Santosh Deshmukh Case: गाववालाच उठला सरपंचाच्या जीवावर, कराडनंतर घुले-सांगळे गजाआड

Santosh Deshmukh Murder Case: राज्यातील सर्वाधिक चर्चेत असलेल्या सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी सुदर्शन घुले आणि सुधीर सांगळेच्या पोलीसांनी मुसक्या आवळल्यात.
Santosh Deshmukh Case
Sarpanch Santosh Deshmukh Murder CaseSaam Tv
Published On

भरत मोहळकर, साम प्रितिनिधी

राज्यात गाजत असलेल्या बीडमधल्या सरपंच हत्या प्रकरणाशी संबंधित असलेल्या खंडणी प्रकरणात वाल्मिक कराडने शरणागती पत्करली. त्यानंतर हत्येच्या 25 दिवसानंतर सीआयडीने हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी सुदर्शन घुले आणि सुधीर सांगळेच्या पुण्यात मुसक्या आवळल्या आहेत. सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात आतापर्यंत 7 पैकी 6 जण गजाआड गेलेत. तर आणखी एक आरोपी कृष्णा आंधळे अजूनही फरार आहे.अटक झालेले आरोपी कोण आहेत? पाहूयात.

Santosh Deshmukh Case
Santosh Deshmukh Case : राज्यातील ग्रामपंचायती ९ जानेवारीला बंद, सरकारकडे काय केल्या मागण्या?

सरपंच हत्येत कोणाकोणाला अटक?

विष्णू चाटे

जयराम चाटे

प्रतीक घुले

महेश केदार

सुदर्शन घुले

सुधीर सांगळे

Santosh Deshmukh Case
Santosh Deshmukh Case: देशमुखांना त्रास दिला, तर धनंजय मुंडेंना रस्त्यावरून फिरू देणार नाही; मनोज जरांगेंचा थेट इशारा

तर अटकेत असलेले केवळ प्यादे असून त्यांचा आका अजूनही मोकाट असल्याचा दावा भाजप आमदार सुरेश धस यांनी केलाय. पोलिसांनी डॉ. संतोष वायभासेला पोलीसी खाक्या दाखवून तपासाची चक्र फिरवत आरोपींना अटक केली. तर मस्साजोग गावातील सिद्धार्थ सोनवणे हाच सरपंच संतोष देशमुख यांच्या जीवावर उठल्याचं समोर आलंय.. या सिद्धार्थ सोनवणेला पोलिसांनी कल्याणमधून अटक केलीय. देशमुख यांचा गाववाला असलेला सिद्धार्थ सोनवणे कोण आहे? पाहूयात.

गाववालाच उठला सरपंचाच्या जीवावर

सिद्धार्थ सोनवणे मस्साजोगचा रहिवासी

सरपंच देशमुखांच्या हालचालींवर सिद्धार्थ सोनवणेची नजर

हत्येनंतरही सिद्धार्थ सरपंचाच्या अंत्यविधीला होता

पोलीस शोधतायत हे लक्षात येताच मस्साजोगमधून पलायन

गेल्या 15 दिवसांपासून सिद्धार्थ सोनवणे मुंबईत राहत होता

सिद्धार्थ सोनवणेनं मुंबईत पाच वेगवेगळी सिम कार्ड वापरले

कल्याणमधून ऊसाच्या गाडीवर काम करताना सिद्धार्थ सोनवणेला अटक

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com