Maharashtra Forts : मराठ्यांच्या शौर्याचे प्रतीक! महाराष्ट्रातील ७ अभेद्य किल्ले, शत्रूला जिंकणे होतं कठीण

Invincible Forts : सुट्ट्यांमध्ये महाराष्ट्रातील अभेद्य किल्ल्यांना आवर्जून भेट द्या. हा इतिहासातील मोलाचा खजिना आहे. लहान मुलांना जवळून इतिहासाची सफर करावा. अभेद्य किल्ल्यांची यादी नोट करा.
Invincible Forts
Maharashtra FortsAI PHOTO
Published On: 
Summary

महाराष्ट्रातील किल्ले मराठ्यांच्या शौर्याचे प्रतीक आहे.

महाराष्ट्रातील 'या' किल्ल्यांची संरक्षणरचना जबरदस्त होती.

महाराष्ट्रातील ७ अभेद्य किल्ल्यांची नावे

महाराष्ट्राला किल्ल्यांचा समृद्ध ऐतिहासिक वारसा लाभला आहे. सह्याद्रीच्या उंच डोंगररांगा, खोल दऱ्या, घनदाट जंगलं आणि अथांग समुद्रकिनारा यांचा उपयोग करून मराठ्यांनी अनेक दुर्गांची उभारणी केली. काही किल्ले इतक्या मोक्याच्या ठिकाणी बांधले होते की शत्रूला त्यांच्यापर्यंत पोहोचणे, आणि तटबंदी भेदणे अत्यंत कठीण जात असे. महाराष्ट्रातील अशाच अभेद्य किल्ल्यांबद्दल जाणून घेऊयात.

मुरुड-जंजिरा किल्ला

रायगड जिल्ह्यातील मुरुडजवळ अरबी समुद्रात एका बेटावर मुरुड-जंजिरा किल्ला उभारण्यात आला आहे. समुद्राच्या मध्यभागी असलेले त्याचे स्थान हेच त्याचे सर्वात मोठे संरक्षण होते. या किल्ल्याची सुरुवात पंधराव्या शतकात स्थानिक मच्छीमारांनी बांधलेल्या लाकडी संरक्षणरचनेपासून झाली. पुढे मलिक अंबरने इ.स. १५६७ मध्ये येथे भक्कम दगडी किल्ला उभारला. मराठे, मुघल आणि पोर्तुगीज अशा अनेक सत्तांनी हा किल्ला जिंकण्याचा प्रयत्न केला; मात्र त्यांना यश आले नाही.

रायगड किल्ला

सह्याद्रीच्या पर्वतरांगांमध्ये वसलेला रायगड किल्ला छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याची राजधानी म्हणून ओळखला जातो. इ.स. १६७४ मध्ये याच किल्ल्यावर शिवराज्याभिषेक सोहळा पार पडला. रायगडाची उंची, सभोवतालच्या खोल दऱ्या आणि नैसर्गिक कडे यामुळे शत्रूला किल्ल्यावर थेट हल्ला करणे सोपे नव्हते.

प्रतापगड किल्ला

महाबळेश्वरपासून सुमारे २४ किलोमीटर अंतरावर प्रतापगड किल्ला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी इ.स. १६५६ मध्ये या किल्ल्याची उभारणी केली. प्रतापगडाचा परिसर डोंगररांगा आणि घनदाट जंगलांनी वेढलेला आहे. त्यामुळे शत्रूला किल्ल्यापर्यंत पोहोचताना अनेक नैसर्गिक अडथळ्यांचा सामना करावा लागत असे.

Invincible Forts
Pune Fort : मराठा साम्राज्याचा शेवटचा किल्ला कोणता? पुण्याजवळ लपलाय 'हा' ऐतिहासिक खजिना, दिवाळीच्या सुट्टीत नक्की फिरा

सिंधुदुर्ग किल्ला

मालवणच्या समुद्रकिनाऱ्यापासून काही अंतरावर अरबी समुद्रात सिंधुदुर्ग किल्ला उभा आहे. त्या काळात कोकण किनारपट्टीवर पोर्तुगीज, इंग्रज आणि सिद्दी यांच्याकडून धोका होता. या सागरी शक्तींवर लक्ष ठेवण्यासाठी आणि मराठा आरमाराचे संरक्षण करण्यासाठी सिंधुदुर्ग महत्त्वाचा ठरला.

लोहगड किल्ला

लोणावळ्याजवळील लोहगड हा सह्याद्री पर्वतरांगांमधील प्रसिद्ध डोंगरी किल्ला आहे. लोहगडाचा मुख्य आकर्षण म्हणजे त्याची भक्कम तटबंदी आणि चार प्रवेशद्वारे. विंचूकाटा माचीची रचना विशेष लक्षवेधी आहे. तिच्या अरुंद आकारामुळे आणि कड्यांमुळे शत्रूला त्या भागातून पुढे जाणे आव्हानात्मक ठरत असे.

पन्हाळगड

कोल्हापूरजवळ पन्हाळा किल्ला वसलेला आहे. डोंगरावरील विस्तीर्ण पठारावर वसलेल्या या किल्ल्याला नैसर्गिक संरक्षण लाभले आहे. इ.स. १६६० मध्ये पन्हाळगडाच्या वेढ्यादरम्यान घडलेल्या घटना आणि त्यानंतरची पावनखिंडीची लढाई इतिहासात प्रसिद्ध आहे.

साल्हेर किल्ला

नाशिक जिल्ह्यातील बागलाण परिसरात साल्हेर किल्ला आहे. सह्याद्रीतील उंच किल्ल्यांपैकी एक असलेल्या साल्हेरला ऐतिहासिक आणि लष्करीदृष्ट्या विशेष महत्त्व आहे. इ.स. १६७२ मध्ये साल्हेरच्या परिसरात मराठे आणि मुघल यांच्यात मोठी लढाई झाली. या लढाईत मराठ्यांनी मुघल सैन्याचा पराभव केला.

टीप : वरील माहितीचा उद्देश केवळ ऐतिहासिक वारसा आणि पर्यटन स्थळांची ओळख करून देणे हा आहे. यातील माहिती इंटरनेटवरील उपलब्ध सोर्समधून घेण्यात आली. कोणत्याही ऐतिहासिक वादाशी किंवा दाव्याशी आमचा संबंध नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.