पुण्याचं आयटी हब असलेल्या देशातील नामांकित हिंजवडी आयटी पार्कमध्ये एकारात्रीत 700 कर्मचाऱ्यांना घरी बसण्याची वेळ आलीये... 'थिंक टेक्नॉलॉजी इंडिया' कंपनीने कोणतीही पूर्वकल्पना न देता रातोरात कार्यालयाला टाळं ठोकलं. यामुळे तब्बल ७०० हून अधिक सॉफ्टवेअर इंजिनियर्सवर अचानक बेरोजगारीची कुऱ्हाड कोसळलीय..राज्यातील आयटी क्षेत्रात काम करणाऱ्या नोकरदारवर्गात यामुळे प्रचंड भीतीचं वातावरण निर्माण झालंय... या आयटी कंपनीने आपल्या कर्मचाऱ्यांची कशी आर्थिक फसवणूक केलीये पाहूयात...
2025मध्ये 'थिंक टेक्नॉलॉजी इंडिया' कंपनी सुरू करण्यात आली. नोकरीवर रुजू करून घेताना कंपनीने कर्मचाऱ्यांकडून लॅपटॉपच्या नावाखाली प्रत्येकी 15000 रुपयांची सुरक्षा ठेव घेतली होती...त्यानंतर सुरुवातीला कंपनीनं कर्मचाऱ्यांना काही महिने वेतन दिलं. पण त्यानंतर मात्र 2026मध्ये कर्मचाऱ्यांचं पगार थकवायला सुरुवात केली... इतकंच नाहीतर वेतनाच्या नावावर कंपनीनं दिलेले चेकही बाऊन्स झाले...
एक दोन नव्हे तर तब्बल ७०० कर्मचाऱ्यांची झालेली फसवणूक समोर येताच हा प्रकार आयटी क्षेत्रातील मोठा घोटाळा असल्याचा दावा फोरम ऑफ आयटी इम्प्लॉयीज संघटनेनं केलाय. आधीच एआयच्या वाढत्या वापरामुळे आयटी क्षेत्रात नोकरकपातीची टांगती तलवार असतानाच अशा पद्धतीने तरुणांच्या हतबलतेचा गैरफायदा काही बोगस कंपन्या घेतायेत. थिंक टेक्नॉलॉजी इंडिया प्रायव्हेट लिमिटेड या आयटी कंपनीनं फसवणूक केल्यानं शेकडो कर्मचाऱ्यांवर आणि त्यांच्या कुटुंबियांवर सध्या उपासमारीची वेळ आलीये. गलेलठ्ठ पगाराचं आमिष दाखवून सुशिक्षित तरुणांची आर्थिक फसवणूक करणाऱ्या बोगस कंपन्यांनावर आता कामगार मंत्रालय काय कारवाई करतं हे पाहणं महत्वाचं आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.