Chandra Grahan: चंद्र ग्रहण असताना रंगपंचमी खेळू शकतो का? जाणून घ्या

Surabhi Jayashree Jagdish

होलिका दहन

यंदा २ मार्च रोजी होलिका दहन होणार असून ३ मार्चला चंद्रग्रहण आहे. त्यामुळे रंगपंचमी ४ मार्चला खेळली जाणार आहे. ही बदललेली तारीख ग्रहणामुळे ठरवण्यात आली आहे.

why rangpanchami will be celebrated a day after holika dahan 2026

एक दिवसाचं अंतर

साधारणपणे होळी दहनाच्या दुसऱ्या दिवशीच रंगपंचमी होळी खेळण्याची परंपरा असते. मात्र यावेळी चंद्रग्रहणामुळे एक दिवसाचा अंतर पडणार आहे. त्यामुळे अनेकजण ४ मार्चला रंगोत्सव साजरा करणार आहेत.

lunar eclipse impact on holi

धार्मिक आणि शुभ कार्य

चंद्रग्रहणाच्या काळात धार्मिक आणि शुभ कार्य टाळण्याची परंपरा आहे. त्यामुळे ३ मार्चला ग्रहणाच्या दिवशी होळी खेळावी का, असा प्रश्न अनेकांना पडतो. याबाबत धार्मिक मान्यतांनुसार काही नियम सांगण्यात आलेत.

celebration religious beliefs explained

घरात राहा

हे चंद्रग्रहण भारतात दिसणार असल्यामुळे ग्रहणकाळात घरात राहण्याचा सल्ला दिला जातो. पारंपरिक श्रद्धेनुसार या काळात वातावरणात नकारात्मक ऊर्जा एक्टिव्ह होते. त्यामुळे बाहेर जाणं टाळावं.

can we play holi during chandra grahan

ग्रहणामुळे होणार बदल

होळीच्या दिवशी लोक एकमेकांना रंग आणि गुलाल लावण्यासाठी घराबाहेर पडतात. हा सण आनंदाने आणि उत्साहात साजरा केला जातो. पण ग्रहणामुळे या परंपरेत बदल होऊ शकतो.

traditional rules india

होळी खेळणं टाळावं?

धार्मिक मान्यतांनुसार ग्रहणाच्या काळात होळी खेळणं टाळावं असं सांगितलं जातं. कारण या वेळी बाहेर फिरणे किंवा सण साजरा करणे शुभ मानले जात नाही. त्यामुळे लोकांना संयम पाळण्याचा सल्ला दिला जातो.

holika dahan and lunar eclipse

काय आहे कारण?

असं मानलं जातं की, ग्रहणातून येणाऱ्या किरणांचा आरोग्यावर विपरीत परिणाम होऊ शकतो. म्हणूनच चंद्रग्रहणाच्या काळात होळी न खेळण्याचा सल्ला दिला जातो.

festival date change details

Chhatrapati Shivaji Maharaj: छत्रपती शिवाजी महाराज दाढी का ठेवायचे? जाणून घ्या कारणं

cultural symbolism of shivaji maharaj beard
येथे क्लिक करा