बीडच्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ आज पुण्यामध्ये सर्वपक्षीय मोर्चा काढण्यात आला होता. या मोर्चामध्ये मराठा आंदोलक मरनोज जरांगे पाटील हे देखील सहभागी झाले होते. मनोज जरांगे पाटील यांनी यावेली माध्यामांशी संवाद साधताना अजित पवार गटाचे नेते आणि राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर टीका केली. 'धनंजय मुंडे शहाणा हो. मुख्यमंत्रीसाहेब आवरा यांना नाहीतर आम्ही थांबणार नाही,', असा इशारा दिला.
मनोज जरांगे पाटील यांनी धनंजय मुंडे यांच्यावर टीका करताना सांगितले की, 'आमचे लोकं तुला अडकवतील मुंडे. ज्या मराठ्यांनी तुला वाचवलं त्यावर पलटला तू. प्रतिमोर्चे काढले तर आम्हीं देखिल तसच उत्तर देवू. आम्ही देखील मोर्चाने उत्तर देवू. क्रूर हत्या केली राज्य यांना कुठं न्यायचं आहे. राज्यभर मराठे मोर्चे काढू. हा खून आमच्या जिव्हारी लागला आहे. आता मी थेट मुख्यमंत्र्यांना बोलणार आहे अजून नाही बोललो. तुमच्या सरकारमध्ये राहून याला जातीय तेढ निर्माण करायची आहे.'
'मुख्यमंत्र्याच्या शब्दावरती मराठे शांत आहेत. आम्हाला खूप त्रास देत आहेत हे लोकं. एकही आरोपी सुटला तर मुख्यमंत्र्यांनी मराठ्यांना धोका दिला असा संदेश जाईल. सर्वांना शिक्षा द्या. आरोपी पुण्यातच कसे सापडत आहेत हे इकडे पळून आले आहेत. मुंडेंनी हे सगळं थांबवावे. हाकेला मी कधीही विरोधक मानलं नाहीं. मी त्यांच्या कुठल्याच जातीवर बोललो नाही. मुंडे त्यांच्या नेत्यांना सांगत आहे.', असा शब्दादत धनंजय मुंडे यांच्यावर जरांगेंनी टीका केली.
दरम्यान, संतोष देशमुख हत्या प्रकरणी पोलिसांनी ४ मुख्य आरोपींपैकी ३ जणांना बेड्या ठोकल्या आहेत. तर एक आरोपी अद्याप फरार आहे. या हत्याकांड प्रकरणातील मुख्य आरोपी सुदर्शन घुले आणि सुधीर सांगळे या दोघांना ४ जानेवारीला पुण्यातून अटक करण्यात आली. पुण्यात एका व्यक्तीला भेटून पेसै घेण्यापूर्वीच पोलिसांनी त्यांना बेड्या ठोकल्या. या प्रकरणात आधीच विष्णू चाटे याला अटक करण्यात आली होती. आता कृष्णा आंधळे हा फरार असून पोलिस त्याचा शोध घेत आहेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.