अक्षय बडवे, पुणे प्रतिनिधी
Gun license pune : वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणात विविध खुलासे होत असताना आता तिचे पती शशांक हगवणे आणि दीर सुशील हगवणे यांनी खोटे रहिवासी पत्ते पाठवत पुणे पोलिसांकडून शस्त्र मिळवले असल्याची माहिती समोर आली असता आता त्या दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शशांक वर वारजे पोलिस ठाण्यात तर सुशील वर कोथरूड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. २०२२ मध्ये पुणे जिल्ह्यातील मुळशी तालुक्यात राहत असलेल्या हगवणे बंधू यांनी पुणे शहर हद्दीत राहत असल्याचा पुरावा देत पुणे पोलिसांकडून शस्त्र परवाना घेतला होता. हा परवाना तत्कालीन अपर पोलिस आयुक्त (प्रशासन) जालिंदर सुपेकर यांनी दिला अशी चर्चा आहे. शिवाय सुपेकर हे हगवणे बंधू यांचे मामा आहेत.
शसत्रपरवान्यासाठी अर्ज स्थानिक पोलीस ठाण्यात केला जातो. पोलीस ठाण्यातून तो पोलीस उपायुक्तकडे येतो त्यानंतर तो मंजुरासठी माझ्याकडे अतिरिक्त पोलीस आयुक्त प्रशासन या नात्याने आला होता. मी तो प्रस्ताव पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांच्याकडे मांडला. त्यांनी त्याला मान्यता दिल्यावर अंतिम सही अतिरिक्त आयुक्त म्हणून मी केली. यात महत्वाची भुमिका कोथरुड आणि वारजे पोलिसांची आहे. त्यांच्याकडून प्रस्ताव आला होता, असं म्हणत सुपेकर यांनी या प्रकरणाशी आपला संबंध नसल्याचं सांगितलं आहे.
२०२२ मध्ये अमिताभ गुप्ता हे पुणे शहराचे पोलिस आयुक्त होते आणि जालिंदर सुपेकर अपर पोलिस आयुक्त (प्रशासन) होते. दोघांचे ही कार्यालय पुणे पोलिस आयुक्तालयात असल्याने शस्त्र परवान्यासाठी आलेला प्रत्येक अर्ज हा या दोघांशिवाय मंजूर होत नसे. कदाचित असं असल्यामुळेच २०२१ ते २०२३ मध्ये एकूण शस्त्र परवाने दिले गेल्याची आकडेवारी जर पाहिली तर एखाद्या खिरापती सारखे परवाने वाटले आहेत असं म्हणलं तर चुकीचं ठरणार नाही. २०२१ ते २०२३ या तीन वर्षात तब्बल ६५९ शस्त्र परवाने दिल्याचे दिसून आलं आहे. यातील आश्चर्यकारक बाब याच काळात एकही शस्त्र परवाना रद्द झाला नाही.
२०२२ मध्ये एका वर्षात तब्बल २७९ शस्त्र परवाने दिले गेले.२०२३ आणि २०२४ (फक्त जानेवारी) मध्ये २२८ परवाने मंजूर झाले. गुप्ता यांची डिसेंबर २०२२ मध्ये बदलीनंतर रितेश कुमार यांच्याकडे पुणे शहराचा आयुक्त पदाची जबाबदारी दिली गेली. २०२४ च्या जानेवारी मध्ये अमितेश कुमार हे पुण्याचे पोलिस आयुक्त झाले आणि त्यांनी संपूर्ण वर्षात फक्त २४ नवीन परवाने दिले तर तब्बल १११ परवाने त्यांनी रद्द केले.
गेल्या पाच पर्यंत पुणे शहराचे पोलिस आयुक्त कोण
- अमिताभ गुप्ता (२० सप्टेंबर २०२० ते १६ डिसेंबर २०२२)
- रितेश कुमार (१८ डिसेंबर २०२२ ते ३१ जानेवारी २०२४)
- अमितेश कुमार (३१ जानेवारी २०२४ पासून)
२०२२ मध्येच हगवणे बंधू यांनी पुणे शहराचे रहिवासी असल्याचे खोटे कागदपत्र दाखवत शस्त्र परवाना मिळवला. सुशील हगवणे याचा अर्ज २८ सप्टेंबर २०२२ तर वैष्णवी यांचे पती शशांक याचा अर्ज १७ ऑक्टोबर २०२२ चा आहे. त्यामुळे अपर पोलिस आयुक्त यांच्या सही शिवाय आणि पोलिस आयुक्त यांच्या मान्यतेशिवाय या दोघांना परवाने मिळूच शकत नाहीत. त्यामुळे कागदपत्रांची पडताळणी न करताच हगवणे बंधूंचा अर्ज अगदी पोलिस ठाण्यापासून ते पोलिस आयुक्त कार्यालयात पोहचेपर्यंत एकदा सुद्धा पडताळला गेला नाही का असा प्रश्न या निमित्ताने उपस्थितीत होतोय.
कुठल्या वर्षात पुणे पोलिसांनी किती परवाने दिले
वर्ष दिलेले शस्त्र परवाने रद्द केलेले शस्त्र
२०२४ २३ १११
२०२३ १८६(४२) ०
२०२२ २७९ ०
२०२१ १५२ ०
४२ हे जानेवारी २०२४ मधील आहेत
पुणे व परिसरात अनेक लष्करी आस्थापना यासह अनेक निवृत्त लष्करी व प्रशासनातील अधिकारी राहतात. शस्त्र परवान्यांमध्ये त्यांची संख्या सुद्धा आहे. त्यासोबतच काही व्यावसायिक, उद्योजक, राजकीय नेते आणि "स्टेट्स" साठी शस्त्र बाळगणारे अशा अनेकांकडे शस्त्र परवाने आहेत. पुणे जिल्ह्यात आतापर्यंत ६ हजार ८६१ लोकांना शस्त्र परवाने दिले गेले आहेत.
हगवणे बंधूंना शस्त्र परवाने दिल्याप्रकरणी जालिंदर सुपेकर यांचे नाव समोर आले आहे परंतु तो अर्ज दाखल झाल्यापासून अगदी त्यावर सही होईपर्यंत त्याच्यासोबत येणाऱ्या कागदपत्रांची पडताळणी कोणी का केली नाही का यासाठी वारजे आणि कोथरूड पोलिस ठाण्याचे तत्कालीन निरीक्षक, तत्कालीन पोलिस उपायुक्त, शस्त्र परवाना समिती मधील अधिकारी यांना "वरिष्ठांकडून" आदेश असताना त्यांनी सही करून "फाईल" पुढे ढकलली हे लवकरच समजेल.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.