
वाघोलीतील तरुणाने शोले स्टाईल आंदोलन केले.
महसूलमंत्र्यांचे लक्ष वेधण्यासाठी टॉवरवर दोनदा चढला.
पोलिस, अग्निशामक दल आणि नागरिकांची धावपळ झाली.
घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला.
पुण्यातील वाघोलीत धक्कादायक प्रकार घडला. महसूलमंत्र्यांचं लक्ष वेधण्यासाठी एका व्यक्तीनं थेट टॉवरवर चढून शोले स्टाईल आंदोलन केलं. यावेळी त्यांनी ' आमची जागा आमच्या नावावर करून द्या, नाहीतर मी मंत्रालयाच्या टॉवरवर चढेल', असा इशाराही यावेळी त्यांनी दिला. या व्यक्तीनं केलेल्या कृतीमुळे पोलिसांची चांगलीच दमछाक उडाली. तसेच नागरिकांची करमणूक झाली. या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियात व्हायरल होत आहे.
अमोल रामदास धोत्रे (वय वर्ष ३२, रा. वाघोली), असे तरूणाचे नाव आहे. तो गावातील एका टॉवरवर चढला होता. टॉवरवर चढल्यानंतर त्याला पाहण्यासाठी गावकऱ्यांची गर्दी जमली. यामुळे काहीवेळ रस्त्यावर देखील मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी निर्माण झाली होती. तरूण टॉवरवर चढला असल्याची माहिती मिळताच पोलीस, नागरिक आणि अग्निशामक कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली.
तसेच त्याला खाली येण्यासाठी त्यांनी विनंती केली. मात्र, तरूणानं त्यांचे ऐकले नाही. कागदपत्रे दाखविण्याचा त्याचा हट्ट होता. अर्धा तासानंतर तो खाली आला. तरूणाला पोलिसांनी ठाण्यात नेले. नंतर काही वेळानंतर सोडून दिले. सोडून दिल्यानंतर तो पुन्हा टॉवरवर चढला. पोलिसांनी पुन्हा घटनास्थळी धाव घेत त्याला खाली उतरवले. सुमारे २ ते ३ तास हा सर्व प्रकार सुरू होता.
दुसऱ्यांदा तरूण वर गेल्यानंतर अग्निशामक कर्मचाऱ्यांनी टॉवरवर जाऊन त्याला खाली आणण्याचा प्रयत्न केला. हा सर्व प्रकार घडत असताना नागरिकांची करमणूक झाली. मात्र, पोलिसांची चांगलीच दमछाक उडाली.
तरूणानं टॉवरवर चढण्यामागचं कारण सांगितलं, 'आम्ही गावरान जागेत राहतो. आम्हाला आमची जागा नावावर करून पाहिजे आहे. या कारणासाठी मी टॉवरवर चढलो. महसुलमंत्र्यांकडे माझी मागणी आहे की, आमची जागा आमच्या नावावर करून द्या, नाही तर, मी मंत्रालयाच्या टॉवरवर चढेन..', असा थेट इशारा धोत्रे यांनी दिला आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.