Shreya Maskar
पिंपरी-चिंचवड हे ऐतिहासिक वारसा, इतिहास, स्वातंत्र्यलढा आणि प्राचीन धार्मिक स्थळांसाठीही ओळखला जाते. शहरापासून जवळच अनेक जुने किल्ले, ऐतिहासिक वाडे आणि वारसास्थळे आहेत. वीकेंडला ट्रिप प्लान करा.
चाकण किल्ल्याला संग्रामदुर्ग असेही म्हणतात. चाकण परिसरातील संग्रामदुर्ग हा मराठा इतिहासातील महत्त्वाचा किल्ला आहे. १६६० मध्ये मुघल सैन्याने चाकणच्या किल्ल्याला वेढा दिला होता.
इंदुरी किल्ला तळेगावजवळील इंदुरी गावात इंद्रायणी नदीच्या परिसरात आहे. या किल्ल्याचे स्थान आणि उरलेली तटबंदी पेशवेकालीन तसेच मराठा काळातील स्थानिक इतिहासाची आठवण करून देतात.
कार्ला लेणी लोणावळ्याजवळ आहेत. कार्ला लेणी ही प्राचीन बौद्ध शैलगृह वास्तुकलेचा उत्कृष्ट नमुना आहेत. या लेण्यांचा इतिहास साधारण इ.स.पूर्व दुसरे शतक ते इ.स. दुसरे शतक या कालखंडापर्यंत पोहोचतो.
विसापूर किल्ला लोहगडच्या जवळ असून त्याचा विस्तीर्ण माथा, तटबंदी आणि ऐतिहासिक अवशेष यांसाठी तो ओळखला जातो. पेशवे काळात बाळाजी विश्वनाथ यांच्या कारकिर्दीत १७१३ ते १७२० दरम्यान या किल्ल्याच्या बांधकाम झाले.
लोहगड किल्ला पिंपरी-चिंचवडपासून साधारण ५०–६५ किमीच्या परिसरात आहे. लोहगड हा सह्याद्रीतील प्रसिद्ध डोंगरी किल्ला असून त्याची उंची समुद्रसपाटीपासून सुमारे १,०३३ मीटर आहे.
शनिवारवाडा पिंपरी-चिंचवडच्या आग्नेयेला सुमारे १४ ते १५ किलोमीटर अंतरावर आहे. तो पुणे शहराच्या मध्यवर्ती भागात, शनिवार पेठेत स्थित आहे.
वरील माहितीचा उद्देश केवळ ऐतिहासिक वारसा आणि पर्यटन स्थळांची ओळख करून देणे हा आहे. यातील माहिती इंटरनेटवरील उपलब्ध सोर्समधून घेण्यात आली. कोणत्याही ऐतिहासिक वादाशी किंवा दाव्याशी आमचा संबंध नाही.