Uddhav Thackeray And Eknath Shinde Saam TV Nws Marathi
मुंबई/पुणे

Maharashtra Politics: पुण्यात मोठी राजकीय घडामोड, पहिल्यांदाच दोन्ही शिवसेना एकत्र निवडणूक लढवणार

Uddhav Thackeray And Eknath Shinde: पुण्यामध्ये आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीपूर्वी मोठी राजकीय घडामोड घडली. शिवसेना शिंदे गट आणि ठाकरे गट एकत्र निवडणूक लढवणार आहेत.

Priya More

Summary -

  • ठाकरे गट आणि शिंदे गट पुण्यात पहिल्यांदाच एकत्र

  • ठाकरे अन् शिंदे गट एकत्र निवडणूक लढवणार

  • चाकणमध्ये नगरपरिषद निवडणूक लढवत आहेत

  • मनीषा गोरे यांच्यासाठी दोन्ही शिवसेना एकत्र

रोहिदास गाडगे, पुणे

राजकीय वर्तुळातून सर्वात मोठी बातमी समोर आली आहे. पुणे जिल्ह्यात मोठी राजकीय घडामोड घडली. याठिकाणी पक्षफुटीनंतर शिवसेना पहिल्यांदाच एकत्र निवडणूक लढणार आहे. राज्यात कुठंच एकत्र न आलेली ठाकरे अन् शिंदेंची शिवसेना चाकणमध्ये एकत्र आली आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.

शिंदे शिवसेनेच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार मनिषा सुरेश गोरे यांचा अर्ज भरायला स्वतः ठाकरेंचे स्थानिक आमदार बाबाजी काळे आणि शिंदेचे आमदार शरद सोनवणे उपस्थित होते. त्यांचे एकत्रित फोटो आणि व्हिडीओ देखील समोर आले आहेत. यामुळे शिवसेना शिंदेगट आणि शिवसेना ठाकरेगट एकत्र आले असल्याची बोलले जात आहे.

खेड-आळंदीचे दिवंगत आमदार सुरेश गोरेंच्या पश्चात ही पहिली निवडणूक पार पडत आहे. त्यांच्या पत्नी नगरपरिषदेच्या नगराध्यक्ष पदी उभ्या राहिल्यात. अशाप्रसंगी राजकारण बाजूला ठेऊन दिवंगत आमदार गोरेंना आदरांजली म्हणून आम्ही केवळ नगराध्यक्ष पदासाठी मनीषा गोरेंना पाठिंबा दिलाय, असे म्त स्थानिक आमदार बाबाजी काळे यांनी व्यक्त केले. त्यामुळं ही युती म्हणता येणार नाही असे देखील सांगितले जात आहे.

उद्धव ठाकरे असो वा संपर्क प्रमुख सचिन अहिर यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत स्थानिक पातळीवर निवडणूक घेण्याच्या सूचना दिल्यात. त्यामुळे हा चाकण पुरता तो ही नगराध्यक्ष पदापुरता निर्णय आहे. तालुक्यातील राजगुरुनगर आणि आळंदीत ही आम्ही स्वबळावर लढतोय, अशी माहिती आमदार बाबाजी काळे यांनी दिली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मुंबईतील ५०० कोटींचं पालिकेचं हॉस्पिटल वादात; अंजली दमानिया यांची कठोर भूमिका, नेमकं प्रकरण काय?

BJP : पालघर साधू हत्याकांड : काशिनाथ चौधरींना आधी भाजपात प्रवेश, २४ तासांत स्थगिती

Bhakri Tips: भाकरी भाजण्यासाठी कोणता तवा वापरावा? भाकऱ्या होतील अगदी मऊ आणि लुसलुशीत

Sheikh Hasina: मोठी बातमी! शेख हसीना यांना फाशीची शिक्षा, १४०० जणांच्या हत्याप्रकरणात दोषी

कल्याणमध्ये मध्यरात्री तरूणाची दादागिरी; कोयता घेऊन धिंगाणा, गाड्या अडवून...

SCROLL FOR NEXT