Maharashtra New Highway Saam Tv
मुंबई/पुणे

Maharashtra New Highway: महाराष्ट्राला मिळणार आणखी एक नवा महामार्ग! पुणे ते संभाजीनगर प्रवास होईल सुसाट; कसा असणार प्लान?

Maharashtra New Highway Pune To Shirur Link Chhatrapati Sambhaji Nagar: आता पुणे ते छत्रपती संभाजीनगरचा प्रवास आणखी सुसाट होणार आहे. पुणे ते शिरुर या ठिकाणी नवीन महामार्ग बांधण्यात येणार आहे.

Siddhi Hande

पुणे ते छत्रपती संभाजीनगर प्रवास सुसाट होणार

पुणे ते शिरुर या भागात सहा पदरी उन्नत महामार्ग बांधणार

मंत्रिमंडळ बैठकीत झाला निर्णय

३ वर्षात काम पूर्ण करण्याचे निर्देश

पुणे ते संभाजीनगर हा प्रवास आता आणखी सुसाट होणार आहे. राज्य सरकारने छत्रपती संभाजी नगर महामार्गावरील पुणे ते शिरुर या भागात सहा पदरी उन्नत महामार्गाला आणि चार पदरी ग्रेड रस्ते बांधकामाला परवानगी दिली आहे. मंगळवारी मंत्रिमंडळ बैठकीत याबाबात निर्णय घेण्यात आला आहे. हा सहा पदरी उन्नत महामार्ग ५३.४ किलोमीटर लांब असणार आबे.

मुंबईत झालेल्या मंत्रिमंडळ समितीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. याबाबत देवेंद्र फडणवीसांनी माहिती दिली आहे. पुणे ते शिरुर महामार्गावरील सहा पदरी उन्नत रस्ता आणि चार पदरी ग्रेड रस्त्याचे बांधकाम तीन वर्षांत पूर्ण करावे लागणार आहे. हा रस्ता वेळेत पूर्ण झाला पाहिजे आणि त्याच्या बांधकामात कोणताही विलंब होऊ नये यावर त्यांनी भर दिला आहे.

पुणे ते छत्रपती संभाजी नगर महामार्गावर पुणे आणि शिरुर या दरम्यान औद्योगिक वसाहती आहेत. यामुळे या ठिकाणी प्रचंड वाहतूक कोंडी होती. भविष्यातदेखील अजूनच वाहतूक कोंडी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे महामार्गाचे काम करण्यास विलंब करु नका, असे सांगण्यात आले आहे.

पुणे ते शिरुर यादरम्यानच्या ३५ किलोमीटरच्या उन्नत महामार्गासाठी, ७.४० किलोमीटवर ग्रेड रस्त्यासाठी (खाली रस्ता आणि वर उन्नत रस्ता आणि मेट्रो) असणार आहे. यासाठी महाराष्ट्र रेल कॉर्पोरेशन लिमिटेड आणि महाराष्ट्र राज्य पायाभूत सुविधा विकास मंडळाने समन्वय साधला पाहिजे.

छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यातील शेंद्रा औद्योगिक वसाहत आणि बिडकीन औद्योगिक वसाहत या भागातील वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी एक निर्णय घेण्यात आला आहे. बिडकीन ते ढोरेगाव या मार्गांसाठी सहा पदरी रस्त्याच्या बांधकामाला परवानगी दिली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sameer Wankhede VS Aryan Khan: समीर वानखेडेंना दिल्ली हाय कोर्टचा दणका, शाहरुखचा मुलगा आर्यनला दिलासा, काय घडलं?

हिवाळ्यात गरम पाण्यात आंघोळ केल्याने हाडे कमकुवत होतात का?

Ajit Pawar Plane Crash: ....तर असं काही घडलंच नसतं; अजित पवारांचे ड्रायव्हर श्यामराम मनवे असे का म्हणाले?

Nashik : मुंबईच्या दिशेने घोंघावत आलेलं 'लाल वादळ' वेशीवरच थांबलं!

Nails Cutting Tips: नखे कापण्याची योग्य पद्धत कोणती?

SCROLL FOR NEXT