हिंगोली : शिक्षणाधिकारीच्या मनमानी कारभाराला शिक्षक, मुख्याध्यापक कंटाळत असतात. या विरोधात आवाज उठवत उपोषण देखील करत असतात. मात्र हिंगोली जिल्ह्यात चित्र जरा उलटे पाहण्यास मिळत आहे. हिंगोली जिल्हा परिषद शाळेतील मुख्याध्यापकाच्या कारभाराला कंटाळून चक्क जिल्ह्याचे प्राथमिक शिक्षणाधिकारी उपोषणाला बसणार आहेत. याबाबत त्यांनी मुख्याध्यापकाला पत्र देखील दिले आहे.
हिंगोली शहराच्या जवळ असलेल्या अंतुले नगर जिल्हा परिषद शाळेतील हा संपूर्ण प्रकार आहे. या शाळेचे मुख्याध्यापक आणि शिक्षक मंडळी शाळेतील गुणवत्ता सुधारण्यासाठी ऑपरेशन निपुण, एक पेड मा के नाम, विद्यार्थी सुरक्षा समिती अशा अनेक उपक्रमांमध्ये मागे पडल्याचे सांगत शिक्षण अधिकाऱ्यांनी हा उपोषणाचा मार्ग अवलंबला आहे. शाळेतील उपक्रम राबविण्यासाठी वेळोवेळी सूचना दिल्या लेखी पत्र दिले बैठक घेतली.
दादा भुसेंच्या बैठकीनंतर सुधारणा नाही
एवढेच काय तर खुद्द राज्याचे शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी देखील हिंगोलीत बैठक घेतली. मात्र मुख्याध्यापक ऐकत नसल्याने आपल्यावर ही वेळ आल्याचं शिक्षण अधिकारी दिग्रसकर म्हणाले आहेत. शिक्षणाधिकारी म्हणून शाळा व्यवस्थापनावर नियमानुसार कार्यवाही करून मुख्याध्यापकाला निलंबित केले. तर राज्यात शिक्षकांच्या संघटना लगेचच मोर्चा काढतात आणि त्यामुळेच आपण शासनाच्या नियमांचे पालन व्हावं; यासाठी गांधीगिरी मार्गाने हे आंदोलन करत असल्याचं शिक्षण अधिकारी दिग्रसकर म्हणाले.
मुख्याध्यापकांना दिले पत्र
येरवी जिल्ह्यात शिक्षण विभागासह प्रशासनाच्या विरोधात सर्वसामान्य नागरिक आमरण उपोषण मोर्चे आणि आंदोलन करताना पाहायला मिळतात. मात्र मराठवाड्याच्या हिंगोलीत चक्क शिक्षणाधिकारी उपोषण करत असल्याने हा राज्यभर चर्चेचा विषय बनला आहे. मात्र शिक्षणाधिकाऱ्यांच्या या उपोषणाने शाळेतील प्रश्न सुटतात का आता याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. प्राथमिक विभागाचे शिक्षणाधिकारी प्रशांत दिग्रसकर यांनी उपोषणाचे लेखी पत्र मुख्याध्यापकाला पाठवले आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.