Raid : खिडकीतून ₹५०० च्या नोटांचा पाऊस, सरकारी इंजिनिअरच्या घरात कोट्यवधींचं घबाड, VIDEO पाहून डोळे फिरतील

Government engineer cash raid : भुवनेश्वरमध्ये सरकारी अभियंता बैकुंठ नाथ सरांगी यांच्या घरी व्हिजिलन्स विभागाने छापा टाकला. छाप्यावेळी अभियंत्याने खिडकीतून ५०० रुपयांच्या नोटांचे बंडल फेकले. तब्बल २.१ कोटींची रोकड जप्त करण्यात आली. वाचा सविस्तर माहिती...
Government engineer cash raid
Government engineer cash raidSaam TV News
Published On

Odisha Vigilance Raid: सरकारी इंजिनिअरच्या घरात व्हिजिलन्स विभागाने (Vigilance Department) अचानक धाड टाकली. अधिकाऱ्यांना धाड टाकण्यासाठी आलेले पाहून इंजिनिअरने ५०० रूपयांच्या नोटांचे बंडल खिडकीतून खाली फेकले. याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हयारल झालाय. ओडिशामधील भुवनेश्वरमध्ये हा प्रकार घडलाय.

भुवनेश्वर येथील ग्रामीण विकास खात्यातील मुख्य अभियंता बैकुंठ नाथ सरांगी यांच्या सात ठिकाणांवर ओडिशा सतर्कता विभागाने (Vigilance Department) छापे टाकले. यावेळी तब्बल २.१ कोटी रुपये रोख रक्कम जप्त करण्यात आली. व्हिजिलन्स पथकाने सरांगी यांच्या भुवनेश्वर येथील फ्लॅटवर छापा टाकला, त्यावेळी त्यांनी ५०० रुपयांच्या नोटांचे गठ्ठे खिडकीतून बाहेर फेकण्याचा प्रयत्न केला, ज्यामुळे एकच खळबळ उडाली.

Government engineer cash raid
BEST AC Bus : मुंबई-ठाणे गर्दीचा प्रवास आता एसी बसने, तिकिट किती असणार?

सरांगी यांच्याकडे उत्पन्नापेक्षा जास्त मालमत्ता असल्याची माहिती व्हिजिलन्स विभागाला मिळाली होती. विशेष न्यायाधीशांच्या परवानगीने गुरुवारी रात्री सात ठिकाणांवर छापे टाकण्यात आले. यामध्ये सरांगी यांचे अंगुल येथील दुमजली घर, भुवनेश्वरातील डमडुमा येथील फ्लॅट आणि पिपिली येथील सिउला मालमत्ताचा समावेश होता. छाप्यादरम्यान, भुवनेश्वर येथील फ्लॅटमधून १ कोटी रुपये आणि अंगुल येथील निवासस्थानातून १.१ कोटी रुपये जप्त करण्यात आले.

Government engineer cash raid
Pune News : हडपसरमध्ये गोळीबार, मस्तीत मारलेली गोळी भावाला लागली

व्हिजिलन्स पथकाने नोटा मोजण्यासाठी मशीनचा वापर केला, त्यासाठी पाच ते सहा तास लागले. छाप्याच्या वेळी सरांगी यांनी खिडकीतून नोटांचे गठ्ठे फेकण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे परिसरात नोटांचा पाऊस पडला होता. या घटनेने स्थानिकांमध्ये आश्चर्य आणि संताप व्यक्त केला गेला. व्हिजिलन्स विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, सरांगी यांच्याकडील मालमत्तेची चौकशी सुरू आहे आणि याप्रकरणी आणखी तपास केला जाईल.

Government engineer cash raid
Thane : देशासोबत विश्वासघात, ठाण्यातून २७ वर्षांच्या इंजिनिअरला अटक!

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com