashtra Rain : २ दिवस राज्यात या भागात मुसळधार पावसाचा अंदाज, तुमच्या जिल्ह्यात कसं असेल हवामान?

Manoj Jarange : मनोज जरांगे मुंबईकडे रवाना, CM देवेंद्र फडणवीस परवानगीबाबत स्पष्टच बोलले, पाहा व्हिडिओ

SCROLL FOR NEXT