Shreya Maskar
सिंहगड किल्ला महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यातील हवेली तालुक्यात, डोणजे गावाजवळ सह्याद्रीच्या पर्वतरांगेत वसलेला आहे. डोंगरमाथ्यावर वसलेला हा दुर्ग ऐतिहासिक महत्त्वासोबतच निसर्ग सौंदर्यासाठी प्रसिद्ध आहे.
सिंहगड किल्ल्याचे जुने नाव कोंढाणा असे होते. त्याचे भौगोलिक स्थान आणि उंच कडे यामुळे संरक्षणाच्या दृष्टीने त्याला मोठे महत्त्व होते.
तानाजी मालुसरे यांनी आपल्या मावळ्यांसह किल्ल्यावर चढाई केली. या युद्धात त्यांनी अतुलनीय शौर्य दाखवले; मात्र लढताना त्यांना वीरमरण आले. तानाजींच्या बलिदानाची बातमी ऐकल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांनी 'गड आला, पण सिंह गेला' असे उद्गार काढल्याची प्रसिद्ध ऐतिहासिक परंपरा आहे.
सिंहगड किल्ला समुद्रसपाटीपासून साधारण १,३०० मीटर उंचीवर आहे. त्याची तटबंदी, बुरुज, प्रवेशद्वारे आणि डोंगराच्या नैसर्गिक कड्यांचा उपयोग करून केलेली संरक्षणव्यवस्था ही त्याची प्रमुख वैशिष्ट्ये आहेत.
ट्रेकिंगप्रेमींसाठी सिंहगड हा पुण्याजवळील लोकप्रिय पर्याय आहे. किल्ल्यावर जाण्यासाठी पायथ्यापासून पायी चढाई करता येते. सिंहगड गावाच्या मार्गाने साधारण २.७ किलोमीटरचा ट्रेक असून, चालण्याचा वेग आणि मार्गाच्या परिस्थितीनुसार साधारण दीड ते दोन तास लागू शकतात.
पुणे दरवाजा, कल्याण दरवाजा, तटबंदी आणि बुरुज, पाण्याची टाकी या किल्ल्यावरील महत्त्वाच्या वास्तू आहेत. आजूबाजूच्या सह्याद्री पर्वतरांगांचे विहंगम दृश्य पाहायला मिळते.
सिंहगड किल्ल्याजवळ खडकवासला धरण, राजगड किल्ला, पानशेत धरण अशी पर्यटन स्थळे आहेत. येथे तुम्ही फॅमिली ट्रिप प्लान करू शकता.
वरील माहितीचा उद्देश केवळ ऐतिहासिक वारसा आणि पर्यटन स्थळांची ओळख करून देणे हा आहे. यातील माहिती इंटरनेटवरील उपलब्ध सोर्समधून घेण्यात आली. कोणत्याही ऐतिहासिक वादाशी किंवा दाव्याशी आमचा संबंध नाही.