Pune Budhwar Peth Crime News  Saam TV
मुंबई/पुणे

Pune News: पुणे हादरलं! बुधवारपेठेत भररस्त्यात तरुणाची गळा चिरुन हत्या; पोलीस तपासात धक्कादायक कारण आलं समोर...

Pune Crime News: पुण्यातील बुधवारपेठेतील क्रांती चौकात एका तरुणाची गळा चिरून हत्या करण्यात आली. या घटनेनं परिसरात एकच खळबळ उडाली.

Satish Daud

Pune Budhwar Peth Crime News

मागील काही दिवसांपासून पुणे शहरात गुन्हेगारीच्या घटनेत मोठी वाढ झाली आहे. किरकोळ कारणावरून खूनासारख्या गंभीर घटना घडत आहेत. आरोपींना कायद्याचा धाक राहिलाच नाही, अशीच परिस्थिती निर्माण झालीये. शुक्रवारी (९ फेब्रुवारी) पुण्यातील बुधवारपेठेतील क्रांती चौकात एका तरुणाची गळा चिरून हत्या करण्यात आली. या घटनेनं परिसरात एकच खळबळ उडाली.  (साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

याप्रकरणी फरासखाना पोलिसांनी (Police) तातडीने तपासाची चक्रे फिरवत आरोपीला अटक केली. नईम शेख असे हत्या झालेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी कलाम उर्फ रूबेल शेख याला अटक करण्यात आली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवार पेठेतील वेश्यावस्तीत पश्चिम बंगालमधील महिला राहायला आहे.

आरोपी कलाम शेख तिचा पती असून सहा महिन्यांपूर्वी महिलेने नईम शेख याच्याशी विवाह केला होता. त्यानंतर दोघेजण एकत्र राहत होते. पत्नीने दुसरा विवाह केल्याने आरोपी कलाम चिडला होता. तो पत्नीसह नईमवर पाळत ठेवून होता. (Latest Marathi News)

शुक्रवारी (९ फेब्रुवारी) सायंकाळी बुधवार पेठेतील क्रांती चौकात सागर बिल्डींगजवळ कलाम थांबला होता. काही वेळानंतर आरोपी नईम तेथे आला. त्याने खिशातून वस्तरा काढला आणि नईमच्या गळ्यावर सपासप वार केले. आरडाओरड झाल्यानंतर आरोपीने घटनास्थळावरून पळ काढला.

दरम्यान, स्थानिकांनी गंभीर जखमी झालेल्या नईमला तातडीने रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचाराआधीच त्याचा मृत्यू झाला होता. याप्रकरणी पोलिसांनी तातडीने तपासाची चक्रे फिरवत पश्चिम बंगालला पसार होण्याच्या तयारीत असलेल्या आरोपी कलामला पुणे रेल्वेस्थानकावरून अटक केली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: माजी राज्यमंत्री प्रवीण पोटे पाटील यांची भाजपच्या महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्षपदी वर्णी

8th Pay Commission: आठव्या वेतन आयोगात फिटमेंट फॅक्टर किती असणार? प्रत्येक लेव्हलसाठी पगारवाढ वेगळी होणार

Mumbai Crime: मोबाइल पाहण्यावरून कडाक्याचे भांडण, तरुणाकडून बायको अन् मुलावर काोयत्याने सपासप वार; मुंबई हादरली

Chandra Grahan: चंद्र ग्रहण असताना रंगपंचमी खेळू शकतो का? जाणून घ्या

Sambhajinagar : लाडक्या खंड्याच्या मृत्यूनंतर शेतकऱ्यानं घातलं तेरावं , बैलावरच्या प्रेमापोटी मुंडणही केलं

SCROLL FOR NEXT