EPFO ने 2025-26 आर्थिक वर्षासाठी पीएफ व्याज जमा करण्याची प्रक्रिया सुरू केली
UMANG अॅप, SMS, मिस्ड कॉल आणि EPF पासबुकद्वारे व्याज तपासता येतो
व्याज जमा झाले नसल्यास पोर्टलवर ऑनलाइन तक्रार नोंदवता येते
नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावरून मिस्ड कॉल किंवा SMS पाठवूनही पीएफची माहिती मिळवता येते
तुम्ही देखील नोकरी करत असाल तर तुमच्या खात्यात PF चा व्याज जमा झाला असेलच. मात्र हा व्याज जमा झाला की नाही हे तपासण्यात अडथळे येत असतील तर ही बातमी तुमच्यासाठी. कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना (EPFO) ने आर्थिक वर्ष २०२५-२६ साठीचे व्याज पीएफ खात्यांमध्ये जमा करण्याची प्रक्रिया सुरू केली असून अनेक खातेदारांच्या खात्यात व्याजाची रक्कम जमा झाली आहे. मात्र काही कर्मचाऱ्यांना अद्याप पासबुकमध्ये व्याज जमा झाल्याचे दिसत नसल्याने त्यांच्यामध्ये संभ्रमाचे वातावरण आहे. पुढील काही स्टेप्स फॉलो करून तुम्ही तुमच्या खात्यात जमा झालेला व्याज तपासू शकता.
पीएफ खात्यातील व्याजाची माहिती जाणून घेण्यासाठी UMANG अॅपचा वापर करता येतो. सर्वप्रथम UMANG अॅप उघडा आणि त्यामधील EPFO पर्याय निवडा. त्यानंतर आपल्या UAN क्रमांकाच्या मदतीने लॉगिन करा. लॉगिन झाल्यानंतर पासबुक किंवा खात्याशी संबंधित माहिती पाहून व्याज जमा झाले आहे का हे तपासता येते.
EPFO सदस्यांना मिस्ड कॉल आणि एसएमएसद्वारेही पीएफची माहिती मिळवता येते. आपल्या रजिस्टर मोबाईल नंबरवरून 7738299899 या क्रमांकावर मिस्ड कॉल दिल्यास खात्याशी संबंधित माहिती मिळू शकते. तसेच मोबाईलच्या मेसेज बॉक्समध्ये जाऊन “EPFOHO UAN” असा संदेश टाइप करून 7738299899 या क्रमांकावर पाठवल्यास पीएफ शिल्लक आणि इतर तपशील मिळू शकतात.
काही दिवसांपूर्वी पासबुकमध्ये व्याजाची नोंद दिसली नसेल, तरी आता पुन्हा एकदा तपासून पाहणे योग्य ठरेल. कारण EPFO कडून व्याजाची रक्कम टप्प्याटप्प्याने खात्यांमध्ये जमा केली जात आहे. अधिकृत EPFO पासबुक पोर्टलवर लॉगिन करून 2025-26 आर्थिक वर्षातील नोंदी तपासाव्यात. तेथे व्याजाची एंट्री दिसू शकते.
जर सर्व तपासणीनंतरही तुमच्या पीएफ खात्यात व्याजाची रक्कम जमा झालेली दिसत नसेल, तर EPFO कडे ऑनलाइन तक्रार नोंदवता येते. EPFO च्या तक्रार निवारण पोर्टलवर जाऊन आवश्यक माहिती भरून तक्रार दाखल करता येईल. त्यानंतर संबंधित अधिकाऱ्यांकडून प्रकरणाची चौकशी करून योग्य तो निर्णय घेतला जाईल.अनेक वेळा तांत्रिक कारणांमुळे पासबुक अपडेट होण्यास काही दिवसांचा उशीर होऊ शकतो.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.