Devendra Fadanvis: नाशिकमध्ये घोषणांचा पाऊस; काय-काय मिळणार? उपमुख्यमंत्री फडणवीसांनी वाचली विकासकामांची यादी

Fadnavis In Nashik: उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते वातानुकूलित मेळा बस स्थानकाचं उद्घाटन झालं. यावेळी फडणवीस यांच्यासह मंत्री गिरीश महाजन, छगन भुजबळ, दादा भुसे यांची उद्घाटन सोहळ्याला उपस्थित होते.
Fadnavis In Nashik
Fadnavis In NashikSaam Tv
Published On

(अभिजीत सोनवणे,नाशिक)

Devendra Fadanvis On Nashik Developmentn Project :

वातानुकूलित मेळा बस स्थानकाच उद्घाटन केल्यानंतर नाशिक शहर आणि जिल्ह्यात कशी आणि कोणती विकासकामे केली जाणार याचा पाढा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांनी वाचला. कुंभमेळासाठी निधी, रिंग रोड, नियो मेट्रो,बोइंग विमानांचा प्रकल्प अशा २०४ कोटींच्या वेगवेगळ्या ९ योजनांचं लोकार्पण आणि भूमिपूजन आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांच्या हस्ते झालं. यावेळी त्यांनी शहराला कोणत्या गोष्टी मिळणार असल्याची यादी वाचली. (Latest News)

राज्यातील पहिल्या वातानुकूलित मेळा बस स्थानकाचं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन झालं. यावेळी फडणवीस यांच्यासह मंत्री गिरीश महाजन, छगन भुजबळ, दादा भुसे यांची उद्घाटन सोहळ्याला उपस्थित होते. उद्घाटन सोहळा झाल्यानंतर आयोजित करण्यात आलेल्या सभेत फडणवीसांनी नागरिकांना संबोधित केलं. यावेळी त्यांनी उद्धव ठाकरेंना टोला लगावला.

आता उपमुख्यमंत्री असलो तरी दोन जणांना घेऊन आलोय आता आपल्याकडे बळ आणि भुजबळ पण आहेत. पहाटेच्या शपथ विधी झाली तेव्हाच भुजबळ साहेब सगळ्यांना घेऊन आले असते तर आपले दोन अडीच वर्ष वाया गेले नसते. आमच्या साठी नाशिक ही वंदनीय भूमी आहे, कारण प्रभू रामचंद्र यांचे वास्तव्य येथे होते.

२०२७ मध्ये कुंभ मेळा येतोय, मागचा कुंभ मेळा सुरळीत पार पाडण्यात आम्ही यशस्वी झालो. कुंभ मेळानिमित्त नाशिक,त्र्यंबकेश्वर आणि परिसराचा विकास करता येईल यासाठी एक समिती तयार केल्याच फडणवीस म्हणाले. कुंभमेळा साठी जितका निधी लागेल तितका निधी उपलब्ध करून देऊ. हे सरकार (Government) घरामध्ये बसून बैठका घेणारं नाही, तर जनतेमध्ये जाणारं सरकार आहे.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

आता त्यांना पोटदुखी होतेय, त्याचा बंदोबस्त पण आपण करुयात, असं म्हणत त्यांनी उद्धव ठाकरेंना (Uddhav Thackeray) टोला मारला. त्याचवेळी त्यांनी २०१९ मध्ये विरोधी बाकावर बसावं लागल्याची खंत देखील बोलून दाखवली. विरोधी बाकावर बसावं लागल्याने विकासकामे करता आली नसल्याचं फडणवीस यावेळी म्हणाले. २०१९ ला विरोधी पक्षनेते झालो नसतो, तर दत्तक पिता काय करू शकतो, हे नाशिककरांना दाखवून दिलं असतं, असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) म्हणाले.

नाशिकला मिळणार या गोष्टी

  • रिंगरोड शहरासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे, यामुळे शहराचा विकास झपाट्याने होतो.

  • नाशिकच्या रिंगरोड बाबत आजच चर्चा झाली लवकरारत लवकर यावर काम करू.

  • नाशिक पुणे रेल्वे मार्ग लवकरच करायचा आहे, मात्र आधीचा रूट बदलून आता नाशिक शिर्डी पुणे असा रूट असेल.

  • मेडिकल कॉलेजच्या कामाला देखील गती मिळणार.

यामुळे फक्त ३० किलोमीटर अंतर वाढणार आहे, पण ट्रेनचा स्पीड जास्त ठेवणार असल्याने लवकर पुण्यात जाता येईल. लवकरात लवकर या प्रकल्पाला मंत्रिमंडळाची मान्यता मिळणार असल्याचं उपमुख्यमंत्री फडणवीस म्हणाले. नाशिकची लोकसंख्या कमी असल्याने आम्ही नियो मेट्रो सुरू करण्याचा निर्णय घेतलाय. नियो मेट्रोचे देखील काम लवकर सुरू होणार आहे.

देशातील १५ शहरात नियो मेट्रो धावणार आहेत. त्यात नाशिकचा समावेश असल्याचं फडणवीस म्हणाले. संरक्षण विभागातील बोइंग विमानांचा बेंगलोरमध्ये प्रस्तावित असलेला प्रकल्प नाशिकमध्ये करण्याची विनंती बोइंगच्या अध्यक्षांना केली असून ती विनंती त्यांनी मान्य केल्याचंदेखील फडणवीस म्हणाले.

Fadnavis In Nashik
Jalyukt Shivar Mission: एल नीनोवर कशी केली मात ? जलयुक्त शिवार अभियानावर होणाऱ्या आरोपांवरून देवेंद्र फडणवीस म्हणाले...

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com