Tukaram Mundhe Saam tv
मुंबई/पुणे

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढेंची दूध भेसळ प्रकरणी मोठी कारवाई; राज्यव्यापी रॅकेटचा पर्दाफाश, १३ आरोपी अटकेत

Maharashtra Fake Milk Racket: तुकाराम मुंढे यांनी मोठी कारवाई केली. त्यांनी राज्यव्यापी दूध भेसळ रॅकेटचा पर्दाफाश केला. या प्रकरणी १३ जणांना अटक करण्यात आली.

Priya More
  • महाराष्ट्रातील कृत्रिम दूध पुरवठ्याच्या मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश

  • एफडीए आणि पोलिसांनी संयुक्त कारवाई

  • या प्रकरणात आतापर्यंत १३ आरोपींना अटक करण्यात आली

  • तुकाराम मुंढे यांची आतापर्यंतची सर्वात मोठी कारवाई

संजय गडदे, मुंबई

महाराष्ट्रात कृत्रिम व रासायनिक पद्धतीने तयार केलेल्या दूध पुरवठ्याच्या मोठ्या रॅकेटचा अन्न व औषध प्रशासन (FDA) आणि पोलिसांनी संयुक्त कारवाईत पर्दाफाश केला आहे. ही राज्यातील दूध भेसळप्रकरणातील आतापर्यंतची सर्वात मोठी कारवाई असल्याची माहिती एफडीए आयुक्त तुकाराम मुंढे यांनी पत्रकार परिषदेत दिली.

तुकाराम मुंढे यांनी सांगितले की, या कारवाईसाठी जवळपास महिनाभर गुप्त माहिती संकलित करून पडताळणी करण्यात आली. एका माहितीदाराकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे संपूर्ण रॅकेटवर पाळत ठेवण्यात आली होती. आरोपींना रंगेहाथ पकडण्यासाठी योग्य संधीची वाट पाहण्यात आली आणि त्यानंतर संयुक्त कारवाई करण्यात आली. या कारवाईत पोलिसांची मदत घेण्यात आली असून, वरिष्ठ अधिकारी सदानंद दाते आणि संदीप गिल यांच्या मार्गदर्शनाखाली तपास करण्यात आला. कारण या प्रकरणात केवळ अन्न सुरक्षा कायद्याचे उल्लंघन नव्हे, तर गंभीर फौजदारी गुन्ह्यांचाही समावेश असल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे.

मुख्य सूत्रधार सुशांत हिंगे हा मंचर येथून हे रॅकेट चालवत असल्याचे निष्पन्न झाले असून त्याला अटक करण्यात आली आहे. तसेच संदीप लोढा हा त्याचा सल्लागार व भागीदार असल्याचेही तपासात स्पष्ट झाले आहे. दोघेही या रॅकेटचे प्रमुख भागीदार असल्याचे पुरावे तपास यंत्रणेला मिळाले आहेत. प्राथमिक तपासानुसार हे रॅकेट पुणे, सोलापूर, जालना, ठाणे, जळगाव आणि धाराशिव या जिल्ह्यांमध्ये कार्यरत होते. कृत्रिम दूध तयार करून ते संकलन केंद्रांमार्फत डेअऱ्यांपर्यंत पोहोचवले जात होते. या साखळीत काही शेतकरी, दूध संकलन चालक आणि किराणा दुकानदारांचाही सहभाग असल्याची माहिती समोर आली आहे.

या प्रकरणात आतापर्यंत एकूण १३ आरोपींना अटक करण्यात आली असून न्यायालयाने त्यांना ९ तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. आरोपींकडे आवश्यक परवाने नसल्याचेही तपासात उघड झाले असून, कृत्रिम दूध तयार करण्यासाठी लागणारे साहित्य विविध जिल्ह्यांतून खरेदी करण्यात येत होते. ४ आणि ५ तारखेच्या मध्यरात्री ही मोठी कारवाई करण्यात आली. मोठ्या प्रमाणावर रसायने व इतर साहित्य जप्त करण्यात आले असून त्याची तपासणी सुरू आहे.

मुंढ यांनी सांगितले की, अशाच प्रकारे कार्यरत असलेल्या आणखी दोन टोळ्यांची माहिती मिळाली असून त्यांच्याविरोधातही तपास सुरू आहे. संदीप लोढा याच्यावर २०२० मध्ये एफडीएने गुन्हा दाखल केला होता. त्या प्रकरणाची सद्यस्थिती आणि न्यायालयीन निकालाचीही पडताळणी करण्यात येत आहे. या प्रकरणात संबंधितांवर विविध फौजदारी कलमांखाली गुन्हे दाखल करण्यात येणार असून, आवश्यक पुरावे मिळाल्यास महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा (MCOCA) लावण्याचाही विचार केला जाईल, असे तुकाराम मुंढे यांनी स्पष्ट केले. "कारवाई शेवटच्या आरोपीपर्यंत सुरू राहील. या रॅकेटमधील प्रत्येक संबंधित व्यक्तीपर्यंत आम्ही पोहोचू," असा इशाराही त्यांनी दिला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

केतन हत्याकांडात हादरवणारा खुलासा, सिया-चेतनने आधीच केलं होतं लग्न; पोलिसांच्या हाती लागले महत्त्वाचे पुरावे

Smartphone battery: या 7 कारणांमुळे तुमचा फोन होतोय अचानक स्लो

Ladki Bahin Yojana: ₹१५०० की ३००० रूपये, लाडक्या बहिणींच्या खात्यात किती पैसे येणार? जून-जुलै हप्त्याची अपडेट समोर

Maharashtra News Live Update: नाशिक- मुसळधार पावसामुळे पहिने भिलमाळ रस्त्यावर तात्पुरत्या स्वरूपात तयार केलेला पूल वाहून गेला

पावसाळ्यात प्या आलं, लसूण आणि कोथिंबीर सूप; रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्याचा सोपा उपाय

SCROLL FOR NEXT