RBI Repo Rate Hike : रेपो रेट वाढला, कर्जाचे हप्ते महागणार! जाणून घ्या तुमच्या खिशावर काय होणार परिणाम

RBI ने रेपो रेटमध्ये २५ बेसिस पॉइंट्सची वाढ केल्यास तो ५.२५% वरून ५.५०% होईल. याचा होम लोन, कार लोन आणि पर्सनल लोनच्या व्याजदरांसह EMI वर काय परिणाम होऊ शकतो, जाणून घ्या.
RBI repo rate hike October 2026 latest update :
RBI repo rate hike October 2026 latest update : Saam tv marathi
Published On: 

RBI repo rate hike October 2026 latest update : वाढती महागाई आणि आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचे वाढणारे दर रोखण्यासाठी रेपो रेट ०.२५% (२५ बेसिस पॉईंट्स) ने वाढवण्याचा निर्णय आरबीआयने घेतला आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेच्या मौद्रिक धोरण समितीने (Monetary Policy Committee) हा निर्णय घेतला. आरबीआयचे गव्हर्न संजय मल्होत्रा यांनी याची आज घोषणा केली.

या वाढीनंतर मुख्य रेपो रेट ५.२५% वरून ५.५०% वर पोहोचला आहे. रिझर्व्ह बँकेच्या या निर्णयामुळे आता होम लोन, कार लोन आणि पर्सनल लोनच्या व्याजाचे दर वाढणार आहेत. रेपो रेट वाढल्यामुळे सर्वसामान्य ग्राहकांच्या महिन्याच्या ईएमआय (EMI) चा भार वाढणार आहे.

हप्ते (EMI) का वाढणार?

रिझर्व्ह बँकेने दर वाढवल्यामुळे बँकांना मिळणारे कर्ज महाग झाले आहे. त्यामुळे बँका आता ग्राहकांकडून होम लोन, कार लोन, पर्सनल लोनवर जास्त व्याज वसूल करतील. जर तुमचे कोणतेही कर्ज सुरू असेल, तर आता तुमचा महिन्याचा हप्ता (EMI) वाढेल किंवा तुमच्या कर्जाचा कालावधी (Tenure) वाढेल.

RBI repo rate hike October 2026 latest update :
मोठी बातमी! राहुल गांधी, प्रियंका गांधी यांच्यावर गुन्हा दाखल; 'त्या' घटनेनंतर पोलीस ॲक्शन मोडमध्ये

शेवटचा रेपो रेट कधी वाढला?

आरबीआयने (RBI) यापूर्वी फेब्रुवारी २०२३ मध्ये रेपो रेट ०.२५% ने वाढवून ६.५% केला होता. त्यानंतर २०२३-२४ या संपूर्ण वर्षात या दरांमध्ये कोणताही बदल केला नव्हता. त्यानंतर २०२५ मध्ये आरबीआयने व्याजदरात कपात (कमी करणे) करायला सुरुवात केली होती. आता रेपो रेट ५.२५% वरून ५.५०% वर वाढवला आहे.

RBI repo rate hike October 2026 latest update :
Ladki Bahin Yojana : आनंदाची बातमी! लाडक्या बहिणींच्या खात्यावर 'या' दिवशी ३,००० येणार? महत्त्वाचं कारण आले समोर

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com