School Holiday Today Saam Tv
मुंबई/पुणे

School Holiday: महत्त्वाची बातमी! आज राज्यातील शाळांना सुट्टी; का राहणार बंद? वाचा सविस्तर

Schoo Closed Today 5th December 2025: आज ५ डिसेंबर रोजी राज्यातील सर्व शाळा बंद राहणार आहे. राज्यात शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचं आंदोलन आहे. त्याच पार्श्वभूमीवर शाळांना सुट्टी देण्याचा निर्णय घेतला आहे.

Siddhi Hande

राज्यातील सर्व शाळांना आज सुट्टी

शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी पुण्यात करणार आंदोलन

टीईटी सक्तीविरोधात शिक्षकांचे आंदोलन

आज ५ डिसेंबरला राज्यातील शाळांना सुट्टी असणार आहे. राज्यातील शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी आंदोलन करण्याचे ठरवले आहेत. पुण्यात आज हे आंदोलन होणार आहे. याच पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे. (School Closed Today)

शिक्षकांच्या या मागण्यांसाठी आंदोलन

टीईटी संदर्भातील सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयावर पुनर्विचार याचिका दाखल करावी. शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना पूर्ववत लागू करावी. शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची भरती प्रक्रिया तात्काळ सुरू करावी. अशा विविध प्रलंबित मागण्यासाठी राज्यातील सर्व शाळा आज बंद करून सर्व जिल्हाधिकारी कार्यालयांवर शिक्षक व शिक्षकेतर संघटना समन्वय समितीच्या वतीने मोर्चा काढला जाणार आहे.

राज्यातील प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक, मुख्याध्यापक, संस्थाचालक तसेच शिक्षकेतर कर्मचारी यांच्या विविध संघटनांचा समावेश असलेल्या शिक्षक व शिक्षकेत्तर संघटना समन्वय समितीच्या बैठकीत निर्णय घेण्यात आला. शिक्षक शिक्षकेतर समन्वय समितीचे आंदोलन करण्यात आले आहे. त्याच पार्श्वभूमीवर आज राज्यातील शाळा बंद राहणार आहेत.

टीईटी परीक्षा अनिवार्य नको (TET Exam Controversy)

संचमान्यतेच्या १५ मार्च २०२४ च्या शासन निर्णयात दुरुस्ती करणे आवश्यक आहे. तसेच सर्वोच्च न्यायालयाच्या टीईटी सक्तीच्या निर्णयावर याचिका दाखल करावी. यासह विविध मागण्यांसाठी शिक्षकांचा पाठपुरावा सुरु आहे. मात्र, या मागण्यांकडे दुर्लक्ष केले जात आहे. त्यामुळेच ५ डिसेंबरला आंदोलन केले जात आहे, असं तानाजी माने, अध्यक्ष माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघ, सोलापूर यांनी सांगितले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: निवृत्त शिक्षण उपसंचालक नितीन उपासनी यांना ८ डिसेंबरपर्यंत पोलिस कोठडी

Lakhpati Didi Yojana: महिलांसाठी खास योजना! कोणत्याही व्याजाशिवाय मिळणार ५ लाखांचं कर्ज; योजनेबद्दल सविस्तर माहिती वाचा

Accident : रत्नागिरी- कोल्हापूर महामार्गावर भीषण अपघात, ५० प्रवाशांना घेऊन जाणारी खासगी बस दरीत कोसळली

Fact-Check: आता कर्मचाऱ्यांना 12 तासांची ड्युटी? आठवड्याला 72 तास काम, व्हायरल मेसेजमागचं सत्य काय?

Zodiac sign: कृष्ण प्रतिपदेचा दिवस ठरणार खास; जाणून घ्या कोणत्या राशींना मिळणार मोठा फायदा

SCROLL FOR NEXT