'हा खरा 'धुरंधर' चित्रपट! बजेट 1000 कोटी, कमाई 2500 कोटी तरीही बॉक्स ऑफिसवर फ्लॉप, पण ऑस्कर जिंकले सहा

One Battle After Another Movie Oscar Award : बॉक्स ऑफिसवर फ्लॉप ठरलेला ‘वन बॅटल आफ्टर अनदर’ने ९८ व्या अकादमी पुरस्कार सोहळ्यात सर्वोत्कृष्ट चित्रपट आणि सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकासह सहा ऑस्कर पुरस्कार जिंकून आपली चमक दाखवली. हा चित्रपट तुम्ही ओटीटी प्लॅटफॉर्म JioHotstar वर पाहू शकता.
One Battle After Another  Movie Oscar Award
The film One Battle After Another won 6 Oscars at the 98th Academy Awards.
Published On
Summary
  • One Battle After Another चित्रपटाने ६ ऑस्कर जिंकले.

  • ९८ व्या Academy Awards मध्ये सर्वोत्कृष्ट चित्रपट पुरस्कार जिंकला.

  • पॉल थॉमस अँडरसन यांना सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाचा पुरस्कार मिळाला

मनोरंजनविश्वात दमदार कथा, उत्कृष्ट अभिनय आणि दर्जेदार दिग्दर्शन असलेल्या चित्रपटांची क्रेझ वाढली आहे. अशाच एका चित्रपटाने रिलीज झाल्यानंतर सोशल मीडिया आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर लोकप्रियता मिळवली आहे. आम्ही चर्चा करत आहोत, 'वन बॅटल आफ्टर अनदर' या चित्रपटाची. या चित्रपटाची कमाई आणि बजेट ऐकलं तर 'बाहुबली' आणि 'धुरंधर' चित्रपटही तुम्हाला 'पानी कम चाय' वाटतील.

'वन बॅटल आफ्टर अनदर' या चित्रपटाने रविवारी झालेल्या ९८ व्या अकादमी पुरस्कार सोहळ्यात सर्वोत्कृष्ट चित्रपटासह ६ ऑस्कर पुरस्कार जिंकले. निर्माते पॉल थॉमस अँडरसन यांना सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाचा पुरस्कार मिळाला. पुरस्कार स्वीकारताना अँडरसन म्हणाले, "मी हा चित्रपट माझ्या मुलांसाठी लिहिला आहे.

आपण या जगात गोंधळ घालून ठेवलं आहे, हे असे जग आपण मुलांना सोपवणार आहोत, त्याबद्दल त्यांची माफी मागण्यासाठी आणि त्याचबरोबर त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी हा चित्रपट बनवला आहे. पुढे भविष्यात हे मुलं अशी पिढी बनतील जी आपल्याला काहीतरी सामान्य ज्ञान आणि सभ्यता शिकवतील.

One Battle After Another  Movie Oscar Award
Dhurandhar 2: 'धुरंधर 2'मधील 'बडे साहेब' नेमकं कोण? अखेर उलगडलं; डायरेक्टरनेच केला खुलासा

दरम्यान हा चित्रपट अॅक्शन आणि थरारक दृश्यांनी परिपूर्ण आहे. २ तास ४२ मिनिटांचा हा प्रभावी आणि खिळवून ठेवणारा चित्रपट तुम्हाला शेवटपर्यंत खुर्चीवर बसवून ठेवतो. दमदार कलाकारांचा समावेश असलेल्या या चित्रपटाची कथा धक्कादायक आणि अस्वस्थ करणारी आहे. ही कथा एका बापलेकीच्या फिरते. ते त्यांच्या भूतकाळाच्या परिणामांशी संघर्ष करताना दिसतात. या दोघांनाही त्यांचा वर्तमानकाळ कठीण वाटतो, पण त्यांचा भूतकाळही त्यांची पाठ सोडत नाही. 'वन बॅटल आफ्टर अनदर'ची कथा बॉब नावाच्या एका क्रांतिकारकाभोवती फिरते.

One Battle After Another  Movie Oscar Award
Dhurandhar 2: 'धुरंधर २'चा जलवा; रिलीजपूर्वीच रणवीर सिंगच्या चित्रपटाची १०० कोटी क्लबमध्ये एन्ट्री

दरम्यान या चित्रपटाने २०२६ च्या ऑस्कर पुरस्कार सोहळ्यात सहा पुरस्कार जिंकून इतिहास रचला आहे. पॉल थॉमस अँडरसन दिग्दर्शित हा चित्रपट या वर्षातील सर्वाधिक चर्चेत असलेल्या चित्रपटांपैकी एक आहे. या चित्रपटात लिओनार्डो डिकॅप्रियो, शॉन पेन, बेनिसिओ डेल टोरो, रेजिना हॉल आणि टेयाना टेलर यांनी भूमिका साकारल्या आहेत. २०२५मध्ये प्रदर्शित झालेला 'वन बॅटल आफ्टर अनादर' हा अॅक्शन-थ्रिलर चित्रपट आपल्या वेगळ्या कथानकामुळे विशेष चर्चेत आला.

'वन बॅटल आफ्टर अनदर'ने २०२६ च्या ऑस्कर पुरस्कार सोहळ्यात सर्वोत्कृष्ट चित्रपट, सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक, सर्वोत्कृष्ट संपादन, सर्वोत्कृष्ट रूपांतरित पटकथा, सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता आणि सर्वोत्कृष्ट कास्टिंग हे पुरस्कार जिंकले. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर अयशस्वी ठरला. 'वन बॅटल आफ्टर अनादर' चित्रपटाचा बजेट खूप जास्त होता, अंदाजे ८३० ते १००० कोटी रुपयांदरम्यान या चित्रपटाचे बजेट असल्याचे सांगितले जाते. बॉक्स ऑफिसवरही या चित्रपटाने शानदार कामगिरी करत जगभरात सुमारे २५०० कोटी रुपयांची कमाई केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com