IAS तुकाराम मुंढे यांच्या धडक कारवाईचा धसका; तस्करांकडून गुटखा पकडण्यासाठी गेलेल्या पथकावर जीवघेणा हल्ला

ias tukaram mundhe news : IAS तुकाराम मुंढे यांच्या धडक कारवाईचा धसका बसल्याचे दिसत आहे. तस्करांनी थेट सरकारी अधिकाऱ्यांवर हल्ला केल्याचा समोर आलं आहे.
FDA department
FDA Saam tv
Published On
Summary

सनदी अधिकारी मुंढे यांच्या कारवाईचा धसका

तस्कारांकडून सरकारी अधिकाऱ्यांवर हल्ला

विभागाच्या पथकावर तस्करांकडून गाडी घालण्याचा प्रयत्न

संजय गडदे, साम टीव्ही

तुकाराम मुंढे यांच्या धडक कारवाईचा धसका तस्करांना बसला आहे. अन्न व औषध प्रशासनाच्या प्रतिबंधित गुटखा आणि पानमसाला तस्करीविरोधातील धडक मोहिमेमुळे तस्करांमध्ये खळबळ उडाली आहे. या कारवाईसाठी गेलेल्या अधिकाऱ्यांच्या पथकावरच जीवघेणा हल्ला झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

अन्न सुरक्षा अधिकारी प्रज्ञा सुरसे, सहायक आयुक्त विवेक पाटील, अन्न सुरक्षा अधिकारी फरिद सिद्दीकी आणि नमुना सहाय्यक अमोल कांबळे हे गोपनीय माहितीच्या आधारे ८ जूनच्या मध्यरात्री गंगापूर तालुक्यातील रहिमपूर येथे कारवाईसाठी पोहोचले होते. तेथे एका टेम्पोमध्ये मोठ्या प्रमाणात प्रतिबंधित अन्नपदार्थ असल्याचे आढळून आले.

FDA department
Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे ॲक्शन मोडमध्ये! राज्यभर आयुर्वेदीक केंद्रांवर FDA ची कारवाई; नामांकित कंपनीचा औषधसाठा जप्त

पथकाने टेम्पो ताब्यात घेतल्यानंतर काही दुचाकी आणि चारचाकी वाहनांमधील संशयित त्यांच्यावर पाळत ठेवत असल्याचे अधिकाऱ्यांच्या लक्षात आले. परिस्थिती गंभीर वाटल्याने त्यांनी वाळूज पोलिसांना मदतीसाठी संपर्क साधला.

काळ्या रंगाच्या कारमधून आलेल्या काही जणांनी अधिकाऱ्यांना शिवीगाळ करत "गोळ्या घाला" अशी धमकी दिली. त्यानंतर कार चालकाने वाहन थेट अधिकाऱ्यांच्या अंगावर घालण्याचा प्रयत्न केला. अधिकारी जीव वाचवण्यासाठी वेगवेगळ्या दिशेने पळाले. अन्न सुरक्षा अधिकारी प्रज्ञा सुरसे यांना पळण्यास वेळ न मिळाल्याने कार पुन्हा त्यांच्या दिशेने वळवण्यात आल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.

या गोंधळाचा फायदा घेत एका आरोपीने प्रतिबंधित अन्नपदार्थांनी भरलेला टेम्पो पळवून नेला. त्यानंतर विविध कार आणि दुचाकीवरील संशयित घटनास्थळावरून पसार झाले. वाळूज पोलिसांनी तातडीने तपास सुरू करून दुचाकीवरून दोन संशयितांना ताब्यात घेतले. यानंतर आणखी काही संशयितांची नावे समोर आली आहेत.

FDA department
IAS अधिकारी तुकाराम मुंढेंची २१ वर्षाच्या नोकरीत २५वी बदली; प्रामाणिक मुंढेंची वारंवार का होतेय बदली?

त्यांच्याविरुद्ध सरकारी कामात अडथळा, जीवे मारण्याचा प्रयत्न, धमकी आणि संगनमताचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. अन्न सुरक्षा आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या निर्देशानुसार सुरू असलेल्या कारवायांमुळे गुटखा तस्करांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या घटनेमुळे प्रशासन आणि तस्करांमधील संघर्ष पुन्हा एकदा समोर आला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com