Shruti Vilas Kadam
दुधामध्ये प्रथिने, कार्बोहायड्रेट्स आणि नैसर्गिक फॅट्स असतात. त्यामुळे दिवसाची सुरुवात ऊर्जेने होते आणि दीर्घकाळ पोट भरल्यासारखे वाटते.
पावसाळ्यात संसर्गाचा धोका वाढतो. दुधातील व्हिटॅमिन्स, मिनरल्स आणि प्रथिने शरीराची प्रतिकारशक्ती टिकवून ठेवण्यास मदत करतात.
दूध हे कॅल्शियम आणि व्हिटॅमिन Dचा चांगला स्रोत आहे. नियमित सेवन केल्याने हाडे आणि दात मजबूत राहण्यास मदत होते.
दुधातील उच्च दर्जाची प्रथिने स्नायूंची झीज कमी करण्यास आणि त्यांच्या दुरुस्तीस मदत करतात. व्यायाम करणाऱ्यांसाठीही ते उपयुक्त ठरते.
मर्यादित प्रमाणात कोमट दूध नाश्त्यासोबत घेतल्यास पचनक्रियेला मदत होऊ शकते. मात्र, ज्यांना लॅक्टोज असहिष्णुता आहे त्यांनी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
दुधामध्ये कॅल्शियम, फॉस्फरस, व्हिटॅमिन B12, पोटॅशियम आणि प्रथिने भरपूर प्रमाणात असतात. त्यामुळे शरीराला आवश्यक पोषण मिळण्यास मदत होते.
दूध फळे, ओट्स, पोहे, उपमा किंवा इतर पौष्टिक नाश्त्यासोबत घेतल्यास आहार अधिक संतुलित आणि पौष्टिक बनतो.