TET Paper Leak: टीईटी पेपरफुटी प्रकरणात मोठी कारवाई; मुख्य सूत्रधारासह १८ जणांना बेड्या, राज्यभरात रॅकेट?

TET Paper Leak Racket Busted: महाराष्ट्रातील टीईटी पेपरफुटी प्रकरणात कोल्हापूर पोलिसांनी मोठी कारवाई केलीय. पाच शिक्षक आणि मास्टरमाइंड महेश गायकवाडसह १८ जणांना अटक करण्यात आली आहे. या रॅकेटचे राज्यव्यापी नेटवर्क असल्याचा संशय आहे. त्यामुळे पुढील तपास केला जातोय.
TET Paper Leak Racket Busted:
Kolhapur Police arrest 18 accused, including teachers and mastermind Mahesh Gaikwad, in the TET paper leak racket.saam tv
Published On
Summary
  • कोल्हापूरमध्ये टीईटी पेपरफुटी रॅकेटचा मोठा भंडाफोड झालाय.

  • रॅकेटचा मुख्य सूत्रधार महेश गायकवाडला पोलिसांनी अटक केली आहे.

  • राज्यभर या रॅकेटची व्याप्ती असण्याची शक्यता आहे.

शिक्षक पात्रता परीक्षा (TET) दरम्यान कोल्हापूर (Kolhapur) जिल्ह्यात पेपरफुटीच्या मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश झाला. कागल तालुक्यातील मुरगुड पोलिसांनी केलेल्या कारवाईत पाच शिक्षकांसह एकूण १८ जणांना अटक करण्यात आलीय. दरम्यान या टोळीचा मुख्य सूत्रधार महेश गायकवाडलाही पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. दरम्यान या रॅकेटची व्याप्ती राज्यभर असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

मुरगुड पोलीस ठाण्यात पेपरफुटी प्रकरणात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. टीईटी परीक्षा राज्यातील शिक्षक भरतीसाठी अत्यंत महत्त्वाची मानली जाते. पण हीच परीक्षेत पेपर फोडणारी टोळी कोल्हापूरमध्ये सक्रिय असल्याचे उघड झाल्याने शिक्षण क्षेत्रात खळबळ उडालीय. दरम्यान गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी कागल तालुक्यातील सोनगे येथील एका फर्निचर मॉलवर छापा टाकला होता.

येथे टीईटी परीक्षेचा छायांकित पेपर विद्यार्थ्यांना ३ लाख रुपयांना विकला जात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला. पोलसांनी याप्रकरणी सुरुवातीला नऊ जणांना ताब्यात घेतलं. पुढील तपासात या रॅकेटचा व्याप वाढत गेली. आता अटक केलेल्यांची संख्या १८ वर पोहोचली आहे. अटक करण्यात आलेल्यांमध्ये कोल्हापूर जिल्ह्यातील पाच शिक्षकांचाही समावेश आहे. त्यामुळे शिक्षण विभागानेही संबंधित शिक्षकांची माहिती मागवून पुढील कारवाईची तयारी सुरू केलीय.

TET Paper Leak Racket Busted:
Maharashtra TET: महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा होणार रविवारी; CCTV कॅमेरे,फिंगर प्रिंट स्कॅनिंग, बायोमेट्रिक परीक्षा केंद्रावर तगडी व्यवस्था

राज्यभरात रॅकेट?

शनिवारी राज्यातील लाखो उमेदवारांनी टीईटी परीक्षा दिली. अनेक परीक्षा केंद्रांवर परीक्षा सुरळीत सुरू होत्या. मात्र कोल्हापूरमध्ये पेपर फोडण्याचा प्रयत्न झाला. दरम्यान याची माहिती मिळताच शिक्षण विभागासह पोलिस यंत्रणा अलर्ट झालीय. पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या आरोपींपैकी काहीजण परीक्षार्थी शिक्षक आहेत. त्यांचा या रॅकेटशी संबंध असल्याचे प्राथमिक तपासात स्पष्ट झालंय.

TET Paper Leak Racket Busted:
फोडाफोडीनंतर स्थानिक संस्थेच्या निवडणुकीत भाजपचा नवा डाव; उमेदवारीत बदल, दिग्गजांना बसणार धक्का

आरोपी सर्वजण कागल आणि राधानगरी तालुक्यातील आहेत. तर आणखी काही संशयितांची नावे समोर येण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केलीय. मुरगुड पोलीस आणि स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाने रात्रभर तपास सुरू ठेवलाय. दरम्यान या रॅकेटची व्याप्ती राज्यभर पसरली असण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केलीय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com