Santosh Deshmukh Case Update: संतोष देशमुख प्रकरणी मोठी अपडेट! आणखी एका आरोपीच्या मुसक्या आवळल्या

Maharashtra Crime News: पकडलेले ३ आरोपी वेगवेगळ्या ३ पोलीस ठाण्यांच्या कोठडीत अटकेत असून, संतोष देशमुख हत्या प्रकरणातील नव्या तावडीत सापडलेल्या आरोपीला देखील अटक करण्यात आली आहे.
Santosh Deshmukh Case
Sarpanch Santosh Deshmukh Case AccusedSaam Tv
Published On

मस्साजोगचे माजी सरपंच संतोष देशमुख प्रकरणामुळे फक्त बीड नाही तर, संपूर्ण राज्य हादरलं. या प्रकरणाचे पडसाद संपूर्ण देशभरात उमटले. पवनचक्की उद्योजकाकडे खंडणी आणि बीडमधील संतोष देशमुख हत्या प्रकरण. यामुळे बीडमधील राजकीय वातावरण ढवळून निघालं होतं. या प्रकरणावरून आरोप प्रत्यारोप झाले. अनेक नेत्यांनी सर्वपक्षीय मोर्चा काढत आरोपीला अटक करण्यात यावी अशी मागणी केली होती. याच तपासाला आता वेग आला असून, ८ आरोपींना पकडण्यात यश आलंय. दरम्यान, कृष्णा आंधळे अद्यापही वाँटेड असून, त्याचा शोध पोलीस करीत आहेत.

संतोष देशमुख भयावह प्रकरणात हत्या, खंडणी आणि मारहाण अशी तिन्ही गुन्हे घडल्या आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संतोष देशमुख प्रकरणाचा तपास सीआयडीकडे सोपविला असून, तपासाला आता वेग आल्याची माहिती आहे. या प्रकरणातील ८ आरोपींना पकडण्यात यश आलंय. तसेच आरोपींना ३ वेगवेगळ्या पोलिस ठाण्यांच्या कोठडीत ठेवण्यात आलंय.

Santosh Deshmukh Case
Beed Crime: धक्कादायक! व्यवसायिक भागिदारांमध्ये पैशाचा वाद, पायाला कुलूप लावून ठेवलं डांबून

यातील महेश केदार, प्रतीक घुले, जयराम चाटे, विष्णू चाटे हे आरोपी गेवराई पोलिस ठाण्यात अटकेत आहेत. तर सुदर्शन घुले, सुधीर सांगळे आणि सिद्धार्थ सोनवणे यांना माजलगाव पोलिस ठाण्याच्या कोठडीत ठेवण्यात आलंय. त्याचबरोबर खंडणीच्या गुन्ह्यातील वाल्मीक कराड याला बीड शहर पोलिस ठाण्याच्या कोठडीत ठेवण्यात आलंय. दरम्यान या तिन्ही वेगवेगळ्या ठिकाणाहून आता सीआयडीच्या तपासाला वेग आल्याचं पाहायला मिळत आहे.

संतोष देशमुख प्रकरणी नवा आरोपी अटकेत

माजी सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात सिद्धार्थ सोनवणे या नवीन एका आरोपीचा समावेश झाला आहे. सिद्धार्थ याची सुदर्शन घुलेसोबत त्याची ओळख होती. ८ डिसेंबर रोजी अपहरणाचा प्लॅन आखण्यात आला. ९ डिसेंबरला सकाळपासून सिद्धार्थ सोनवणे हा संतोष देशमुख यांच्या मागावर होता. गावातून निघाल्यापासून ते केजमधून परत येईपर्यंत तो लोकेशन देत होता. त्यावरूनच सुदर्शन घुलेसह इतरांनी देशमुख यांचे अपहरण करून हत्या केली होती. या प्रकरणी सिद्धार्थ सोनवणे याला अटक करण्यात आलीय.

Santosh Deshmukh Case
Sanjay Raut on Beed Case: संतोष देशमुख प्रकरणाचा खटला बीडबाहेर चालला पाहिजे, संजय राऊतांनी उपस्थित केली शंका

कृष्णा आंधळे फरार

मात्र, संतोष देशमुख हत्या प्रकरणी आरोपी कृष्णा आंधळे अजूनही फरार असून, पोलीस त्याचा शोध घेत आहेत. संतोष देशमुख हत्या प्रकरणात त्याचाही हात असल्याची माहिती आहे. कृष्णा आंधळेची ओळख वाल्मीक कराडच्या विश्वासू विष्णू चाटे याच्याशी झाली. यातून त्याला आर्थिक आणि राजकीय व्यवहारात काम करण्याची संधी मिळाली. २०२३ साली त्याच्यावर हत्येचा प्रयत्न केल्याचा गुन्हा नोंदवण्यात आला होता. तरी त्याला अटक झाली नव्हती. संतोष देशमुख प्रकरणी तो अद्यापही पोलिसांच्या तावडीत सापडलेला नाही.

Edited by: भाग्यश्री कांबळे

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com