Raigad Fort : रायगड किल्ल्याची 'ही' ५ वैशिष्ट्ये तुम्हाला माहितेय का? तिसरे वाचून थक्क व्हाल

Shreya Maskar

रायगड किल्ला

रायगड किल्ला रायगड जिल्ह्यात वसलेला आहे. समुद्रसपाटीपासून किल्ल्याची उंची सुमारे ८२० मीटर (२,७०० फूट) इतकी आहे.

Raigad Fort | google

स्वराज्याची राजधानी

सह्याद्रीच्या पर्वतरांगांमध्ये वसलेला रायगड हा भव्य किल्ला छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याची राजधानी म्हणून ओळखला जातो. याच किल्ल्यावर ६ जून १६७४ रोजी शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला.

Capital of Swarajya | google

किल्ल्याची रचना

उंच डोंगर, भक्कम तटबंदी, ऐतिहासिक दरवाजे, राजवाड्याचे अवशेष आणि महाराजांची समाधी यांमुळे रायगड हा केवळ पर्यटन स्थळ नसून महाराष्ट्राच्या अस्मितेचे प्रतीक आहे.

Fort structure | google

किल्ल्याचे जुने नाव

रायगड किल्ल्याचे जुने नाव रायरी असे होते. छत्रपती शिवाजी महाराजांनी १६५६ च्या सुमारास हा किल्ला चंद्रराव मोरे यांच्या ताब्यातून जिंकून घेतला. स्वराज्याची राजधानी म्हणून त्याचे महत्त्व लक्षात घेऊन पुनर्बांधणी केली.

Old name of the fort | google

हिरकणी बुरूज

हिरकणी बुरूज हा रायगडावरील प्रसिद्ध बुरूज आहे. लोककथेनुसार, हिरकणी नावाच्या एका धाडसी आईने आपल्या बाळासाठी रात्री किल्ल्याचा अवघड कडा उतरून जाण्याचे धाडस केले. तिच्या धैर्याची आठवण म्हणून या ठिकाणाला हिरकणी बुरूज असे नाव पडल्याची कथा सांगितली जाते.

Diamond tower | google

टकमक टोक

टकमक टोक हे किल्ल्यावरील उंच कड्यावरील ठिकाण आहे. येथून सह्याद्रीच्या डोंगररांगा आणि खोल दऱ्यांचे विहंगम दृश्य दिसते. मात्र, कड्याच्या जवळ जाताना विशेष काळजी घ्यावी; पावसाळ्यात आणि धुक्यात धोका वाढू शकतो.

Takmak Tok | google

किल्ल्यावर कसे जाल?

मुंबई–पनवेल–महाड मार्गे पाचाड किंवा रायगडाच्या पायथ्याशी जाता येते. किल्ल्यावर जाण्यासाठी रोपवेची सुविधा उपलब्ध असते. पायथ्यापासून पायऱ्यांनी किल्ल्यावर जाता येते. ऑक्टोबर ते फेब्रुवारी हा काळ तुलनेने आल्हाददायक हवामानामुळे किल्ला पाहण्यासाठी चांगला असतो.

How to get to the castle? | google

टीप

वरील माहितीचा उद्देश केवळ ऐतिहासिक वारसा आणि पर्यटन स्थळांची ओळख करून देणे हा आहे. यातील माहिती इंटरनेटवरील उपलब्ध सोर्समधून घेण्यात आली. कोणत्याही ऐतिहासिक वादाशी किंवा दाव्याशी आमचा संबंध नाही.

Note | google

NEXT : स्वराज्याच्या इतिहासातील सुवर्णपान! एकाच डोंगररांगेवर वसलंय दोन किल्ले, मुंबईजवळच आहे खास लोकेशन

Mumbai Fort | AI PHOTO
येथे क्लिक करा...