Sambhajinagar : लाडक्या खंड्याच्या मृत्यूनंतर शेतकऱ्यानं घातलं तेरावं , बैलावरच्या प्रेमापोटी मुंडणही केलं

Sambhajinagar Pachod News : छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पाचोड येथे खंड्या बैलाच्या मृत्यूनंतर शेतकऱ्याने पोटच्या मुलासारखे दहावे-तेरावे विधी करत मुंडण केले. २८ वर्षांची साथ लाभलेल्या बैलासाठी दिलेली ही भावनिक श्रद्धांजली सर्वांना हळवे करून गेली.
Sambhajinagar : लाडक्या खंड्याच्या मृत्यूनंतर शेतकऱ्यानं घातलं तेरावं , बैलावरच्या प्रेमापोटी मुंडणही केलं
Sambhajinagar Pachod NewsSaam tv
Published On
Summary
  • पाचोडमध्ये खंड्या बैलाच्या मृत्यूनंतर शेतकऱ्याने केले धार्मिक विधी

  • २८ वर्षांची साथ लाभलेल्या बैलामुळे कुटुंब भावूक

  • बैलासाठी शेतकऱ्याने मुंडण करत दिली अनोखी श्रद्धांजली

  • प्राण्यांशी असलेलं कुटुंबासारखं नातं अधोरेखित करणारी घटना

शेतकरी आणि बैलाचं नातं केवळ मालक आणि प्राणी असं नसतं, तर बैल हा शेतकऱ्याच्या कुटुंबातला सदस्यच असतो आणि याचीच अनुभूती आलीय ती छत्रपती संभाजीनगरच्या पाचोडमध्ये. एका खंड्या बैलाच्या मृत्यूनंतर शेतकऱ्यानं चक्क त्याचे सर्व विधी केलेत. खंड्याचं केवळ दहावं, तेरावं करुन शेतकरी थांबला नाही तर त्यानं बैलावरच्या प्रेमापोटी मुंडणही केल्याचं पाहायला मिळालं.

तेरा दिवसापुर्वी खंड्याचा आजारपणानं मृत्यू झालाआणि पाचोडच्या मोहन बापूराव झिने यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला. कारण तब्बल २८ वर्षांपूर्वी खंड्या लहान होता. तेव्हा झिने कुटुंबाची आर्थिक परिस्थिती प्रचंड हालाखीची होती. त्यामुळे त्यांना ऊसतोडीसाठी जावं लागायचं.

Sambhajinagar : लाडक्या खंड्याच्या मृत्यूनंतर शेतकऱ्यानं घातलं तेरावं , बैलावरच्या प्रेमापोटी मुंडणही केलं
Chennai Beach Accident : चेन्नईच्या बीचवर महाराष्ट्रातील ३ जण वाहून गेले, एका मुलीचा मृत्यू, एकजण बेपत्ता, सुदैवानं एक बचावला

पैसे नसल्यानं मोठा बैल घेणं शक्य नव्हतं. त्यावेळी लहानग्या खंड्यालाच झिनेंनी गाडीला जुंपलं आणि खंड्यानंही झिनेंना हलाकीच्या परिस्थितीतून बाहेर काढण्याची जबाबदारी स्वतःच्या खांद्यावर घेतली. त्यामुळेच त्याच्या मृत्यूनंतर झिने कुटुंबातील सदस्यांना हुंदका आवरता आला नाही.

Sambhajinagar : लाडक्या खंड्याच्या मृत्यूनंतर शेतकऱ्यानं घातलं तेरावं , बैलावरच्या प्रेमापोटी मुंडणही केलं
Dog Abuse Case : विकृतीचा कळस! तरुणाचा कुत्रीवर बलात्कार, आरोपीच्या तोंडाला काळं फासलं, चपलांचा हार घालून धिंड काढली

नातं हे केवळ कुटुंबातल्या लोकांसोबतच नसतं तर सुख दुखात साथ देणाऱ्या प्राण्यांसोबतही ते तेवढंच ताकदीचं असतं .हेच झिने कुटुंबीय आणि त्यांच्या बैलानं दाखवून दिलंय. त्यामुळे खंड्या या जगात नसला तरी झिने कुटुंबाच्या स्मृतीत तो कायम राहणार यात शंका नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com