Sanjay Raut on Beed Case: संतोष देशमुख प्रकरणाचा खटला बीडबाहेर चालला पाहिजे, संजय राऊतांनी उपस्थित केली शंका

Sanjay Raut on CM Devendra Fadnavis: संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर वाचा फुटली, ज्यामुळे महाराष्ट्र अस्वस्थ झाला. सरकारला अनेक हत्या पचवायची सवय झालीय, असं म्हणत संजय राऊत यांनी फडणवीस सरकारवर निशाणा साधला.
Sanjay Raut on Fadnavis Government
Sanjay Raut on Fadnavis Governmentyandex
Published On

बीडमध्ये कायद्याचं राज्य नव्हतं. एक व्यक्ती सांगेल तोच कायदा, तेच प्रशासन आणि तोच न्याय. बीड जिल्ह्यानं अनेक हत्या पाहिल्या आणि पचवले. पण संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर वाचा फुटली, ज्यामुळे महाराष्ट्र अस्वस्थ झालाय. सरकारला अनेक हत्या पचवायची सवय झालीय, असं म्हणत खासदार संजय राऊत यांनी फडणवीस सरकारवर निशाणा साधला. तसंच, संतोष देशमुख प्रकरणाचा खटला बीडबाहेर चालला पाहिजे, अशी मागणीही त्यांनी केली.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस फक्त बोलत आहेत, की कुणाला सोडणार नाही. पण देवेंद्र फडणवीस यांनी आतापर्यंत किती जणांना सोडलंय आणि कसं अडकवलंय, यासाठी एक एसआयटी नेमली पाहिजे. अशा शब्दात राऊत यांनी मु्ख्यमंत्र्यांवर टीका केलीय. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आतापर्यंत किती जणांचे रक्ताचे डाग धुवून आपल्या सरकारमध्ये घेतलंय. किती जणांच्या आक्रोश आणि किंकाळ्या दाबल्या आहेत. याबाबत त्यांनी स्वत: एसआयटी नेमली पाहिजे. स्वत: रिपोर्ट घ्यायला हवं. बीडच्या हत्या प्रकरणाबाबात मुख्यमंत्री गंभीर आहेत असं कळलं आहे. कारण शेवटी महाराष्ट्राची बदनामी म्हणजेच महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांची बदनामी, असं संजय राऊत म्हणाले.

Sanjay Raut on Fadnavis Government
Sanjay Raut: लाडक्या बहि‍णींना पैसे देणार अन् भाऊ, नवऱ्यांना दारूडे करणार...; अजित पवारांच्या वक्तव्यावरून संजय राऊत संतापले

वाल्मीक कराडला अटक झाली. पण बीडमध्ये हा खटला चालवू नये. हा इतका गंभीर विषय आहे की, हा खटला बीडच्या बाहेर चालला पाहिजे अशी मागणी संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेत केली. महाराष्ट्रात इतरत्र जरी हा खटला चालला, तरी न्याय मिळण्याची शक्यता नाही. तरीही असं मी मानतो, प्रकरण न्याय प्रविष्ट आहे, आपण मुख्यमंत्र्यांवर सध्या विश्वास ठेवू, असं संजय राऊत म्हणाले. बिल क्लिंटनचं प्रकरण माहित होतं, आता बीड क्लिंटन आलं आहे. असं ही राऊत म्हणाले.

राज्याचं कलंक धुवून काढण्यासाठी आणि मुख्यमंत्री म्हणून जबाबदारीनं काम करत आहोत, हे दाखवून देण्यासाठी, मुख्यमंत्र्यांनी सत्य आणि न्यायाची बाजू घेतली पाहिजे, असं संजय राऊत म्हणाले. गुन्हेगार कितीही मोठा असो त्यांचा मित्र असो, किंवा मंत्रिमंडळात असो, याचा विचार न करता त्यांनी न्याय दिला पाहिजे, अशी मागणी संजय राऊत यांनी फडणवीस सरकारकडे केली.

Sanjay Raut on Fadnavis Government
Sanjay Shirsat: राहुल गांधी परभणीत राजकारणासाठी, सूर्यवंशी कुटुंबाशी त्यांना देणं-घेणं नाही; शिवसेनेचं प्रत्युत्तर

बीड आणि परभणी प्रकरणाबाबत उद्धव ठाकरे आमच्याशी चर्चा करीत आहेत. या प्रकरणाला राजकीय वळण मिळू नये, हा त्यांचा उद्देश आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नेमकं काय पाऊलं उचलतात, हे आम्ही पाहत आहोत. तपासाला गती मिळाली की उद्धव ठाकरे देशमुख आणि सुर्यवंशी कुटुंबाला भेटणार आहेत. असं संजय राऊत बीड आणि परभणीच्या प्रकरणावर भाष्य केलंय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com