Manoj Jarange Saam tv
मुंबई/पुणे

Manoj Jarange: माझ्यामागे सामान्य मराठ्यांची शक्ती; राज ठाकरे यांच्या टीकेला मनोज जरांगे यांचं प्रतिउत्तर

Manoj Jarange: मी स्क्रिप्ट वगैरे वाचत नसतो. माणूस वाचून एवढा बोलू शकत नाही, असं प्रत्युत्तर जरांगे यांनी राज ठाकरे यांना दिलं आहे.

Vishal Gangurde

अभिजीत देशमुख

Manoj Jarange on Raj Thackeray:

मनोज जरांगे यांच्या मागे कोणीतरी आहे, असं राज ठाकरे यांनी ठाण्यात म्हटलं होतं. त्याला आता मनोज जरांगे यांनी प्रतिउत्तर दिलं आहे. 'माझ्या पाठीमागे कोणीतरी आहे हे राज ठाकरेंचं म्हणणं बरोबर आहे. माझ्यामागे सामान्य मराठ्यांची शक्ती आहे. मी स्क्रिप्ट वगैरे वाचत नसतो. माणूस वाचून एवढा बोलू शकत नाही, असं प्रत्युत्तर जरांगे यांनी राज ठाकरे यांना दिलं आहे. ते कल्याण मध्ये मराठा समाजाने आयोजित केलेल्या सभेत बोलत होते. (Latest Marathi News)

मनोज जरांगे यांची भुजबळांवर टीका

मनोज जरांगे यांनी मराठा आरक्षणासाठी राज्यभर दौरा सुरु केला आहे. मनोज जरांगे यांनी काल सोमवारी कल्याण शहरात हजेरी लावली. जरांगे यांनी कल्याणमध्ये मराठा समजाशी संवाद साधला. यावेळी मनोज जरांगे यांनी राजकीय नेत्यांवर चौफेर टीक केली. जरांगे यांनी भुजबळ यांच्या टीकेचाही खरपूस समाचार घेतला.  ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

'मी भुजबळांना संताजी धनाजी सारखा आता सगळ्या ठिकाणी दिसतोय. त्यांना वैयक्तिक विरोध नव्हता, वैचारिक विरोध होता. मात्र सुरुवात त्यांनी केली. मराठा आरक्षणाला विरोध करण्याची गरज नव्हती. त्यामुळे आता त्यांच्यावर टीका करणार, अशा शब्दात जरांगे यांनी भुजबळांवर टीकास्त्र सोडलं आहे.

फडणवीसांनी लाठीचार्जचे आदेश दिले नाहीत तर, तो माणूस कोण?

जालनातील मराठा आंदोलकांवर लाठीचार्ज करण्याचा आदेश गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिला नसल्याचा माहिती अधिकारात समोर आली आहे. त्यामुळे सरकार बनून सरकार इतकी शक्ती असणारा हा व्यक्ती कोण? त्याचा शोध मुख्यमंत्र्यांनी उपमुख्यमंत्र्यांनी घ्यावा अशी मागणी करणार असल्याचं मनोज जरांगे यांनी म्हटले आहे.

जरांगे यांची तुषार दोशी यांच्या बदलीवर प्रतिक्रिया

जालन्यातील अंतरवाली सराटीत झालेल्या आंदोलनावेळी गोळीबाराच्या घटनेनंतर जालन्याचे पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांची पुण्यात राज्य गुन्हे अन्वेषण विभागाच्या (सीआयडी) अधीक्षकपदी सोमवारी बदली करण्यात आली. त्यावर आता जरांगे पाटलांनी प्रतिक्रिया दिली आहे.

'आंदोलकांवर लाठीहल्ला करण्याचं बक्षीस त्यांना मिळालं असेल. निष्पाप जनतेवर कट रचून हल्ला केला, त्यांना बढती मिळणार असेल तर याची माहिती घेईन. त्याच्यावर न्यायालयीन चौकशी बसणार आहे. मात्र यातून कोणालाही सुट्टी मिळणार नाही, अशी प्रतिक्रिया दोषी यांच्या बदलीनंतर मनोज जरांगे यांनी दिली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटाची बैठक

Electric Car: GenZ साठी खास! 'या' आहेत टॉप ५ अफोर्डेबल लक्झरी इलेक्ट्रिक कार्स

Tomato Rassa: रोजच्या भाज्यांपासून कंटाळा आलाय? मग एकदा नक्की ट्राय करा हा झणझणीत टोमॅटो रस्सा!

Ravivar che Upay: रविवारच्या दिवशी लाल चंदनाचा हा उपाय करून पाहाच; बिघडलेली सर्व कामं होतील

Raj-Uddhav Thackeray: आता संभ्रम नको, युती होणं गरजेचं; उद्धव ठाकरेंची 'रोखठोक' भूमिका; राज काय निर्णय घेणार?

SCROLL FOR NEXT