Test Retirement: भारताच्या मॅचविनर वेगवान गोलंदाजाची तडकाफडकी निवृत्ती, कसोटी क्रिकेटला अलविदा

Mohammed Shami Test Retirement: भारताचा अनुभवी वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीने ६ नोव्हेंबर २०२६ रोजी कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली. ६४ कसोटी सामन्यांत २२९ बळी घेणाऱ्या शमीने पदार्पणाच्या १३व्या वर्षपूर्तीच्या दिवशीच कसोटीला अलविदा केला.
Mohammed Shami announces retirement from Test cricket
Mohammed Shami announces retirement from Test crickettwitter
Published On: 

Mohammed Shami retirement news : टीम इंडियात पुनरागमन करण्याच्या आशा संपुष्टात आल्यामुळे भारताचा अनुभवी वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीने कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. बऱ्याच दिवसांपासून दुखापतीमुळे संघातून बाहेर असलेला शमी आता भारताकडून कसोटी सामना खेळताना दिसणार नाही. त्याच्या या अचानक घेतलेल्या निर्णयामुळे क्रिकेट वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. मोहम्मद शमीने सोशल मीडियावर पोस्ट करत कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली. (Mohammed Shami announces retirement from Test cricket) मोहम्मद शमी एकदिवसीय आणि टी२० क्रिकेटमध्ये खेळत राहणार आहे.

भारतीय स्टार वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीने ६ नोव्हेंबर २०२६ रोजी रात्री ११:३९ वाजता सोशल मीडियावर एक व्हिडिओ पोस्ट करून कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे . शमीने इतक्या रात्री उशिरा निवृत्ती का जाहीर केली, याचे चाहत्यांना आश्चर्य वाटले. ६ नोव्हेंबर ही तारीख शमीसाठी खूप खास आहे. शमीने या फॉरमॅटमध्ये भारतासाठी सर्वाधिक बळी घेणाऱ्या १२व्या गोलंदाजासह आपली कसोटी कारकीर्द संपवली. वेगवान गोलंदाजांच्या यादीत तो ६व्या क्रमांकावर आहे. त्याने कसोटी क्रिकेटमध्ये ६४ सामन्यांमध्ये २२९ बळी घेतले आहेत.

Mohammed Shami announces retirement from Test cricket
Maharashtra Politics: अजितदादांच्या पक्षात उलथापालथ होण्याची शक्यता, राज्यातील बड्या नेत्याच्या वक्तव्याने खळबळ

निवृत्तीसाठी ६ तारीखच का?

मोहम्मद शमीने ६ जानेवारी २०१३ रोजी पाकिस्तानविरुद्धच्या एकदिवसीय सामन्यातून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. त्यानंतर त्याच वर्षी त्याला कसोटी पदार्पण करण्याची संधी मिळाली. शमीने ६ नोव्हेंबर २०१३ रोजी कोलकाता येथील ईडन गार्डन्सवर वेस्ट इंडिजविरुद्ध आपला पहिला सामना खेळला. पदार्पणानंतर बरोबर १३ वर्षांनी, त्याच ६ नोव्हेंबर रोजी त्याने कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली.

Mohammed Shami announces retirement from Test cricket
Gold Rate: धनत्रयोदशीला सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण, सोनं ३५०० तर चांदी ९ हजारांनी घसरली; सुवर्णनगरीत गर्दीचा महापूर

मोहम्मद शमीची भावनिक पोस्ट

"मी पांढऱ्या जर्सीला निरोप देत आहे, पण तिच्याशी निगडित आठवणींना कधीच नाही. जेव्हा मी पहिल्यांदा भारतीय कसोटी जर्सी परिधान केली, तेव्हा माझं एकच स्वप्न होतं - देशासाठी काहीतरी करून दाखवायचं. त्यानंतर प्रत्येक विकेट, प्रत्येक संघर्ष, प्रत्येक दुखापत आणि प्रत्येक पुनरागमनाने मला काहीतरी शिकवलं. कसोटी क्रिकेट माझ्यासाठी केवळ क्रिकेटचा एक प्रकार नाही, तर तो माझ्या आयुष्याचा एक अत्यंत खास भाग राहिला आहे. आज, जड अंतःकरणाने आणि असंख्य सुंदर आठवणींसह, मी कसोटी क्रिकेटमधून निवृत्त होण्याचा निर्णय घेत आहे.

या प्रवासात मला पाठिंबा देणाऱ्या प्रत्येक सहकाऱ्याचे, प्रशिक्षकाचे, कुटुंबीयांचे आणि चांगल्या-वाईट काळात माझ्यावर विश्वास ठेवणाऱ्या लाखो भारतीयांचे मनःपूर्वक आभार!

माझ्या प्रतिभेवर विश्वास ठेवल्याबद्दल, मला प्रगतीच्या संधी दिल्याबद्दल आणि माझ्या क्रिकेट प्रवासात महत्त्वाची भूमिका बजावल्याबद्दल मी बीसीसीआय (BCCI) आणि क्रिकेट असोसिएशन ऑफ बंगालचे (CAB) सुद्धा मनःपूर्वक आभार मानतो. तुमचा पाठिंबा आणि विश्वास माझ्यासाठी नेहमीच खास राहील.

माझा शेवटचा कसोटी चेंडू जरी मैदानावर टाकला गेला असला, तरी भारतासाठी खेळण्याचा अभिमान माझ्या हृदयात कायम जिवंत राहील.

धन्यवाद, कसोटी क्रिकेट!

आपला,

शमी"

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.