Tukaram Mundhe: तुकाराम मुंढेंच्या बदलीसाठी 250 कोटी जमा? पाहा नेमकं प्रकरण काय?

IAS OFFICER TUKARAM MUNDHE: आयएएस अधिकारी आणि एफडीएचे आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या बदलीसाठी ड्रग्ज माफियाचे प्रयत्न सुरू असल्याचा आरोप जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे.

एफडीएचे आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या बदलीसाठी ड्रग्ज माफियांकडून २५० कोटी रुपये गोळा करण्याचं काम सुरू असल्याचा धक्कादायक आरोप राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे. दरम्यान, याबाबत आपल्याला काहीही कल्पना नसल्याची प्रतिक्रिया तुकाराम मुंढेंनी दिली आहे. तुकाराम मुंढे यांच्या जीवाला धोका असल्याचे देखील जितेंद्र आव्हाड यांनी सांगितले. एफडीएचे कॅप्टन अशी तुकाराम मुंढे यांची देशभरात ओळख आहे. मुंढेंच्या बदलीबाबत जितेंद्र आव्हाड यांनी केलेल्या दाव्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

आमदार जितेंद्र आव्हाड यांनी पावसाळी अधिवशेनादरम्यान माध्यमांशी बोलताना सांगितले की, 'तुकाराम मुंढे यांना उचलण्यासाठी हे ड्रग्ज माफिया , फार्मासिटीकल माफिया २५० कोटी रुपये जमवत आहेत. हे पैसे फक्त तुकाराम मुंढे यांची विकेट काढायला जमा केले जात आहेत. मी सरकारला सांगतो की तुकाराम मुंढेंच्या जीवाचे बरं- वाईट होण्याची शक्यता नाकारता येत नाही.'

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com