Historical Mystery Places : हजारो वर्षांचा इतिहास अन् अनेक रहस्यं! भारतातील 'ही' ७ प्राचीन ठिकाणं पाहिली आहेत का?

Shreya Maskar

भारत

भारताचा इतिहास हजारो वर्षांचा असून देशाच्या कानाकोपऱ्यात अनेक प्राचीन वास्तू, गूढ मंदिरे, ऐतिहासिक किल्ले आणि रहस्यमय ठिकाणे लपलेली आहेत. इतिहास आणि रहस्यांनी भरलेल्या भारतातील ७ प्राचीन ठिकाणांविषयी जाणून घेऊया.

India | pinterest

धोलावीरा

गुजरातमधील धोलावीरा हे सिंधू संस्कृतीतील एक महत्त्वाचे प्राचीन शहर होते. हजारो वर्षांपूर्वी येथे नियोजनबद्ध रस्ते, पाणीसाठ्याची व्यवस्था, निवासी भाग आणि सार्वजनिक वास्तू अस्तित्वात होत्या.

Dholaweera | pinterest

दौलताबाद किल्ला

उंच डोंगरावर बांधलेला दौलताबाद किल्ला खंदक, वळणावळणाचे प्रवेशमार्ग आणि शत्रूला गोंधळात टाकणाऱ्या संरक्षणव्यवस्थेसाठी प्रसिद्ध आहे. किल्ल्याचा इतिहास यादव राजवटीपासून दिल्ली सल्तनतीपर्यंत अनेक सत्तांशी जोडलेला आहे. हे ठिकाण छत्रपती संभाजीनगरजवळ आहे.

Daulatabad Fort | pinterest

कैलास मंदिर

महाराष्ट्रातील वेरूळ लेण्यांमधील कैलास मंदिर हे भारतीय स्थापत्यकलेचा अद्भुत नमुना आहे. संपूर्ण मंदिर एकाच विशाल खडकातून वरून खाली कोरून तयार करण्यात आले आहे.

Kailas Temple | pinterest

कोणार्क सूर्य मंदिर

ओडिशा येथे कोणार्क सूर्य मंदिर आहे. सूर्यदेवाच्या भव्य रथाच्या आकारात बांधलेल्या या मंदिराला दगडात कोरलेली चाके आणि घोडे यांमुळे वेगळी ओळख मिळाली आहे. मंदिराच्या रचनेतील खगोलशास्त्रीय आणि कलात्मक बारकावे इतिहासप्रेमींना आकर्षित करतात.

Konark Sun Temple | pinterest

हम्पी

कर्नाटकातील हम्पी हे प्राचीन विजयनगर साम्राज्याच्या वैभवाची साक्ष देणारे ऐतिहासिक स्थळ आहे. येथे विशाल दगडांच्या टेकड्या, मंदिरांचे अवशेष, राजवाड्यांचे अवशेष आणि प्राचीन बाजारपेठांचे पुरावे पाहायला मिळतात.

Hampi | pinterest

भीमबेटका शैलाश्रय

मानवाच्या प्रागैतिहासिक जीवनाचा मागोवा घ्यायचा असेल तर मध्य प्रदेशातील भीमबेटका हे महत्त्वाचे ठिकाण आहे. येथे खडकांवरील चित्रांमधून प्राचीन मानवांचे दैनंदिन जीवन, प्राणी, शिकारीचे प्रसंग आणि सामूहिक उपक्रम यांची माहिती मिळते.

Bhimbetka Shailasraya | pinterest

टीप

वरील माहितीचा उद्देश केवळ ऐतिहासिक वारसा आणि पर्यटन स्थळांची ओळख करून देणे हा आहे. यातील माहिती इंटरनेटवरील उपलब्ध सोर्समधून घेण्यात आली. कोणत्याही ऐतिहासिक वादाशी किंवा दाव्याशी आमचा संबंध नाही.

Note | pinterest

NEXT : गर्दीपासून दूर, इतिहासाच्या जवळ; महाराष्ट्रातील 'या' ७ गड-किल्ल्यावरून तुमची नजर हटणारच नाही

Maharashtra Fort | AI PHOTO
येथे क्लिक करा...