फेब्रुवारी महिन्याच्या सुरुवातीलाच राज्यातील कमाल आणि किमान तापमानात मोठी वाढ झाली आहे. त्यामुळे अनेक भागातून थंडी गायब झाली असून उन्हाचा झळा बसत आहेत. त्यातच बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने देशातील अनेक राज्यांमध्ये अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. तर काही भागात गारपीट देखील होत आहे. (साम टीव्ही'चं व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
महाराष्ट्रातील विदर्भ आणि मराठवाड्यात पुढील दोन दिवसांत अवकाळी पाऊस धुमाकूळ घालणार असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला होता. हवामान खात्याचा हा अंदाज तंतोतंत खरा ठरला असून मराठवाड्यातील काही भागात पावसाच्या सरी कोसळल्या. तर विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यासह मोठी गारपीट देखील झाली. (Latest Marathi News)
शनिवारी विदर्भातील, अमरावती, यवतमाळ, वर्धा, नागपूर परिसरात हा पाऊस झाला. वर्धा जिल्ह्यातील देवळी शनिवारी दुपारी तुफान गारपीट झाली. काही भागात वीज पुरवठा सुद्धा खंडित झाल्याने शेतकऱ्यांची तारांबळ उडाली. जवळपास १५ ते २० मिनिट बोर ते लिंबाच्या स्वरूपाची गार झाल्याने शेतकऱ्यांच्या शेतातील पिकांचे अतोनात नुकसान झाले.
दरम्यान, आजपासून पुढील दोन ते तीन दिवस राज्यात हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस होईल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. जळगाव, सांगली, सोलापूर, छत्रपती संभाजीनगर, बीड, नांदेड, लातूर या भागात हलक्या स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे.
याशिवाय विदर्भातील काही भागात देखील हलक्या स्वरुपाचाच पाऊस पडण्याचा अंदाज आहे. अकोला, अमरावती, वर्धा तसेच नागपुरात वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस होईल, असंही हवामान खात्याने सांगितलं आहे. शेतकऱ्यांनी रबी हंगामातील पिकांची काळजी घ्यावी, असा सल्लाही देण्यात आला आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.