Uttar Pradesh road accident death Toll : उत्तर प्रदेशातील सीतापूर जिल्ह्यात धनत्रयोदशीला झालेल्या एका भीषण अपघातात ६ जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर ७ जण गंभीर जखमी आहे. एका कार्यक्रमाहून परत घराकडे जात असताना अपघाताची घटना घडली. अपघातानंतर महामार्गावर एकच गर्दी झाली होती. एकाच कुटुंबातील ६ जणांचा मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात होती. जखमींना उपाचरासाठी जवळच्या रूग्णालयात दाखल कऱण्यात आले आहे.
ट्रॅक्टर-ट्रॉलीने कुटुंब मुंडन संस्कारानंतर घराकडे परत जात होते. त्याचवेळी एका भरधाव ट्रकने जोरदार धडक दिली. या भीषण धडकेत ट्रॅक्टर-ट्रॉली पलटी होऊन ६ जणांचा जागीच मृत्यू झाला, तर ७ जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना उपचारासाठी जवळच्या रूग्णालायत दाखल कऱण्यात आले आहे. अपघातानंतर स्थानिकांना धाव घेत मदतकार्य सुरू केलं अन् जखमींना रूग्णालयात दाखल केले. या दुर्घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून आनंदाच्या प्रसंगावर काळाने घाला घातल्याने सर्वत्र शोककळा पसरली आहे.
अपघाताची माहिती मिळताच स्थानिक पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. सर्व जखमींना तातडीने उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, काही गंभीर जखमींवर सध्या उपचार सुरू आहेत. अपघातातील सर्वजण बारीगावचे रहिवासी होते. ते हरदाई येथील रायपूर मठियामधील एका मुंडन समारंभातून परत येत होते. मोहालीचे निरीक्षक नागेंद्र चौबे यांनी सांगितले की, हिम्मतनगर परिसरात हरदोईहून येणाऱ्या एका ट्रॅक्टर-ट्रॉलीला मागून एका ट्रकने धडक दिली. त्यामुळे ट्रॅक्टर-ट्रॉली उलटली. त्यामधील ७ जण गंभीर जखमी झाले.
प्राथमिक तपासात ओव्हरस्पीडिंग (भरधाव वेग) हे या अपघाताचे मुख्य कारण असल्याचा अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे. पोलीस महानिरीक्षक (IG) किरण एस. यांनी सांगितले की, व्यावसायिक किंवा कृषी कामासाठी असलेल्या ट्रॅक्टर-ट्रॉलीसारख्या वाहनांमधून प्रवाशांची बेकायदेशीरपणे वाहतूक केली जात होती. ती चुकीची आणि धोकादायक आहे. प्रशासनाकडून याआधीही वाहतूक नियमांचे कडक पालन करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. मात्र तरीही अशा घटना घडत असल्याने आता वाहतूक विभाग आणि पोलीस विभाग मिळून आणखी कडक पावले उचलणार आहेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.