Island Forts : चारही बाजूंनी पाणी अन्...; बेटांवर असलेले जगातील ७ रहस्यमय किल्ले, भव्यता पाहून व्हाल थक्क

Shreya Maskar

बेटांवर वसलेले किल्ले

जगभरात अनेक ऐतिहासिक किल्ले समुद्राच्या मध्यभागी, लहान बेटांवर किंवा सरोवरांनी वेढलेल्या भूभागावर उभारलेले आहेत. या किल्ल्यांची रचना, मजबूत तटबंदी आणि नैसर्गिक संरक्षणव्यवस्था पर्यटकांना आकर्षित करते.

Forts situated on islands | google

मुरुड-जंजिरा किल्ला

महाराष्ट्र रायगड जिल्ह्यात मुरुड-जंजिरा किल्ला वसलेला आहे. अरबी समुद्रातील खडकाळ बेटावर उभारलेला हा किल्ला मजबूत तटबंदी, बुरुज आणि ऐतिहासिक तोफांसाठी ओळखला जातो.

Murud-Janjira Fort | google

सुओमेन्लिना समुद्री किल्ला

सुओमेन्लिना समुद्री किल्ला फिनलंडची राजधानी हेलसिंकी जवळील सहा बेटांच्या समूहावर बांधलेला आहे.त्याचे बांधकाम १७४८ मध्ये स्वीडिश सत्तेच्या काळात सुरू झाले.

Suomenlinna sea fort | google

ओलाविनलिन्ना किल्ला

ओलाविनलिन्ना किल्ला हा फिनलंड सावोनलिन्ना येथे वसलेला आहे. ओलाविनलिन्ना हा १४७५ मध्ये बांधलेला मध्ययुगीन किल्ला आहे. किल्ल्याच्या मजबूत दगडी भिंती, उंच बुरुज आणि सरोवराने वेढलेले स्थान यामुळे त्याला विशेष ऐतिहासिक महत्त्व प्राप्त झाले आहे.

Olawinlinna Fort | google

फोर्ट जेफरसन

अमेरिकेत फ्लोरिडा येथील ड्राय टॉर्टुगस येथे फोर्ट जेफरसन वसलेला आहे. फोर्ट जेफरसन हा अमेरिकेतील प्रचंड विटांच्या संरक्षणात्मक किल्ल्यांपैकी एक आहे. मेक्सिकोच्या आखातातील दुर्गम बेटसमूहावर असलेल्या या किल्ल्याचे बांधकाम १९व्या शतकात सुरू झाले.

Fort Jefferson | google

बेटांवरील किल्ले बांधण्याचे उद्दिष्टे

बेटांवर किल्ले उभारण्यामागे प्रामुख्याने संरक्षणात्मक कारणे होती. चारही बाजूंनी पाणी असल्यामुळे शत्रूला थेट हल्ला करणे कठीण होत असे. बोटींच्या मदतीने प्रवेश नियंत्रित करता येत असे आणि समुद्री मार्गांवर लक्ष ठेवणेही सोपे होत असे.

Objectives of building forts on islands | google

किल्ल्याचे वैशिष्ट्ये

आज हे किल्ले त्यांच्या इतिहासामुळे, स्थापत्यकलेमुळे आणि निसर्गरम्य स्थानामुळे जगभरातील पर्यटकांना आकर्षित करतात.

Features of the fort | google

टीप

वरील माहितीचा उद्देश केवळ ऐतिहासिक वारसा आणि पर्यटन स्थळांची ओळख करून देणे हा आहे. यातील माहिती इंटरनेटवरील उपलब्ध सोर्समधून घेण्यात आली. कोणत्याही ऐतिहासिक वादाशी किंवा दाव्याशी आमचा संबंध नाही.

Note | google

NEXT : रविवारची सुट्टी बनवा खास! पिंपरी-चिंचवडजवळील 'ही' ७ सुंदर ऐतिहासिक ठिकाणे फिरा

Pimpri-Chinchwad | AI PHOTO
येथे क्लिक करा...