Manasvi Choudhary
उन्हाळ्यात उष्णतेमुळे केवळ चेहऱ्याचे नाही तर ओठांचे देखील नुकसान होते. ओठांमधील ओलावा कमी होऊन ओठ कोरडे होतात.
कोरड्या ओठांमुळे उन्हाळ्यात ओठ फाटणे, ओठांमधून रक्त येणे किंवा ओठांवरची साल निघणे या समस्या उद्भवू शकतात.
कोरड्या ओठांवर तुम्ही पार्लरच्या क्रिमपेक्षा घरगुती सोप्या उपायांचा वापर करू शकता ते कोणते आहेत या वेबस्टोरीतून जाणून घेऊया.
ओठांसाठी तूप फायदेशीर आहे. रात्री झोपण्यापूर्वी ओठांना थोडे कोमट तूप लावल्यास फाटलेले ओठ एका रात्रीत मऊ होतात.
कोरड्या ओठांवरील मृत त्वचा काढण्यासाठीमध आणि साखर स्क्रब लावले जाते. मधामध्ये साखर मिसळून ओठांवर हलक्या हाताने चोळा. यामुळे ओठ नैसर्गिकरित्या गुलाबी आणि मुलायम होतात.
ओठ खूपच काळे पडले असतील, तर दुधाच्या सायीत चिमूटभर हळद मिसळून लावा. साय ओठांना मॉइश्चराईज करते, तर हळद काळेपणा दूर करण्यास मदत करते.
बीटाचा एक छोटा तुकडा ओठांवर चोळल्यास ओठांना नैसर्गिक गुलाबी होतात आणि बीटमुळे ओलावा टिकून राहतो.
खोबरेल तेलात अँटी-बॅक्टेरियल असते. कोरफड जेलमध्ये मिसळून लावल्यास उन्हामुळे होणारी ओठांची जळजळ थांबते आणि ओठ हायड्रेटेड राहतात.
येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.