Mumbai Fort : स्वराज्याच्या इतिहासातील सुवर्णपान! एकाच डोंगररांगेवर वसलंय दोन किल्ले, मुंबईजवळच आहे खास लोकेशन

Shreya Maskar

मुंबई-पुणे

पुणे जिल्ह्यातील पुरंदर किल्ला हा महाराष्ट्राच्या इतिहासातील एक महत्त्वाचा, ऐतिहासिक वारसा लाभलेला किल्ला आहे. डोंगरमाथ्यावर वसलेला हा दुर्ग त्याच्या भक्कम तटबंदीमुळे, सामरिक महत्त्वामुळे आणि ऐतिहासिक घटनांमुळे ओळखला जातो.

Mumbai-Pune | google

पुरंदर किल्ला

पुरंदर किल्ल्याची समुद्रसपाटीपासून उंची सुमारे ४,४७२ फूट (१,३६३ मीटर) आहे. विविध राजवटींनी या किल्ल्यावर सत्ता गाजवली. पुरंदर किल्ला मुंबईजवळ आहे. तुम्ही येथे वीकेंडला जाऊ शकता.

Purandar Fort | google

पुरंदरचा तह

इ.स. १६६५ मध्ये मिर्झाराजा जयसिंग आणि दिलेरखान यांच्या नेतृत्वाखाली मुघल सैन्याने पुरंदर किल्ल्याला वेढा घातला. या संघर्षात मराठा सरदार मुरारबाजी देशपांडे यांनी अतुलनीय शौर्य गाजवले. किल्ल्याच्या संरक्षणासाठी लढताना त्यांना वीरमरण आले.

Purandar | google

इतिहासातील महत्त्वाची घटनी

१२ जून १६६५ रोजी झालेल्या पुरंदरच्या तहानुसार शिवाजी महाराजांना २३ किल्ले मुघलांच्या ताब्यात द्यावे लागले. मराठा इतिहासातील ही एक महत्त्वाची राजकीय आणि लष्करी घटना होती.

important event in history | google

छत्रपती संभाजी महाराजांचे जन्मस्थान

पुरंदर किल्ल्याचे आणखी एक मोठे ऐतिहासिक महत्त्व म्हणजे छत्रपती संभाजी महाराजांचा जन्म याच किल्ल्यावर झाला. ते छत्रपती शिवाजी महाराजांचे ज्येष्ठ पुत्र आणि स्वराज्याचे दुसरे छत्रपती होते.

Birth place of Chhatrapati Sambhaji Maharaj | google

जुळे किल्ले

पुरंदर आणि वज्रगड (रुद्रमाळ) हे पुणे जिल्ह्यातील सासवडजवळ असलेले जुळे किल्ले आहेत. किल्ल्याची तटबंदी आणि बुरूज मजबूत आहेत. शत्रूच्या आक्रमणापासून संरक्षण करण्यासाठी उभारलेली दुर्गरचना पाहायला नक्की जा.

Twin Castles | google

किल्ल्यावर जाण्यासाठी सर्वोत्तम वेळ

पुरंदर किल्ल्याला भेट देण्यासाठी ऑक्टोबर ते फेब्रुवारी हा काळ साधारणपणे अनुकूल असतो. पावसाळ्यात परिसर हिरवागार होतो; मात्र पायवाटा निसरड्या होऊ शकतात.

Best time to visit the fort | google

टीप

वरील माहितीचा उद्देश केवळ ऐतिहासिक वारसा आणि पर्यटन स्थळांची ओळख करून देणे हा आहे. यातील माहिती इंटरनेटवरील उपलब्ध सोर्समधून घेण्यात आली. कोणत्याही ऐतिहासिक वादाशी किंवा दाव्याशी आमचा संबंध नाही.

Note | google

NEXT : पावसाळ्यात धुक्याची चादर, हिवाळ्यात गारवा; सिंहगड किल्ला 'का' इतका खास?

Sinhagad Fort | AI PHOTO
येथे क्लिक करा...