Shreya Maskar
रोहिडा किल्ल्याला विचित्रगड असेही म्हणतात. रोहिडा किल्ला पुणे जिल्ह्यात भोर येथे आहे. किल्ल्याचे भव्य दरवाजे, तटबंदी, बुरुज सुंदर आहेत. ट्रेकिंगचा आनंद घ्या.
वाई परिसर, सातारा जिल्ह्यात केंजळगड आहे. येथे गेल्यावर वैशिष्ट्यपूर्ण चौकोनी-तिरकस आकाराचा पठारी भाग, दगडी पायऱ्या, पाण्याची टाकी पाहायला मिळेल.
रायगड जिल्ह्यात सांक्षी किल्ला वसलेला आहे. कातळात कोरलेल्या पाण्याच्या टाक्या, छोटी गुहा, दर्गा आणि आसपासच्या डोंगरांचे दृश्य येथे पाहायला मिळते.
पुणे जिल्ह्यात मुळशी परिसरात घनगड किल्ला वसलेला आहे. सह्याद्रीतील जुन्या डोंगरी किल्ल्यांपैकी एक हे ठिकाण आहे.
विरारजवळ अर्नाळा जलदुर्ग आहे. समुद्राने वेढलेली तटबंदी, जुन्या वास्तूंचे अवशेष आणि किनारपट्टीचे दृश्य येथे पाहायला मिळते.
नांदेड जिल्ह्यात कंधार किल्ला वसलेला आहे. दख्खनच्या मध्ययुगीन राजवटींच्या इतिहासाशी संबंधित महत्त्वाचा भुईकोट किल्ला आहे.
धाराशिव जिल्ह्यात नळदुर्ग किल्ला आहे. हे दख्खनच्या मध्ययुगीन स्थापत्यकलेचे आणि लष्करी बांधकामाचे महत्त्वाचे उदाहरण आहे.
वरील माहितीचा उद्देश केवळ ऐतिहासिक वारसा आणि पर्यटन स्थळांची ओळख करून देणे हा आहे. यातील माहिती इंटरनेटवरील उपलब्ध सोर्समधून घेण्यात आली. कोणत्याही ऐतिहासिक वादाशी किंवा दाव्याशी आमचा संबंध नाही.