Mumbai News: मुंबईतील अमेरिकन दूतावास बॉम्बने उडवण्याची धमकी; वांद्रे-कुर्ला पोलिसांत गुन्हा दाखल

Mumbai Breaking News: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी तात्काळ सार्वजनिक रित्या माफी मागावी, अन्यथा मी अमेरिकेचा प्रत्येक दूतावास उडवून देईन, असं धमकी देणाऱ्या व्यक्तीने मेलमध्ये म्हटलं.
Mumbai bomb threat
Mumbai bomb threatSaam TV
Published On

Mumbai Latest Marathi News

मुंबईतील वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्स परिसरात असलेल्या अमेरिकेच्या वाणिज्य दूतावासाला शनिवारी (१० फेब्रुवारी) अज्ञात व्यक्तीने धमकीचा मेल पाठवला. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी तात्काळ सार्वजनिक रित्या माफी मागावी, अन्यथा मी अमेरिकेचा प्रत्येक दूतावास उडवून देईन, असं धमकी देणाऱ्या व्यक्तीने मेलमध्ये म्हटलं. (साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Mumbai bomb threat
Maharashtra Politics: आमदार संतोष बांगर 'त्या' व्हिडीओमुळे गोत्यात येणार? रोहित पवारांनी केली मोठी मागणी

या घटनेची मुंबई पोलिसांनी गंभीर दखल घेतली आहे. याप्रकरणी वांद्रे-कुर्ला पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल केला आहे. तसेच अमेरिकन दूतावासाजवळील पोलीस सुरक्षा वाढवण्यात आली आहे. हा धमकीचा मेल नेमका कुठून आला याचा तपास पोलिसांकडून केला जातोय. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. (Latest Marathi News)

मुंबईतील वांद्रे-कुर्ला परिसरात अमेरिकन दूतावासाचे कार्यालय आहे. या भागात नेहमीच नागरिकांची वर्दळ असते. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी दुपारी ३ वाजून ५० मिनिटाच्या सुमारास दूतावासाच्या कार्यालयीन मेलवर अज्ञात व्यक्तीने धमकीचा मेल पाठवला.

ईमेल पाठवणाऱ्या व्यक्तीने स्वत:ची ओळख अमेरिकन नागरिक असल्याचे सांगितले. मी फरार अमेरिकन नागरिक असून माझ्या विरोधात अमेरिकेत १९ गुन्हे आहेत. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बायडन यांनी तात्काळ सार्वजनिकरित्या माफी मागावी, अन्यथा मी अमेरिकेचा प्रत्येक दूतावास उडवून देईन. अमेरिकन नागरिकांची हत्या करण्याचा देखील माझा प्लॅन आहे, असं धमकी देणाऱ्या व्यक्तीने मेलमध्ये म्हटलं.

दरम्यान, धमकीचा ईमेल प्राप्त होताच, दूतावासातील कर्मचाऱ्यांनी तातडीने या घटनेची माहिती पोलिसांना दिली. याप्रकरणी वांद्रे-कुर्ला पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात भारतीय दंड संहिता (आयपीसी) च्या कलम ५०५(१)(बी) आणि ५०६(२) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस धमकी देणाऱ्या व्यक्तीचा शोध घेत आहेत.

Mumbai bomb threat
Nashik News : महत्त्वाची बातमी ! नाशिक पुणे सेमी हाय स्पीड रेल्वेच्या रुटमध्ये बदल; कसा असणार नवा मार्ग?

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com