Shreya Maskar
पुणे जिल्ह्यातील जुन्नरजवळ असलेला शिवनेरी किल्ला हा महाराष्ट्राच्या इतिहासातील अत्यंत महत्त्वाचा आणि प्रसिद्ध किल्ला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म याच किल्ल्यावर १९ फेब्रुवारी १६३० रोजी झाला.
सह्याद्रीच्या डोंगररांगांमध्ये वसलेला शिवनेरी किल्ला ऐतिहासिक वारसा, मजबूत तटबंदी, सात प्रवेशद्वारे आणि प्राचीन जलव्यवस्थेसाठी ओळखला जातो.
शिवनेरी हा प्राचीन काळापासून अस्तित्वात असलेला डोंगरी दुर्ग आहे. सातवाहन काळापासून जुन्नर परिसराला महत्त्व होते. पुढे विविध राजवटींनी या किल्ल्याचा वापर आणि विकास केला. यादव, बहमनी आणि निजामशाहीच्या काळातही या प्रदेशाला महत्त्व होते.
१ ते २ तासाचा ट्रेक करून तुम्ही शिवनेरी किल्ल्यावर पोहचाल. पावसाळ्यात पायऱ्या निसरड्या होऊ शकतात. त्यामुळे सावधगिरी बाळगावी.
किल्ल्याची रचना उंच डोंगरावर असून नैसर्गिक कड्यांमुळे संरक्षणाला मदत होत असे. प्राचीन पाण्याच्या टाक्या आणि जलसाठे ही येथील महत्त्वाची वैशिष्ट्ये आहेत. किल्ल्याच्या परिसरातून जुन्नर आणि सह्याद्रीच्या डोंगररांगांचे सुंदर दृश्य दिसते.
किल्ल्याची सात प्रवेशद्वारे, अंबरखाना, गंगा-जमुना पाण्याची टाकी, बदामी तलाव, शिवाई देवी मंदिर नक्की पाहा. शिवनेरी किल्ला जुन्नर परिसर प्राचीन व्यापारी मार्ग आणि वसाहतींसाठी महत्त्वाचा होता.
मुंबई–कल्याण–माळशेज घाट–जुन्नर या मार्गाने जाता येते. तसेच पुणे स्टेशनला उतरून पुढे रिक्षा किंवा बसने शिवनेरी किल्ल्यावर पोहचला.
वरील माहितीचा उद्देश केवळ ऐतिहासिक वारसा आणि पर्यटन स्थळांची ओळख करून देणे हा आहे. यातील माहिती इंटरनेटवरील उपलब्ध सोर्समधून घेण्यात आली. कोणत्याही ऐतिहासिक वादाशी किंवा दाव्याशी आमचा संबंध नाही.