Maharashtra News Live Update: शरद पवारांच्या भेटीसाठी राष्ट्रवादीचे नेते सिल्वर ओकवर; 3 तासांपासून बैठक

Marathi Breaking Live Headlines Updates : दिवाळी सण २०२६, कोल्हापूर गोकुळ,हवामानाचा अंदाज, देश- विदेशातील महत्वाच्या घडामोडी वाचा एका क्लिकवर...
Maharashtra News Live Update
Maharashtra News Live UpdateSaam Tv News
Published On: 

शरद पवारांच्या भेटीसाठी राष्ट्रवादीचे नेते सिल्वर ओकवर; तीन तासांपासून बैठक

शरद पवार यांना रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी त्यांच्या भेटीसाठी सिल्वर ओक येथे हजेरी लावली आहे. जयंत पाटील, शशिकांत शिंदे, अनिल देशमुख आणि जितेंद्र आव्हाड हे गेल्या तीन तासांपासून सिल्वर ओकवर उपस्थित असल्याची माहिती आहे.

दरम्यान, पार्थ पवार हे देखील तब्बल दीड तास सिल्वर ओकवर उपस्थित होते, अशी माहिती सूत्रांकडून मिळत आहे.

शॉर्टसर्किट आणि रेफ्रिजरेटरचा स्फोट झाल्याने घराला लागली आग

पिंपरी चिंचवड शहरातील वाल्हेकर वाडी येथील सद्गुरु कृपा बिल्डिंग मधील एका घरात आज संध्याकाळी अचानक आग लागली. शॉर्टसर्किट मुळे रेफ्रिजरेटर चा स्फोट झाल्याने ही आग लागली असावी असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. आग लागल्याची वर्दी पिंपरी चिंचवड महापालिकेच्या अग्निशमन दलाला मिळताच अग्निशमन दल तातडीने घटनास्थळी दाखल होऊन आग आटोक्यात आणली आहे. या आगीत कोणतीही जीवितहानी झाली नसती तरी वित्तहानी मोठ्या प्रमाणात झाली आहे.

शनिवारवाड्यात ३६ हजार दिव्यांचा लखलखाट; ‘वन्दे मातरम्’ला अनोखी दीपांजली!

‘वन्दे मातरम्’च्या सार्धशताब्दीनिमित्त पुण्यातील ऐतिहासिक शनिवारवाड्याच्या प्रांगणात भव्य दीपप्रज्वलन सोहळ्याला सुरुवात झाली आहे. एकाच वेळी ३६ हजार दिवे प्रज्वलित करून गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद करण्याचा प्रयत्न या उपक्रमातून केला जात आहे. राष्ट्रगीत ‘वन्दे मातरम्’ला सामूहिक दीपांजली अर्पण करत देशभक्तीचा अनोखा संदेश देण्यात येत आहे. यावेळी देशासाठी बलिदान देणाऱ्या जवानांच्या वीरमाता आणि वीरनारींचा विशेष सन्मान करण्यात येणार असून, भारतीय सैन्याच्या मिलिट्री बँडकडून विशेष वादनही होणार आहे. महापौर मंजुषा नागपुरे यांच्या संकल्पनेतून पुणे महानगरपालिकेने या भव्य उपक्रमाचे आयोजन केले आहे. हजारो दिव्यांच्या प्रकाशाने शनिवारवाडा उजळून निघाला असून, पुणेकरांसाठी हा अभिमानाचा आणि ऐतिहासिक क्षण ठरत आहे.

मुख्यमंत्री शेतकऱ्यांच्या व्यथा जाणून घेणार; रामभाऊ बालपांडे यांच्या घरी जेवण आणि मुक्काम

मुख्यमंत्री नागपूर जिल्ह्यातील लोहारा-सावंगा गावातील शेतकरी रामभाऊ बालपांडे यांच्या घरी भेट देणार असून, यावेळी ते शेतकऱ्यांच्या व्यथा जाणून घेणार आहेत. शेतकऱ्यांशी संवाद साधत त्यांच्या समस्या समजून घेणार आहेत. यावेळी काही शेतकऱ्यांशीही त्यांनी संवाद साधला. मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यात लोहारा-सावंगा गावात गुरुदेव सेवाश्रमाच्या वतीने आयोजित सामुदायिक प्रार्थनेत ते सहभागी होतील. त्यानंतर ग्रामपंचायत परिसरात आयोजित शेतकरी संवाद कार्यक्रमाला उपस्थित राहतील. रात्री शेतकरी रामभाऊ बालपांडे यांच्या घरी जेवण आणि मुक्कामाचा कार्यक्रम असणार आहे.

नाशिकच्या द्वारका चौकात भीषण अपघात

- बसच्या चाकाखाली सापडून पादचारी महिलेचा जागीच मृत्यू

- बसच्या खाली सापडल्याने महिलेच्या शरीराचे दोन तुकडे

- मालेगावहून नाशिककडे येणाऱ्या बस खाली सापडून महिलेचा झाला मृत्यू

- लक्ष्मीपूजनाच्या पूर्वसंध्येला झालेल्या अपघातामुळे हळहळ

बीडमध्ये वन्यप्राण्याच्या हल्ल्यात शेतकऱ्याचा मृत्यू

आष्टी तालुक्यातील देवळाली शिवारात वन्यप्राण्याच्या हल्ल्यात एका शेतकऱ्याचा मृत्यू झाल्याची घटना आज सकाळी उघडकीस आली. देविदास टकले असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे. टकले हे आपल्या शेतात गेले असताना अचानक एका हिंस्र वन्यप्राण्याने त्यांच्यावर हल्ला केला. परिसरात अन्य कोणीही नसल्याने या हल्ल्यात त्यांचा जागीच मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे.

दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून या परिसरात बिबट्या आणि वाघाचा वावर असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. मात्र, वनविभागाने कोणत्याही ठोस उपाययोजना केल्या नसल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. घटनेनंतर दोन तास उलटूनही वनविभागाचे अधिकारी घटनास्थळी पोहोचले नसल्याने ग्रामस्थ संतप्त झाले आहेत. वनविभागाच्या निष्काळजीपणामुळेच शेतकऱ्याचा बळी गेल्याचा आरोप करत दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे. मागण्या मान्य न झाल्यास आंदोलन करण्याचा इशाराही ग्रामस्थांनी दिला आहे.

दीपावलीनिमित्त विठ्ठल-रुक्मिणी मातेचा अलंकारांनी साज; विठुरायाचे रूप खुलले!

दीपावलीनिमित्त श्री विठ्ठल आणि रुक्मिणी मातेला पारंपरिक पोशाखासह मौल्यवान अलंकार परिधान करण्यात आले आहेत. विविध ऐतिहासिक अलंकारांनी विठुरायाचे रूप अधिकच खुलून दिसत आहे. देवाचे हे मनमोहक आणि सजलेले रूप पाहण्यासाठी मंदिरात भाविकांनी गर्दी केली आहे.

श्री विठ्ठलाला सोन्याचा मुकुट, कौस्तुभमणी, दंडपेठ, जोड शिरपेच, मोठा व लहान शिरपेच, मोत्याचा तुरा, मोत्याची कंठी, तोड्यांची जोडी, मत्स्य जोडी, मोहरांची माळ, तुळशीची माळ, एकदाणी, अष्टपैलू मण्यांची कंठी, चंद्रहार आणि हिऱ्यांच्या कंगनांची जोडी असे मौल्यवान ऐतिहासिक अलंकार परिधान करण्यात आले आहेत. या अलंकारांमुळे विठुरायाचे रूप अधिकच तेजस्वी आणि आकर्षक दिसत आहे.

गोकुळच्या वादात धनंजय महाडिकांचा मोठा दावा

गोकुळ दूध संघाच्या चेअरमन निवडीवरून सुरू असलेल्या वादात खासदार धनंजय महाडिक यांनी गंभीर आरोप केले आहेत. चेअरमन निवडीसाठी पहिली सभा २९ तारखेला होणार असल्याचे निवडणूक अधिकाऱ्यांनी जाहीर केले होते. १९ तारखेला समविचारी गटाचे १३ संचालक उपस्थित होते, तर १२ संचालक अनुपस्थित होते. या प्रकरणी न्यायालयाकडून नोटिसा पाठवण्यात आल्या होत्या; मात्र प्रत्यक्षात संबंधितांना नोटिसा मिळाल्या नसल्याचा दावा महाडिक यांनी केला आहे. तसेच वकिलांनी न्यायालयात खोटे प्रतिज्ञापत्र सादर केल्याचा आरोपही त्यांनी केला.

दीपावली निमित्त श्री विठ्ठलास व रूक्मिणी मातेस अलंकार परिधान

दिपावली निमित्ताने आज विठ्ठल रुक्मिणी मातेला पारंपारिक पोशाख सोबतच मौल्यवान अलंकार परिधान करण्यात आले आहेत. अलंकाराने विठुरायाचे रूप अधिकच खुलून दिसत आहे. देवाचे सजलेले रूप पाहण्यासाठी भाविकांनी गर्दी केली‌ आहे.

Maharashtra News Live Update: येवल्यात भंगार गोदामाला भीषण आग

येवल्यातील भंगार गोदामाला भीषण आग लागल्याची घटना घडली. गोदामात मोठ्या प्रमाणात प्लास्टिक असल्याने आगीने रौद्र रूप धारण केले आणि आग वेगाने पसरली. आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अग्निशमन दलाला शर्थीचे प्रयत्न करावे लागले.

राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाच्या चर्चांना वेग? डिस्चार्ज मिळताच शरद पवारांच्या भेटीसाठी नेते सिल्वर ओकवर दाखल

राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांच्या विलीनीकरणाच्या चर्चांना जोर आलेला असतानाच राजकीय घडामोडींना वेग आला आहे. शरद पवार यांना आज सकाळी ब्रीच कँडी रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. डिस्चार्ज मिळताच प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे, अनिल देशमुख आणि जितेंद्र आव्हाड यांच्यासह कोअर कमिटीचे नेते सिल्वर ओकवर दाखल झाले.

ठाण्यात राजन विचारे यांची यंदाची दिवाळी पहाट रद्द

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते राजन विचारे यांनी यंदाची ठाणे शहरातील दिवाळी पहाट रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. दरवर्षी गडकरी रंगायतन चौक परिसरात मोठ्या जल्लोषात या कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. मात्र, यंदा बळीराजा आणि पुणेकर कुटुंबीयांना आधार देण्यासाठी दिवाळी पहाट साजरी न करण्याचा निर्णय घेतल्याचे विचारे यांनी बॅनरद्वारे जाहीर केले आहे.

दिवाळीच्या खरेदीसाठी दादर बाजारपेठेत तुफान गर्दी; महागाईवर मात करत मुंबईकरांचा खरेदीचा उत्साह 

दिवाळीच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील दादर बाजारपेठेत नागरिकांची मोठ्या प्रमाणात गर्दी पाहायला मिळत आहे. आकाशकंदील, पूजेचे साहित्य आणि दरवाजाला लावण्यासाठीच्या सजावटीच्या वस्तू खरेदीसाठी नागरिकांची झुंबड उडाली आहे.

नालासोपाऱ्यात आगीचा तांडव! शिर्डी नगरमध्ये दोन गाड्या जळून खाक; परिसरात खळबळ

नालासोपारा येथील शिर्डी नगर परिसरातील क्रिस्टाराज हायस्कूलजवळ अचानक दोन गाड्यांना आग लागली. दोन्ही गाड्या वाचवण्यासाठी नागरिकांनी प्रयत्न केले, मात्र आगीचा भडका वाढल्याने गाड्या जळून खाक झाल्या. वसई-विरार महापालिकेच्या अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेत काही वेळातच आगीवर नियंत्रण मिळवले.

पायल झांबरे आत्महत्या प्रकरणात मोठी अपडेट; पती अक्षय झांबरेंच्या पोलीस कोठडीत ९ नोव्हेंबरपर्यंत वाढ 

पुण्यातील स्वारगेट परिसरातील मुकुंदनगर येथे पायल झांबरे यांनी आत्महत्या केली होती. सासरच्या जाचाला कंटाळून त्यांनी आत्महत्या केल्याचा आरोप असून, पती अक्षय झांबरेसह सासू-सासऱ्यांना अटक करण्यात आली आहे. अक्षय झांबरे याची पोलीस कोठडी संपल्यानंतर आज न्यायालयात हजर करण्यात आले होते. न्यायालयाने त्याच्या पोलीस कोठडीत आणखी दोन दिवसांची वाढ केली आहे.

एकनाथ शिंदे दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसोबत साजरी करणार दिवाळी; उद्या जालन्यात जाणार 

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उद्या जालना जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त भागाचा दौरा करणार आहेत. दुष्काळाचा सामना करणाऱ्या शेतकऱ्यांसोबत ते दिवाळी साजरी करणार आहेत. यावेळी दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना मदतही केली जाणार असल्याची माहिती आहे. राज्यातील इतर मंत्रीदेखील दुष्काळग्रस्त भागात जाऊन शेतकऱ्यांसोबत दिवाळी साजरी करणार आहेत.

नाशिकच्या येवल्यात भीषण आग! भंगाराच्या गोडाऊनसह ४ घरं आगीच्या भक्ष्यस्थानी

नाशिकच्या येवला शहरातील अंबिया शहा कॉलनी परिसरात भंगाराच्या गोडाऊनला भीषण आग लागली. आगीने रौद्ररूप धारण करत शेजारील चार घरांनाही आपल्या विळख्यात घेतले. आगीमुळे परिसरात एकच धावपळ उडाली असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. आग विझवण्यासाठी नागरिकांचे प्रयत्न सुरू असून अग्निशमन दलाच्या मदतीची प्रतीक्षा होती.

लघु व्यावसायिकांना 'प्रा. प्रकाश डवले फाउंडेशन'कडून जेवणाचे वाटप

राज्यात सध्या दिवाळीची धूम सुरूये. या निमित्ताने राज्यभरातील दिवाळीसाठी लागणाऱ्या साहित्याच्या बाजारपेठा सजल्यायेत. या बाजारपेठेमध्ये विक्री करणाऱ्या लघु व्यावसायिकांना व्यवसाय करतांना जेवणासाठी मोठ्या अडचणींना सामोरे जावं लागतंय. अकोल्यातील मुख्य बाजारपेठ असलेल्या गांधी रोडवर दिवाळीच्या साहित्याच्या विक्रीची दुकानं लागलीयेत. ही अडचण लक्षात घेऊन अकोल्यातील शिवसेना नेते प्रा. प्रकाश डवले यांनी बाजारपेठेत साहित्य विक्रीसाठी आलेल्या लघु व्यावसायिकांच्या जेवनाची व्यवस्था केलीय. 'प्रा. प्रकाश डवले फाउंडेशन'च्या वतीने हा उपक्रम राबविण्यात आलाय. विशेष म्हणजे लघु व्यावसायिकांना त्यांच्या व्यवसायाच्या जागेवर जात जेवण देण्यात आलंय. पुरी, भाजी आणि मसालेभात यावेळी विक्रीसाठी आलेल्या लघु व्यावसायिकांना वितरित करण्यात आलाय. आज आणि उद्या दिवसभर डवले फाउंडेशनच्या वतीने हा उपक्रम राबवला जाणारेय. आज जवळपास हजारावर लघु व्यावसायिकांनी या उपक्रमाचा लाभ घेतलाय

दिवाळीत विक्रीसाठी आणलेले पिस्तूल पोलिसांनी पकडले मुंब्रा ते कुर्ला कनेक्शन उघड

कुर्ला पूर्व परिसरात विक्रीसाठी आणलेले देशी बनावटीचे पिस्तूल चुनाभट्टी पोलिसांच्या गुंडा पथकाने केले जप्त

याप्रकरणी आदिल अब्दुल अतिक खान (४०) याला अटक करण्यात आली असून त्याच्याकडून पिस्तूल, तीन मोबाईल फोन आणि काही ओळखपत्रे हस्तगत करण्यात आली

जप्त पिस्तुलाची किंमत अंदाजे ३५ हजार रुपये आहे.

पुण्यात कात्रज कोंढवा काकडे वस्तीमध्ये विजेचा प्रश्न ऐरणीवर

फुटपाथवर अचानक आग लागल्याने परिसरात खळबळ

कोंढवा बुद्रुक येथील काकडे वस्ती परिसरात लेन क्रमांक ५ समोरील जयराज स्पोर्ट्सजवळील फुटपाथवर अचानक आग लागल्याची घटना घडली.

जमिनीखालील विद्युत केबलमध्ये शॉर्टसर्किट झाल्याने ही आग लागल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे.

आग अचानक भडकल्याने परिसरात काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले.

वेळीच आग आटोक्यात आल्याने मोठी दुर्घटना टळल्याची चर्चा नागरिकांमध्ये सुरू आहे.

काकडे वस्तीतील रहिवाशांना वारंवार वीजपुरवठ्याच्या समस्यांना सामोरे जावे लागत आहे. अशा प्रकारे विद्युत केबलमध्ये शॉर्टसर्किट होऊन आग लागण्याच्या घटनांमुळे नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे.

Nashik: पन्नालालच्या सुटकेसाठी न्यायालयात लढाई, गोड घास भरवून कुटुंबाचा भावनिक निरोप

नाशिकच्या कालिका देवी यात्रेत पन्नालाल का जलवा म्हणत एक गाढव चांगलंच प्रसिद्ध झालं होतं. नवरात्रोत्सवात आपल्या खेळातून भाविकांचं मनोरंजन करणारा हा पन्नालाल आता गोशाळेत आहे. प्राणिमित्रांच्या तक्रारीनंतर त्याला गोशाळेत हलवण्यात आलं आणि त्याच्या मालकीवरून वाद निर्माण झाला. गेल्या दोन वर्षांपासून त्याचा सांभाळ करणाऱ्या भाट कुटुंबीयांना मात्र पन्नालाल पुन्हा आपल्या घरी हवा आहे. त्यासाठी आता थेट न्यायालयाची पायरी चढण्यात आली आहे. विशेष म्हणजे पुण्याला दीपावलीसाठी रवाना होण्यापूर्वी कुटुंबीयांनी पन्नालालला गोडधोड भरवून भावनिक निरोप दिला.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची यंदाची दिवाळी शेतकऱ्यांच्या बांधावर

राज्यात आजपासून दिवाळीचा सण मोठ्या उत्साहात सुरू झाला आहे. मराठवाडा आणि विदर्भासह राज्याच्या मोठ्या भागात यावर्षी दुष्काळाची परिस्थिती असल्याच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारच्या वतीने शेतकऱ्यांच्या खात्यात अग्रीम 5 हजार रुपयांची मदत पोहोचायला सुरुवात झाली आहे. एक कोटीच्यावर शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा होत आहेत. फुल ना फुलाची पाकळी म्हणून सरकारकडून दिवाळीच्या तोंडावर ही मदत केली जात आहे. कर्जमाफीची रक्कमही शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाली आहे. या पुढे जाऊन माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस स्वतः शेतकऱ्यांसोबत बांधावर जाऊन दिवाळी साजरी करताहेत. आजवर राज्याच्या इतिहासात एकाही मुख्यमंत्र्याने शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन शेतकऱ्यांसोबत दिवाळी साजरी केली नव्हती, असे प्रतिपादन भाजपा प्रदेश मुख्य प्रवक्ते नवनाथ बन यांनी शनिवारी केले. भाजपा प्रदेश कार्यालयातील पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

नंदुरबारमध्ये शिवसेना भाजपमध्ये पुन्हा जुंपली

नंदुरबारमध्ये स्वीकृत नगरसेवकाच्या निवडीवरून सत्ताधारी शिवसेना शिंदे गट आणि भाजपमधील वाद पुन्हा एकदा उफाळून आला आहे. एका स्वीकृत नगरसेवकाने राजीनामा दिल्यानंतर नव्या नियुक्तीची प्रक्रिया सुरू होती. मात्र, भाजपकडून देण्यात आलेल्या उमेदवाराचा अर्ज कागदपत्रांतील त्रुटींमुळे प्रांताधिकाऱ्यांनी अपात्र ठरवला. यावरून शिवसेना आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी भाजपला जोरदार लक्ष्य केले आहे.नंदुरबार शहरात तब्बल 1 लाख 10 हजार मतदार असताना, भाजपला स्वीकृत नगरसेवकपदासाठी एकही लायक आणि पात्र माणूस मिळू नये, याची मला लाज वाटते,अशा सडेतोड शब्दांत रघुवंशी यांनी भाजपवर निशाणा साधला. तसेच, योग्य उमेदवार शोधण्यासाठी इतरांचे मार्गदर्शन घेण्याचा टोलाही त्यांनी लगावला आहे. या ताज्या घडामोडीमुळे महायुतीतील अंतर्गत वाद पुन्हा चव्हाट्यावर आला आहे.

१६ हजार ७१७ पदांची घोषणा, मुख्यमंत्र्यांशी फोनवरून संवाद साधत विद्यार्थ्यांच्या वतीने मानले आभार

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) इतिहासातील सर्वात मोठ्या भरती प्रक्रियेची घोषणा राज्य शासनाकडून करण्यात आली आहे. तब्बल १६ हजार ७१७ पदांची भरती जाहीर झाल्याने स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या हजारो विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. या निर्णयानंतर विद्यार्थी चळवळीतील एका कार्यकर्त्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी फोनवरून संवाद साधत विद्यार्थ्यांच्या वतीने त्यांचे आभार मानले.गेल्या अनेक दिवसांपासून सातत्याने केलेल्या पाठपुराव्याला अखेर यश आले असून, MPSC ची परीक्षा तीन आठवड्यांनी पुढे ढकलण्यात आली असली, तरी ती जानेवारी महिन्यातच होणार आहे. विद्यार्थ्यांच्या निवेदनातील मागणी मान्य झाल्याने समाधान व्यक्त करण्यात येत आहे.दरम्यान, जाहीर झालेल्या भरतीमध्ये कोअर MPSC अर्थात नॉन-टेक्निकल (कोणत्याही शाखेतील पदवीधरांसाठी) पदांच्या जागांमध्ये अपेक्षित वाढ झालेली नसल्याचा मुद्दा विद्यार्थ्यांकडून उपस्थित केला जात आहे. सहकार विभाग, समाजकल्याण विभागासह अन्य विभागांतील रिक्त पदांचा भरती प्रक्रियेत समावेश व्हावा, यासाठी संबंधित कार्यकर्त्याने पाठपुरावा सुरू केला आहे. हा विषय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निदर्शनासही आणून दिल्याचे त्यांनी सांगितले.दरम्यान, विद्यार्थ्यांनी २४ जानेवारी रोजी होणाऱ्या Group-C पूर्व परीक्षा २०२६ च्या तयारीवर लक्ष केंद्रित करावे, असे आवाहन करण्यात आले आहे. १६ हजार ७१७ पदांच्या ऐतिहासिक भरतीनंतर आता नॉन-टेक्निकल पदांच्या जागांमध्येही वाढ व्हावी, यासाठी प्रयत्न सुरू ठेवण्याचा विश्वास त्यांनी विद्यार्थ्यांना दिला आहे.

SRA च्या कारभारावर आयुक्त अश्विनी भिडे यांचे आक्षेप; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र

मुंबई महापालिका आयुक्त अश्विनी भिडे यांनी झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाच्या (SRA) कार्यपद्धतीवर आक्षेप घेत मुख्यमंत्री यांना पत्र लिहिले आहे. विशेषतः विकास नियंत्रण नियमावलीतील (DCPR) नियम 33(11) अंतर्गत झोपडपट्टी नसलेल्या भूखंडांवरही SRA कडून सवलती दिल्या जात असल्याबाबत या पत्रात गंभीर मुद्दे उपस्थित करण्यात आले आहेत.

भाजप आमदार देवेंद्र कोठेविरोधात सोलापुरातील काँग्रेस कार्यकर्ते आक्रमक

आमदार देवेंद्र कोठे विरोधात आंदोलनात सहभागी झालेल्या काँग्रेस कार्यकर्त्यांना कोठे समर्थकाकडून धमक्या दिल्या जातं असल्याचा आरोप

तर काँग्रेस पदाधिकारी तिरुपती परकीपंडला यांना कोठे यांच्या कार्यकर्त्यांनी धमकी दिली तसेच उलट त्यांच्या विरोधात ऍट्रॉसिटी कायद्यानुसार गुन्हा दाखल केल्याचा काँग्रेसचा आरोप

यावेळी युवक काँग्रेसचे अध्यक्ष गणेश डोंगरे यांनी आमदार देवेंद्र कोठेवर सडकून टीका केली

दिवाळीच्या निमित्ताने कांदिवली पोलिसांना मोठे यश

दिवाळीच्या निमित्ताने कांदिवली पोलिसांना मोठे यश मिळाले आहे.

कांदिवलीतील एका इमारतीत घुसून ज्येष्ठ महिलेची चेन हिसकावणाऱ्या आरोपीला कांदिवली पोलिसांनी अटक केली आहे.

आरोपी महिलेला पत्ता विचारण्याच्या बहाण्याने सोसायटीत घुसला आणि तिच्या गळ्यातील चेन हिसकावून पळून गेला होता. याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता.

अटक केलेल्या आरोपीचे नाव अजय जॉकी परेरा असे आहे.

इचलकरंजीतील ज्योतिषी मंदार रानडे हत्या प्रकरणाचा उलगडा!

- इचलकरंजीतील ज्योतिषी मंदार रानडे हत्या प्रकरणाचा उलगडा!

- मुलीच्या आंतरजातीय प्रेमविवाहाचा राग मनात धरून निर्घृण खून!

- दुसरे लग्न जुळवायचे असल्याचे सांगून मंदार रानडे यांना बोलावले!

- डोळ्यांत मिरची पूड फेकली, विळ्याने गळ्यावर सपासप वार!

- बेळगाव जिल्हा पोलिसांची मोठी कारवाई; बाबासो उर्फ दीपक मगदूम पोलिसांच्या ताब्यात!

- तांत्रिक तपासातून आरोपीचा छडा; हत्येतील शस्त्रही जप्त!

झारखंडच्या फरार इनामी नक्षलवाद्याला ३ दिवसांची ट्रान्झिट रिमांड

झारखंड पोलिसांनी ठाणे एटीएसच्या मदतीने डोंबिवलीतील ठाकुर्लीच्या खंबाळपाडा परिसरातून फरार नक्षलवादी संजय यादव याला अटक केली आहे. अटकेनंतर आरोपीला ठाणे न्यायालयात हजर करण्यात आले. झारखंड पोलिसांनी पुढील तपासासाठी ८ दिवसांच्या ट्रान्झिट रिमांडची मागणी केली होती. मात्र, बचाव पक्षाचे वकील मनीष उज्जैनकर यांनी विमानाने नेणार असल्याने दोन दिवसांची रिमांड पुरेशी असल्याचा युक्तिवाद केला. दोन्ही बाजू ऐकल्यानंतर न्यायालयाने ३ दिवसांची ट्रान्झिट रिमांड मंजूर केली.

सातपुड्यातील अस्तंबा ऋषी यात्रोत्सवाची हजारो वर्षांची परंपरा कायम

सातपुड्यातील अस्तंबा ऋषी यात्रोत्सवाची हजारो वर्षांची परंपरा कायम....

धडगावमधून आदिवासी बांधवांची पारंपरिक मिरवणूक....

जल, जंगल, जमिनीच्या रक्षणासाठी अस्तंबा ऋषींना साकडे....

डोक्यावर धान्याचा कळस आणि ढोल-ताशांच्या गजरात भाविक रवाना....

मिरवणुकीत दिसला आदिवासी संस्कृतीचा अनोखा उत्साह...

अस्वलाची वेशभूषा करत भाविकांनी वेधले लक्ष....

पुण्यात झांबरे पॅलेस येथे जस्टीस फॉर पायल झांबरे आंदोलन

पुण्यात झांबरे पॅलेस येथे जस्टीस फॉर पायल झांबरे आंदोलन

स्वारगेट जवळ मुकुंदनगर येथे झांबरे पॅलेस

थाळी नाद करत जोडो मारो आंदोलन

पायल तिवारी बिटिया फाउंडेशनचे आंदोलन

पायल झांबरे यांनी सासरच्या जाचाला कंटाळून गेली होती आत्महत्या

निषेध करण्यासाठी महिलांकडून आंदोलन

छत्रपती संभाजीनगरमध्ये FDA ची मोठी कारवाई

छत्रपती संभाजीनगरमध्ये अन्न व औषध प्रशासनाने (FDA) मोठी कारवाई केली आहे. निलंबित अन्न परवाने असूनही व्यवसाय सुरू ठेवणाऱ्या चार आस्थापनांना सील ठोकण्यात आले आहे. यामध्ये दोन तेल रिपॅकिंग युनिट आणि दोन मिठाई व फराळ उत्पादकांचा समावेश आहे. दिवाळीच्या काळात नियमांचे उल्लंघन करून उत्पादन सुरू असल्याची माहिती मिळाल्यानंतर अन्न सुरक्षा अधिकाऱ्यांनी धाड टाकली. पाहणीत अनियमितता आढळल्याने प्राज्ञा सुरासे आणि प्रशांत कुचेकर यांनी ही कारवाई केली.

पुणे-अहिल्यानगर महामार्गावर सलग तिसऱ्या दिवशी वाहतूककोंडी

दिवाळीच्या सुट्ट्यांमुळे पुणे-अहिल्यानगर महामार्गावर सलग तिसऱ्या दिवशी वाहतुकीचा बोजवारा उडाला आहे. वाघोली, सणसवाडी, शिक्रापूर, रांजणगाव आणि शिरूर परिसरात तब्बल १० ते १२ किलोमीटरपर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. पुण्याकडून अहिल्यानगरच्या दिशेने जाणारी वाहतूक जवळपास ठप्प झाली असून वाहनचालकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. दिवाळीच्या सुट्ट्यांमुळे प्रवाशांची संख्या वाढल्याने महामार्गावर वाहतूककोंडीची समस्या निर्माण झाली आहे.

शरद पवारांना ब्रीच कँडी रुग्णालयातून डिस्चार्ज

शरद पवार यांना रुग्णालयातून डिस्चार्ज मिळालेला आहे. ते सिल्व्हर ओक्स निवासस्थानी दाखल झाले आहे

राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या प्रकृतीत सुधारणा झाल्यानंतर त्यांना ब्रीच कँडी रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे.

गेल्या दोन दिवसांपासून त्यांची प्रकृती ठीक नसल्याने त्यांच्यावर ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू होते.

उपचारानंतर प्रकृतीत सुधारणा झाल्यामुळे डॉक्टरांनी त्यांना रुग्णालयातून घरी जाण्याची परवानगी दिली.

त्यानंतर शरद पवार हे मुंबईतील त्यांच्या सिल्व्हर ओक्स या निवासस्थानी दाखल झाले आहेत.

फडणवीस सरकारचा शेतकऱ्यांसाठी मोठा निर्णय

फडणवीस सरकारचा शेतकऱ्यांसाठी मोठा निर्णय

तांत्रिक व भौगोलिक अडचणींमुळे खरिपाची ऑनलाईन पीक नोंदणी जिथे शक्य होत नाही, तिथे आता 'ई-फेरफार'द्वारे होणार पीक पाहणी

राज्यातील सुमारे ७० लाख शेतकऱ्यांना दिलासा

पीक नोंदणी रखडू नये यासाठी आता तलाठी स्तरावर पाहणी होणार

महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे महसूल विभागाला निर्देश

शेतकऱ्यांच्या शेतीशी संबंधित अडचणी दूर करण्यासाठी मंत्री भरत गोगावले यांचा मोठा निर्णय

शेतकऱ्यांच्या शेतीशी संबंधित अडचणी दूर करण्यासाठी मंत्री भरत गोगावले यांचा मोठा निर्णय

मातोश्री ग्रामसमृद्धी शेत पानंद रस्ते योजनेअंतर्गत, 116 कोटीचा निधी वितरित

दुष्काळाच्या सावटात शेतकऱ्यांना शेतीशी संबंधित अडचणी दूर करण्यासाठी मंत्री भरत गोगावले यांचे संबंधित यंत्रणेला निधी वितरण बाबत कार्यवाही करण्याचे दिले होते निर्देश

शेतकऱ्यांना शेतापर्यंत जाण्यासाठी बारा महिने रस्ते उपलब्ध व्हावेत, शेतीची मशागत आणि शेतमालाची वाहतूक सुलभ व्हावी यासाठी राज्य शासनाकडून मातोश्री ग्राम समृद्धी शेत पानंद रस्ते योजना

फडणवीस सरकारचा शेतकऱ्यांसाठी मोठा निर्णय

फडणवीस सरकारचा शेतकऱ्यांसाठी मोठा निर्णय

तांत्रिक व भौगोलिक अडचणींमुळे खरिपाची ऑनलाईन पीक नोंदणी जिथे शक्य होत नाही, तिथे आता 'ई-फेरफार'द्वारे होणार पीक पाहणी

राज्यातील सुमारे ७० लाख शेतकऱ्यांना दिलासा

पीक नोंदणी रखडू नये यासाठी आता तलाठी स्तरावर पाहणी होणार

धारशिव जिल्ह्यातील कळंब शहरात अपहरणाचा थरार

कळंब तालुक्यातील बोर्डा गावात राहत्या घरी जाऊन प्रियकराने तिच्या आईला व बहिणीला तलवारीने मारहाण करत प्रेयसीचे केले अपहरण

ईरटीगा गाडीतुन तरुणीला पळून नेण्याचा प्रयत्न, ईरटीगा गाडी समोर येईल त्यालाही उडवले

५४ वर्षीय नाशिकच्या महिलेला सरोगसीचा पर्याय निवडण्याची मुंबई उच्च न्यायालयाची परवानगी

५४ वर्षीय नाशिकच्या महिलेला सरोगसीचा पर्याय निवडण्याची मुंबई उच्च न्यायालयाची परवानगी

महिलांसाठी सरोगसीची कायदेशीर वयोमर्यादा ५० वर्ष आहे

महिलेच्या जोडीदाराचं वय ५३ असून ते पुरुषांसाठी निश्चित केलेल्या ५५ वर्षांच्या वयोमर्यादेत बसत असल्याचा उच्च न्यायालयाचा निर्वाळा

सोलापुरातील भाजप-काँग्रेस नेत्यामधील वादाच्या प्रकरणात आतापर्यंत एकूण 3 गुन्हे दाखल

सोलापुरातील भाजप-काँग्रेस नेत्यामधील वादाच्या प्रकरणात आतापर्यंत एकूण 3 गुन्हे दाखल

भाजप आमदार देवेंद्र कोठे समर्थकावर 2 तर काँग्रेस कार्यकर्त्यांच्या विरोधात 1 गुन्हा नोंद

विना परवानगी आंदोलन करत बेकायदेशीर जमाव जमवल्याप्रकरणी काँग्रेस कार्यकर्त्यावर गुन्हा नोंद

चमत्काराचे दावे करून सामान्यांची फसवणूक करणाऱ्या खरातची दिवाळी तुरुंगातच

* चमत्काराचे दावे करून सामान्यांची फसवणूक करणाऱ्या खरातची दिवाळी तुरुंगातच

* ११ गंभीर गुन्ह्यांची नोंद असलेल्या खरातच्या आलिशान तृप्तबाला बंगल्यात शुकशुकाट

* भक्तांच्या गर्दीने फुलणारा बंगला यंदा मात्र ओस पडला

Nandurbar : सातपुड्यातील सर्वोच्च अस्तंबा ऋषी यात्रेला उधाण

सातपुड्यातील सर्वोच्च अस्तंबा ऋषी यात्रेला उधाण

हजारो आदिवासी बांधवांची शिखरावर दर्शनासाठी मांदियाळी

महाभारतातील अश्वत्थामा आजही 4 हजार फूट उंच शिखरावर तपस्या करत असल्याची भाविकांमध्ये आख्यायिका

महाराष्ट्र दहशतवादविरोधी पथकाची (ATS) मोठी कारवाई

महाराष्ट्र दहशतवादविरोधी पथकाची (ATS) मोठी कारवाई

ठाण्यातून १० लाखांचे बक्षीस असलेल्या नक्षलवाद्याला अटक

झारखंड पोलिसांकडून १० लाखांचे बक्षीस जाहीर असलेला नक्षलवादी ठाणे जिल्ह्यातील ठाकुर्ली येथून ताब्यात

Sharad Pawar Health Update : शरद पवार यांना आज मिळणार डिस्चार्ज

शरद पवार यांना आज मिळणार डिस्चार्ज

सकाळी 10 वाजता शरद पवार यांना मिळणार डिस्चार्ज

गेल्या दोन दिवसांपासून शरद पवार यांना केलं होतं ब्रीच कँडी रुग्णालयात ऍडमिट

दोन दिवसात अनेक नेत्यांनी घेतली शरद पवार यांची भेट

रामदास कदम यांचे वक्तव्य तटकरे यांच्या मेव्हण्याच्या जिव्हारी; फेसबुक पोस्टमधून पलटवार!

रामदास कदम यांचे वक्तव्य तटकरे यांच्या मेव्हण्याच्या जिव्हारी; फेसबुक पोस्टमधून पलटवार!

अजय बिरवटकर यांची रामदास कदमांवर बोचरी टीका; सुनील तटकरे यांच्या मेव्हण्याचीही स्वाभिमानावरून सूचक पोस्ट, कदम-तटकरे वाद चिघळण्याची शक्यता

Nashik : महापालिकेतील स्वीकृत सदस्य निवडीचा सस्पेन्स अखेर संपला

- महापालिकेतील स्वीकृत सदस्य निवडीचा सस्पेन्स अखेर संपला

- भाजपचे सहा, शिंदेच्या शिवसेनेचे दोन अर्ज वैध

- ठाकरेंच्या शिवसेनेचेही दोन अर्ज छाननीत वैध

- काँग्रेस नगरसेवक सूफी जीन यांनी दिलेला अर्ज मात्र बाद

- काँग्रेसचा स्वतंत्र गट अस्तित्वात नसल्याने आयुक्तांचा निर्णय

ऊस दराच्या मागणीसाठी आमदार सदाभाऊ खोत,यांचा मशाल मोर्चा

ऊस दराच्या मागणीसाठी सांगलीच्या ईश्वरपूरमध्ये आमदार सदाभाऊ खोत यांच्या नेतृत्वाखाली मशाल मोर्चा काढण्यात आला.

कोल्हापूर प्रमाणे सांगली जिल्ह्यातील कारखान्याने ऊस दर जाहीर करावा

आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबीयांना शिंदेसेनेकडून मदत

आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबीयांना शिंदेसेनेकडून मदत

पाच हजार गरजूंना दिवाळीचा शिधा किटचे वाटप

उष्णतेपासून बचावासाठी ओंकार हत्तीची नळाच्या पाण्यात मस्ती

एल नीनोच्या प्रादुर्भावामुळे वातावरणात उष्णतेचे प्रमाण वाढलेय. उष्णतेची झळ मनुष्यासोबत वन्य प्राण्यांणा देखील जाणवू लागलीय.

तळकोकणात नेहमीच चर्चेत राहिलेल्या ओंकार हत्तीचा उष्णतेपासुन बचाव करतानाचा एक व्हिडिओ सद्या मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय.

Nagpur : लक्ष्मीपूजनाच्या दिवशी नागपूर मेट्रोची सेवा सायंकाळी ६ वाजेपर्यंतच!

- लक्ष्मीपूजनाच्या दिवशी नागपूर मेट्रोची सेवा सायंकाळी ६ वाजेपर्यंतच!

- दिवाळीतील लक्ष्मीपूजनानिमित्त ८ नोव्हेंबर रोजी नागपूर मेट्रोच्या वेळापत्रकात बदल करण्यात आलयं प्रवाश्यांनी लक्षात घेऊन प्रवास करावा.

- रविवारी सकाळी ६ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंतच मेट्रो सेवा सुरू राहणा

Buldhana : निकृष्ट रेशन तांदळाविरोधात अनोखा निषेध

निकृष्ट रेशन तांदळाविरोधात अनोखा निषेध

अधिकाऱ्यांना 'दिवाळी भेट' म्हणून दिला निकृष्ट दर्जाचा तांदूळ

कंत्राटदाराचे परवाने रद्द करून दोषी अधिकाऱ्यांना निलंबित करण्याची मागणी

लक्ष्मी पूजनानिमित्ताने पुणे मेट्रोच्या वेळापत्रकात बदल

क्ष्मी पूजनानिमित्ताने पुणे मेट्रोच्या वेळापत्रकात बदल करण्यात आला आहे.

रविवारी मेट्रोची सेवा सकाळी ६ ते सायंकाळी ६ या वेळेतच सुरू राहणार आहे

सायंकाळी ६ ते रात्री ११ या वेळेत मेट्रोची सेवा पूर्णपणे बंद ठेवण्यात येणार आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची दिवाळी शेतकऱ्यांसोबत

- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची दिवाळी शेतकऱ्यांसोबत...

- नागपूर जिल्ह्यातील नरखेड तालुक्यातील लोहारी सावंगा येथे शेतकऱ्यांसोबत दिवाळी साजरी करणार.

- दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर आर्थिक संकटाचा सामना करणाऱ्या शेतकऱ्यांचे मनोबल वाढवण्यासाठी मुख्यमंत्र्यांचा पुढाकार

Pune : पुण्याच्या भोरमधील ऐतिहासिक 141 वर्ष जूना रामबाग येथील दगडी पूल पाडला

भोरमधून जाणाऱ्या महाड - पंढरपूर मार्गावरील शिरवळ ते महाड या जवळपास 80 किलोमीटरच्या रस्त्याचे रुंदीकरणाचे आणि कॉंक्रिटीकरणाचे काम सुरू असल्याने हा पूल पाडण्यात आलाय

पुलाला धोका नसला तरी तांत्रिक कारणास्तव हा निर्णय घेण्यात आल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आलय..

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.