Nashik News : महत्त्वाची बातमी ! नाशिक पुणे सेमी हाय स्पीड रेल्वेच्या रुटमध्ये बदल; कसा असणार नवा मार्ग?

Nashik-Pune Railway: पुणे-नाशिक दरम्यान सध्या रेल्वेमार्ग नाही. या मार्गावर सेमी हायस्पीड रेल्वेचा प्रस्ताव तयार झाला असून त्याची घोषणाही झाली होती. आता त्यासंदर्भात महत्वाचे अपडेट समोर आलीय आहे.
Nashik-Pune Railway
Nashik-Pune RailwaySaam Tv Yandex
Published On

Nashik Pune Semi High Speed ​​Railway Route :

पुणे आणि नाशिक ही दोन महत्वाची शहरे रेल्वे मार्गाने जोडली जाणार आहेत. ही दोन्ही शहरे रेल्वेने जोडण्याचा प्रस्ताव तयार केला गेला आहे. महारेलकडून या मार्गावर सेमीहायस्पीड ट्रेनचे काम सुरू करण्यात आलं आहे. दम्यान या रेल्वेचा मार्ग बदलण्यात आलाय. आज नाशिकमधील पहिले एसी मेळा बस स्थानकाचे उद्घाटन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले.(Latest News)

या उद्घाटन प्रसंगी बोलताना फडणवीसांनी याची माहिती. नाशिक-पुणे रेल्वेमार्गचा (Nashik-Pune Railway) आराखडा तयार झालाय. परंतु आधीचा रुट बदलण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली. मार्ग बदलल्याने हा मार्ग आता नाशिक-पुणे रेल्वे मार्ग लवकरच करायचा आहे, मात्र आधीचा रूट बदलून आता नाशिक-शिर्डी-पुणे (Nashik-Shirdi-Pune) असा रूट असणार असल्याचं फडणवीस यांनी सांगितले. यामुळे फक्त ३० किलोमीटर अंतर वाढणार आहे, पण ट्रेनचा (Train) स्पीड जास्त ठेवणार असल्याने लवकर पुण्यात जाता येईल.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

लवकरात लवकर या प्रकल्पाला मंत्रिमंडळाची मान्यता मिळणार असल्याचं उपमुख्यमंत्री फडणवीस म्हणाले. नाशिक पुणे रेल्वे मार्गचे अंतर २३५ किमी होतं आता मार्ग बदलल्याने यात वाढ होणार आहे. आधीच्या मार्गावर १८ असणार आहे. तसेच १९ उड्डाणपुलांची उभारणी करण्यात येणार होती परंतु मार्ग बदलण्यामुळे यात बदल होऊ शकतो. हा मार्ग सुरुवातीपासून संपूर्ण विद्युतीकरण झालेला असणार आहे.

या मार्गावरुन पहिल्या टप्प्यात ६कोचची रेल्वे धावणार आहे. त्यानंतर १२ ते १६ कोचची रेल्वे धावणार आहे. मार्गावर एकूण २० स्टेशन असणार आहेत. हा मार्ग पूर्ण झाल्यावर पुणे-नाशिक पाच ते सहा तासांचा प्रवास अवघ्या १ तास ४५ मिनिटांत पूर्ण होणार आहे. ६० टक्के इक्विटीतून हा निधी मिळणार आहे. या रेल्वे मार्गासाठी रेल्वे रुळ टाकणे आणि रेल्वे स्टेशन उभारण्यासाठी जमीन संपादन करण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. नाशिकमधील सिन्नर तालुक्यातून भूसंपादन प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.

Nashik-Pune Railway
Devendra Fadanvis: नाशिकमध्ये घोषणांचा पाऊस; काय-काय मिळणार? उपमुख्यमंत्री फडणवीसांनी वाचली विकासकामांची यादी

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com