Accused arrested by Mumbai Airport Police for duping passengers by posing as a student across multiple Indian airports. saam tv
मुंबई/पुणे

मी विद्यार्थी आहे' म्हणत प्रवाशांना गंडा; देशभरात फसवणूक करणारा आरोपी अटकेत

Fake Student Airport Scam Mumbai Arrest: विमानतळांवर स्वतःला विद्यार्थी सांगून प्रवाशांची फसवणूक करणाऱ्या सराईत आरोपीला मुंबई पोलिसांनी अटक केली. देशभरातील अनेक गुन्ह्यांमध्ये आरोपी वाँटेड होता.

Omkar Sonawane

संजय गडदे, साम टीव्ही

मुंबई: देशभरातील विविध विमानतळांवर स्वतःला विद्यार्थी म्हणून सादर करून प्रवाशांची सहानुभूती मिळवत आर्थिक फसवणूक करणाऱ्या सराईत भामट्याला मुंबई विमानतळ पोलिसांनी अटक केली आहे. हा आरोपी देशभरातील विमानतळ पोलीस ठाण्यांमध्ये नोंद असलेल्या १० हून अधिक फसवणूक प्रकरणांमध्ये वाँटेड असल्याचे तपासात समोर आले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २१ मार्च २०२६ रोजी छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या टर्मिनल-१ येथे एका प्रवाशाजवळ आरोपी गेला. त्याने स्वतःची ओळख नागपूर येथील व्हीएनआयटी (VNIT) महाविद्यालयातील विद्यार्थी अशी करून दिली. विमानाचे तिकीट हरवल्याची भावनिक कहाणी सांगत त्याने प्रवाशाचा विश्वास संपादन केला

मदतीच्या नावाखाली आरोपीने संबंधित प्रवाशाकडून स्वतः दिलेल्या क्यूआर कोडवर १६ हजार रुपये ऑनलाइन हस्तांतरित करून घेतले. त्यानंतर पैसे परत मागितल्यावर आरोपीने सर्व संपर्क तोडला. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर पीडिताने विमानतळ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. याप्रकरणी भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ३१८(४) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला.

या प्रकरणाची गंभीर दखल घेत पोलिस उपायुक्त निमित गोयल यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू करण्यात आला. वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुहास चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली, पोलीस निरीक्षक (गुन्हे) युवराज व्हटकर यांच्या देखरेखीखाली उपनिरीक्षक वैभव पाटील व उपनिरीक्षक सुनील खैर यांनी तांत्रिक तपास केला. तपासादरम्यान आरोपीने वापरलेला मोबाईल क्रमांक आणि क्यूआर कोड दुसऱ्या व्यक्तीच्या नावावर असल्याचे निष्पन्न झाले. मात्र तांत्रिक विश्लेषण आणि गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी आरोपीची खरी ओळख व पत्ता शोधून काढला. आरोपी गेल्या १५ दिवसांत नागपूर, भोपाळ, लखनौ, वाराणसी आणि हैदराबादसह विविध शहरांमध्ये सक्रिय असल्याचेही उघड झाले.

२८ मे रोजी आरोपी मुंबईत परतल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी टर्मिनल-१ आणि टर्मिनल-२ येथे सापळा रचला. टर्मिनल-२च्या आगमन विभागात शोधमोहीम राबवून आरोपीला ताब्यात घेण्यात आले. अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव मोदेला वेंकट दिनेश कुमार (रा. गुंटूर, आंध्र प्रदेश) असे आहे. त्याच्या ताब्यातून तीन मोबाईल फोन, सहा सिमकार्ड, तीन बनावट आधारकार्डे, बनावट महाविद्यालयीन ओळखपत्रे आणि १९,६०० रुपयांची रोकड असा एकूण १.०५ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

पोलिसांच्या माहितीनुसार, २०२० पासून आरोपीविरुद्ध बेंगळुरू, दिल्लीतील आयजीआय विमानतळ, गुवाहाटी, जयपूर, कुन्नूर आणि मुंबईसह विविध विमानतळ पोलीस ठाण्यांमध्ये किमान नऊ फसवणुकीचे गुन्हे दाखल आहेत. तपास पुढे सरकल्यानंतर आणखी पीडित समोर येण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. दरम्यान, अनोळखी व्यक्तींकडून भावनिक कारणे सांगून आर्थिक मदत मागितली जात असल्यास सावध राहण्याचे आवाहन विमानतळ पोलिसांनी केले आहे. अशा प्रकारच्या घटनांची तात्काळ जवळच्या पोलीस ठाण्यात तक्रार करण्याचे आवाहनही करण्यात आले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

प्रसिद्ध गायिका सुमन कल्याणपूर यांचं निधन; संगीत क्षेत्रावर शोककळा

RCB vs GT IPL 2026 Final: आरसीबीसमोर गुजरातचं १५६ धावांचं आव्हान

Maharashtra News Live Update: छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील बहुतांश भागात वादळी वारे आणि पावसाला सुरुवात

गिल झेलबाद होताच कोहलीचा जोश हाय; पाटीदारच्या अप्रतिम झेलवर विराटचं जबरदस्त सेलिब्रेशन

नोकरदारांना 'सुट्ट्यांची' लॉटरी, सिगारेट सोडा, ६ सुट्ट्या मिळवा

SCROLL FOR NEXT