मुंबई/पुणे

Ulhas River : उल्हास नदी मोकळा श्वास घेणार; प्रदूषण रोखण्यासाठी पालिकेने घेतला मोठा निर्णय

Ulhas River News : उल्हास नदी मोकळा श्वास घेणार आहे. नदीतील प्रदुषण रोखण्यासाठी पालिकेने मोठा निर्णय घेतला आहे.

Saam Tv

अभिजीत देशमुख, साम टीव्ही

उल्हास नदीतील जलपर्णी काढण्याचे काम सुरू असून कल्याण डोंबिवली महापालिका आयुक्त अभिनव यांनी आज सोमवारी या कामाची पाहणी केली. कल्याण डोंबिवली महापालिका आयुक्त अभिनव यांनी या नदीत पालिका क्षेत्रातील गाळेगाव आणि आंबिवलीमधील नाल्यांचे सांडपाणी जात असल्याचे पाहिले. त्यानंतर सांडपाणी नदी प्रदूषणाला कारणीभूत असल्याचे मान्य केलं.

या सांडपाण्यावर प्रक्रिया करणारे प्रकल्प तातडीने तयार करण्यासाठी आठ दिवसात डीपीआर तयार करून शासनाकडे पाठवणार असल्याचे सांगितले पालिकेतील अधिकारी आणि स्थानिक नागरिक यांनी दिलेल्या सूचनेनुसार या सांडपाण्यावर कायमस्वरूपी उपाययोजना करण्याबाबत तीन-चार प्रकारे काम करणार असल्याचे आयुक्त गोयल यांनी सांगितले .

आयुक्त गोयल यांनी वाढत्या जीन्स कारखान्यांमुळे नदी प्रदूषण होत असून हे नदी प्रदूषण रोखण्यासाठी राज्य शासनाने ग्रामपंचायत, जिल्हा परिषद ,प्रदूषण नियंत्रण महामंडळ महापालिका या सर्वच प्राधिकरणांना सूचना दिल्या आहेत. सर्व प्राधिकरणे संयुक्तपणे नदी प्रदूषण कमी करण्यासाठी काम करणार आहेत. शासनाच्या "चला जाणुया नदीला "या उपक्रमांतर्गत नदी स्वच्छता आणि नदीचे संवर्धन या विषयावर काम करणार असल्याचं सांगितलं.

तर यावेळी आयुक्तांनी पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर नालेसफाईच्या कामांसाठी नाल्यांची पाहणी केली. पावसाळ्यापूर्वी नागरिकांना त्रास होऊ नये यासाठी नालेसफाई महत्त्वाची आहे. शहरातील मोठ्या नाल्यांची पाहणी करून लवकरात लवकर युद्ध पातळीवर नालेसफाई केली जाणार असल्याचे आश्वासन आयुक्त गोयल यांनी दिले.

नालेसफाईच्या कामावर कार्यकारी अभियंता शहर अभियंता यांच्यासह आपण स्वतः देखील सातत्याने मॉनिटरिंग करून नालेसफाईच्या कामात कोणताही हलगर्जीपणा होणार नाही याची काळजी घेतली जाणार असल्याचे आयुक्तांनी सांगितले. तसेच नालेसफाईबाबत नागरिकांच्या प्रतिक्रिया घेत त्यांच्या तक्रारीची देखील दखल घेतली जाईल, असे आश्वासन आयुक्तांनी नालेसफाई पाहणीदरम्यान दिले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

जळगावच्या ST बसचा सूरतमध्ये अपघात, ८ जणांचा मृत्यू; जिल्हाधिकाऱ्यांनी दिली सविस्तर माहिती

रत्नागिरीतील आरे समुद्रकिनारी कोल्हापूरचे दोघे विद्यार्थी बुडाले, एकाचा मृत्यू

हेड कोच मैदानात उतरवून आखणार प्लॅन; ICC कडून क्रिकेटच्या ५ नियमात मोठे बदल

अबब! मुंबईच्या वरळीत फ्लॅटचं भाडं तब्बल 18 कोटी, VIDEO

कांदा उत्पादक पेटला, महामार्ग रोखला, कांद्याच्या हमीभावासाठी शेतकरी रस्त्यावर

SCROLL FOR NEXT