Maharashtra Teacher Eligibility Test:
CCTV and biometric checks arranged at Maharashtra TET exam centres for secure and fair examination.saamtv

Maharashtra TET: महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा होणार रविवारी; CCTV कॅमेरे,फिंगर प्रिंट स्कॅनिंग, बायोमेट्रिक परीक्षा केंद्रावर तगडी व्यवस्था

Maharashtra Teacher Eligibility Test: महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा रविवारी होणार आहे. राज्यातील १,४२३ केंद्रांवर ही परीक्षा घेतली जाईल. ज्यामध्ये कडक सीसीटीव्ही, फिंगरप्रिंट आणि बायोमेट्रिक पडताळणी असेल जेणेकरून बनावटपणा रोखता येईल. ४.७५ लाखांहून अधिक उमेदवार परीक्षेला बसणार आहेत.
Published on
Summary
  • TET परीक्षा २३ नोव्हेंबर रोजी घेतली जाणार आहे.

  • ४.७५ लाखांहून अधिक उमेदवार परीक्षेला बसलेत.

  • बनावट उमेदवार व गैरप्रकार रोखण्यासाठी कठोर उपाययोजना करण्यात आल्या आहेत.

सागर आव्हाड, साम प्रतिनिधी

महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा येत्या रविवार २३ नोव्हेंबर रोजी होणार आहे. राज्यभरातील ३७ जिल्हा मुख्यालयाच्या ठिकाणी १ हजार ४२३ परीक्षा केंद्रावर ही परीक्षा घेतली जाणार आहे. परीक्षा केंद्रावर कोणत्याही प्रकारचा गैरप्रकार रोखण्यासाठी परीक्षा परिषदेमार्फत उपाययोजना करण्यात आलीय. जवळपास एकूण ४ लाख ७५ हजार ६६८ उमेदवार परीक्षा देणार आहेत. बनावट उमेदवार टाळण्यासाठी काटेकोट उपाय योजना करण्यात आल्या आहेत.

Maharashtra Teacher Eligibility Test:
Nandurbar : जिल्हा परिषद शाळांना शिक्षक मिळेना; विद्यार्थी पोहोचले थेट जिल्हाधिकारी कार्यालयात

परीक्षा केंद्रवर कटेकोट उपाय योजना

राज्यातील ३७ जिल्ह्यातील ८५३ केंद्रावर १४५०० कॅमेरे बसवले आहेत. फिंगर प्रिंट स्कॅनिंग आणि फेस रिकग्निश्न यांच्या माध्यमातून बनावट उमेदवारांवर नियंत्रण ठेवण्यात येणार आहे. तर ४७०० बायोमेट्रिक उपकरणे सर्व केंद्रांवर कार्यान्वित करण्यात आली आहेत. त्याचप्रमाणे केंद्रावर सुमारे ४५०० सुरक्षारक्षक नेमण्यात आलेत. परीक्षेच्या पेपर १ साठी २ लाख ३ हजार ३३४ तर पेपर २ साठी २ लाख ७२ हजार ३३५ असे एकूण ४ लाख ७५ हजार ६६९ परीक्षार्थी प्रविष्ट होणार आहेत.

Maharashtra Teacher Eligibility Test:
CET Exam Update : विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी! CET परीक्षा वर्षातून ३ वेळा होणार, जाणून घ्या संपूर्ण माहिती

परीक्षार्थीनीची आधी ओळख पटवली जाईल त्यानंतर प्रवेश देण्यात येईल. उमेदवारांना परीक्षा दालनामध्ये मोबाईल, स्मार्ट वॉच, कॅलक्युलेटर इत्यादी इलेक्ट्रॉनिक साहित्य घेऊन जाता येणार नाही. सर्व परीक्षा दालनामध्ये, परीक्षा केंद्राच्या प्रवेशद्वारावर व केंद्र संचालकांच्या कक्षात सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात येणार आहेत.

परीक्षा केंद्रावर कोणत्याही प्रकारचा गैरप्रकार होत असल्याचे निदर्शनास आल्यास योग्य ती कारवाई करण्यात येईल. मानराज्य परीक्षा परिषदेकडून सर्व पूर्व तयारी झाली असून परीक्षेची संबंधित सर्व अधिकारी कर्मचारी यांचा एक व्हाट्सअप ग्रुप तयार करून विचारलेल्या शंकांच्या त्रुटींचे निरसन त्यात करण्यात येणार आहे, अशी माहिती परीक्षा परिषदेचे अध्यक्ष नंदकुमार बेडसे यांनी दिलीय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com