MAHARASHTRA HEAVY RAIN UPDATE: RED ALERT FOR PUNE GHAT REGION, ORANGE ALERT IN KONKAN | IMD WEATHER FORECAST Saam Tv
मुंबई/पुणे

Rain Alert : राज्यात मुसळधार पाऊस, पुण्यासह २० जिल्ह्यांना अलर्ट जारी; वाचा तुमच्या जिल्ह्यातील हवामानाचा अंदाज

Maharashtra Weather Update News : राज्यात पुणे घाटमाथ्यासाठी रेड अलर्ट, तर कोकण, नाशिक आणि सातारा घाटमाथ्यासाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. २५ जुलैनंतर पावसाचा जोर कमी होण्याची शक्यता.

Alisha Khedekar

  • पुणे घाटमाथ्यासाठी रेड अलर्ट, तर कोकण आणि काही घाट भागांसाठी ऑरेंज अलर्ट

  • मुंबई, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि कोल्हापूर घाटमाथा येथे यलो अलर्टसह जोरदार पावसाचा अंदाज

  • २५ जुलैनंतर पावसाचा जोर कमी होण्याची शक्यता, तर २६ आणि २७ जुलै रोजी बहुतांश राज्यात ग्रीन अलर्ट

राज्यात गेले ३ दिवस पावसाने जोर धरला आहे. आज कोकण आणि घाटमाथा परिसरात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. तसेच पुणे जिल्ह्याच्या घाटमाथ्यासाठी रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. दरम्यान, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भातील अनेक भागांतही जोरदार पावसाच्या सरी सुरू आहेत. मुंबईत देखील पावसाचा जोर कायम राहणार असून पुढील काही तास अत्यंत महत्त्वाचे आहे.

हवामान विभागाच्या अंदाजानुसार, पालघर, ठाणे, रायगड, नाशिक घाटमाथा आणि सातारा घाटमाथा या भागांसाठी ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. या भागांत अतिजोरदार पाऊस, काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वाऱ्याचा वेग वाढण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. मुंबई, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि कोल्हापूर घाटमाथा येथे यलो अलर्ट जारी असून अधूनमधून जोरदार पावसाच्या सरी कोसळण्याचा अंदाज आहे.

विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रातील नंदुरबार, नाशिक, बुलडाणा, अकोला, अमरावती, वाशीम आणि यवतमाळ या जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह वादळी पावसाचा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे शेतकरी, प्रवासी आणि नागरिकांनी हवामानाचा अंदाज लक्षात घेऊन सुरक्षिततेची काळजी घ्यावी, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

दरम्यान, राज्यासाठी दिलासादायक बाब म्हणजे २५ जुलै पासून पावसाचा जोर हळूहळू कमी होण्याची शक्यता आहे. या दिवशी राज्यात कोणत्याही भागासाठी रेड किंवा ऑरेंज अलर्ट नसणार आहे. मात्र, रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग, पुणे घाटमाथा आणि सातारा घाट परिसरासाठी यलो अलर्ट कायम ठेवण्यात आला आहे. उर्वरित भागांमध्ये पावसाची तीव्रता कमी राहण्याचा अंदाज आहे.

MAHARASHTRA HEAVY RAIN UPDATE: RED ALERT FOR PUNE GHAT REGION, ORANGE ALERT IN KONKAN | IMD WEATHER FORECAST

यापुढे २६ आणि २७ जुलै रोजी हवामानात आणखी सुधारणा होण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे. या दोन्ही दिवशी राज्यातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये ग्रीन अलर्ट राहण्याचा अंदाज असून, केवळ पुणे घाट परिसरात यलो अलर्ट लागू राहू शकतो. त्यामुळे सलग काही दिवसांच्या मुसळधार पावसानंतर नागरिकांना आणि शेतकऱ्यांना काहीसा दिलासा मिळण्याची शक्यता आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Manoj Jarange : मनोज जरांगेंच्या संतापाचा उद्रेक; शिंदे-फडणवीसांचं नाव घेत दिला निर्वाणीचा इशारा

माजी उपमुख्यमंत्र्यांवर हल्ला करणारा कोण? पहिला व्हिडिओ आला समोर; फडणवीसांनी दिले चौकशीचे आदेश

Maharashtra News Live Update: मनसेच्या दणक्याने बिर्ला ओपस प्रशासन नमले; महाड MIDCतील बोर्ड मराठीत

Chandrashekhar Bawankule: माझी बायको पण कुणबी, माझ्या व्यंगावर बोलून...; जरांगेंच्या टीकेला उत्तर देताना बावनकुळे भावुक

Manjar Marathi Movie: घरभर पसारा अन् तीन मित्रांची धमाल; 'मांजर'लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला

SCROLL FOR NEXT