सध्या देशासह राज्यात मतदार याद्यांचे विशेष सखोल पुनरीक्षण म्हणजेच SIR 2026 प्रक्रिया सुरू आहे. या प्रक्रियेत मतदारांची माहिती पडताळून अद्ययावत केली जाते. फॉर्म भरण्याची मुदत वाढवण्यात आल्यामुळे अनेक नागरिक अर्ज भरताना दिसत आहेत. मात्र, याच दरम्यान सोशल मीडियावर एक मेसेज मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या मेसेजमध्ये असा दावा केला जातोय की, SIR अंतर्गत अर्ज भरल्यास 16 हजार रुपये मिळणार आहेत.
हा व्हिडिओ आता व्हायरल होत असून, SIR चा फॉर्म भरल्यास 16 हजार रुपये मिळणार आहे, असा मेसेज व्हायरल करण्यात आलाय. मतदार याद्यांचे विशेष सखोल पुनरीक्षण (SIR) ही भारत निवडणूक आयोगाची एक नियमित प्रशासकीय प्रक्रिया आहे. यामध्ये मतदार यादीतील नावे तपासणे, दुरुस्त करणे आणि अद्ययावत करणे हे उद्दिष्ट असते. या प्रक्रियेचा कोणत्याही प्रकारच्या आर्थिक लाभाशी काहीही संबंध नाही. म्हणजेच, SIR अंतर्गत फॉर्म भरल्यावर 16 हजार रुपये मिळतात, हा दावा दिशाभूल करणारा आणि खोटा आहे. याबाबत राज्य सरकारचे माहिती व जनसंपर्क महासंचालनालाय कार्यालयाने दिली आहे.
राज्यातील SIR प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी केंद्रीय निवडणूक आयोगाकडून मुदतवाढ देण्यात आली आहे, यासाठी शेवटची मुदत 17 ऑगस्टपर्यंत वाढवली आहे. ही सर्व प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर प्रारूप मतदार यादी 24 ऑगस्ट रोजी प्रसिद्ध केली जाणार आहे. सर्व प्रक्रियेनंतर महाराष्ट्राची अंतिम मतदार यादी 27 ऑक्टोबर रोजी प्रसिद्ध करण्यात येणार आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.