Dhurandhar 2 : 'शोले'पेक्षा १०० पटीने भारी...; प्रसिद्ध दिग्दर्शक 'धुरंधर २'च्या प्रेमात, कौतुक करताना शब्दही पडले अपूरे

Dhurandhar 2 Review : प्रसिद्ध दिग्दर्शकाने रणवीर सिंगच्या 'धुरंधर २' चित्रपटाचे भरपूर कौतुक केले आहे. तसेच आदित्य धरचे दिग्दर्शन त्यांना प्रचंड आवडले आहे. पोस्टमध्ये नेमकं काय, जाणून घेऊयात.
Dhurandhar 2 Review
Dhurandhar 2saam tv
Published On
Summary

रणवीर सिंगचा 'धुरंधर २' चित्रपट 19 मार्च 2026 ला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

प्रसिद्ध दिग्दर्शक राम गोपाल वर्मा यांनी 'धुरंधर २' चा रिव्ह्यू दिला आहे.

'धुरंधर २'ने ॲडव्हान्स बुकिंगमध्येच बक्कळ कमाई केली आहे.

सध्या जगभरात फक्त 'धुरंधर २' ची चर्चा पाहायला मिळत आहे. 'धुरंधर' ने तर बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला आता पुन्हा एकदा बॉक्स ऑफिस गाजवायला 'धुरंधर २' येत आहे. 'धुरंधर 2'चा ट्रेलर पाहून प्रेक्षक चित्रपट पाहण्यासाठी प्रचंड उत्सुक असल्याचे दिसत आहे. ट्रेलरमधील रणवीर सिंगचा धमाकेदार ॲक्शन अवताराने सर्वांचे लक्ष वेधन घेतले आहे. अशात आता 'धुरंधर २' चा धमाकेदार रिव्ह्यू समोर आला आहे. प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक राम गोपाल वर्मा यांनी सोशल मीडियावर पोस्ट करून 'धुरंधर २' चा रिव्ह्यू दिला आहे. चित्रपटाचे, आदित्य धरचे भरभरून कौतुक केले आहे.

राम गोपाल वर्मा पोस्ट

"काल रात्री 'धुरंधर 2' पाहिल्यानंतर, त्याच्या सर्वच अंगाने त्याच्या प्रभावाचा विचार केला. मग ते त्याचे अपेक्षित बॉक्स ऑफिस कलेक्शन असो, प्रेक्षकांचा उत्साह असो, सामाजिक प्रभाव असो, चित्रपटाच्या पारंपरिक व्याकरणाला (cinematic grammar) दिलेले नवे वळण असो आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे त्याचा मनावर होणारा दृकश्राव्य (audio-visual) परिणाम असो, या चित्रपटाची भव्यता 'शोले' (Sholay) पेक्षाही १०० पटीने अधिक असेल. इतकेच नव्हे तर, 'मुघल-ए-आझम'पासून आजवर निर्माण झालेले सर्व महान चित्रपट यापुढे केवळ 'टीव्ही मालिकां'सारखे भासतील, हे निश्चित आहे. ही म्हणजे एका 'नव्या चित्रपट युगाचा' (New Cinematic Order) जन्मच होय आणि यापूर्वीच्या चित्रपट विश्वात जे काही अस्तित्वात होते, त्या सर्वांचा हा एक संपूर्ण अस्तच आहे.

'दिग्दर्शक' (Director) या शब्दाची सुरुवातच आता आदित्य धर यांच्या नावाने होईल आणि खुद्द स्टीव्हन स्पीलबर्ग (Steven Spielberg) व ख्रिस्तोफर नोलन (Christopher Nolan) यांच्यासारख्या दिग्गजांनीही, सध्या हाती असलेली सर्व कामे बाजूला सारून 'धुरंधर 2' चा 'पहिला दिवस, 'पहिला शो' पाहणेच अधिक शहाणपणाचे आणि हिताचे ठरेल."

'धुरंधर 2'ने ॲडव्हान्स बुकिंगमध्येच बक्कळ कमाई केली आहे. आदित्य धर दिग्दर्शित 'धुरंधर' चित्रपटा 5 डिसेंबर 2025 रिलीज झाला होता. आता 'धुरंधर 2' म्हणजे 'धुरंधर: द रिव्हेंज' चित्रपट 19 मार्च 2026 ला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. रणवीर सिंगची मुख्य भूमिका असलेल्या या स्पाय-थ्रिलरला सुरुवातीपासूनच प्रेक्षकांनी चांगला प्रतिसाद दिला. 'धुरंधर' चित्रपटात रणवीर सिंगसोबत सारा अर्जुन, सारा अर्जुन, आर. माधवन, अर्जुन रामपाल, संजय दत्त, अक्षय खन्ना हे कलाकार झळकले.

Dhurandhar 2 Review
Marathi Serial : मालिका बंद झाल्याचं कलाकारांनाच माहित नाही, अभिनेत्रीनं केला धक्कादायक खुलासा

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com