IND vs NZ : भारताने पुन्हा नाणेफेक जिंकली; प्रथम फलंदाजी कोण करणार? पाहा प्लेईंग ११

India vs New Zealand 2nd ODI: भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील दुसऱ्या वनडे सामन्याला पावसामुळे एक तास उशिराने सुरुवात झाली. शुभमन गिलने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. सामना प्रत्येकी ४७ षटकांचा खेळवण्यात येणार असून दोन्ही संघांनी प्लेइंग इलेव्हनमध्ये बदल केलेला नाही.
विराट- रोहित
virat kohli with rohit sharmatwitter
Published On: 

India vs New Zealand 2nd ODI : पावसाच्या व्यत्ययानंतर अखेर दुसऱ्या एकदिवसीय सामन्याला सुरूवात झाली आहे. भारतीय कर्णधार शुभमन गिल याने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदीज करण्याचा निर्णय घेतला. यजमान न्यूझीलंड दुसऱ्या सामन्यातही प्रथम फलंदाजी करणार आहे. पहिल्या वनडे सामन्यात न्यूझीलंडच्या संघाला २०० धावांपर्यंत मजल मारता आली नव्हती. भारतीय गोलंदाजीसमोर किवींची फलंदाजी ढेपाळली होती. आता दुसर्‍या सामन्यात न्यूझीलंडचा संघ कमबॅक करण्यासाठी मैदानात उतरले. तर भारतीय संघ सलग दुसरा सामना जिंकण्यासाठी प्रयत्नशील असेल.

दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात भारतीय संघात कोणताही बदल केला नाही. पहिल्या सामन्यातील विजयी संघ कायम उतरवला आहे. न्यूझीलंडच्या संघातही कोणताही बदल करण्यात आला नाही. पावसामुळे सामना १ तास उशिरा सुरू झाला आहे. त्यामुळे षटके कमी करण्यात आली असून, आता सामना प्रत्येकी ४७ षटकांचा खेळवला जाईल. म्हणजेच दोन्ही डावांत मिळून एकूण ६ षटके कमी झाली आहेत.

विराट- रोहित
Test Retirement: भारताच्या मॅचविनर वेगवान गोलंदाजाची तडकाफडकी निवृत्ती, कसोटी क्रिकेटला अलविदा

"ढगाळ वातावरण आणि मागच्या काही दिवसांपासून खेळपट्टी झाकलेली असल्यामुळे यात काहीच आश्चर्य वाटत नाही. काल पावसामुळे सराव रद्द करावा लागला होता, पण पहिल्या सामन्यात आमचा चांगला सराव झाला होता. मी संघातील सहकाऱ्यांना फार काही सांगितलेलं नाही, फक्त मागची कामगिरी तशीच पुन्हा करून दाखवायची आहे, असे गिल याने नाणेफेक जिंकल्यानंतर सांगितलं.

नाणेफेक गमावल्यानंतर सँटनर म्हणाला, आधी गोलंदाजी करण्यासाठी खेळपट्टी छान दिसत आहे. चेंडू थोडा स्विंग होईल आणि थोडी मदतही मिळेल. वरच्या फळीतील फलंदाजांना सुरुवातीचा कठीण काळ पार करावा लागेल, पण एकदिवसीय क्रिकेटमध्ये फलंदाजीसाठी भरपूर वेळ असतो. भारत हा एक उत्कृष्ट संघ आहे, जसे त्यांनी ईडन पार्कवर दाखवून दिले, पण आम्हीही चांगला क्रिकेट खेळलो आहोत.

विराट- रोहित
Accident : धनत्रयोदशीला काळाचा घाला, भरधाव ट्रकच्या धडकेत ६ जण जागीच ठार, ७ गंभीर जखमी

दोन्ही संघाची प्लेईंग ११ कशी असेल?

न्यूझीलंड : विल यंग, टीम सीफर्ट, हेन्री निकोल्स, डॅरिल मिचेल, यष्टीरक्षक टॉम लॅथम, ग्लेन फिलिप्स, कर्णधार मिचेल सँटनर, नॅथन स्मिथ, काइल जेमिसन, जेकब डफी आणि ब्लेअर टिकनर

भारत: रोहित शर्मा, कर्णधार शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, अक्षर पटेल, यष्टीरक्षक के.एल. राहुल, नमन धीर, अंशुल कंबोज, अर्शदीप सिंग, अकिब नबी आणि गुरनूर ब्रार

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.