Accident: पुण्यात वारकऱ्याचा अपघातात मृत्यू; देहू- आळंदी रोडवर क्रेननं चिरडलं

Pune Accident: देहू- आळंदी रोडवर भरधाव क्रेनने वारकऱ्याला चिरडले. या अपघातामध्ये वारकऱ्याचा जागीच मृत्यू झाला. वारीमध्ये सहभागी होण्यासाठी जात असताना ही घटना घडली.
Accident: पुण्यात वारकऱ्याचा अपघातात मृत्यू; देहू- आळंदी रोडवर क्रेननं चिरडलं
AccidentSaam Tv
Published On

गोपाळ मोटघरे, पुणे

पिंपरी चिंचवडमध्ये भीषण अपघातामध्ये वारकऱ्याचा मृत्यू झाला. देहू - आळंदी रोडवर अपघाताची ही घटना घडली. क्रेनने रस्त्यावरून जाणाऱ्या वारकऱ्याला चिरडलं. या अपघातामध्ये गंभीर जखमी झालेल्या वारकऱ्याचा मृत्यू झाला. तुकोबा महाराजांच्या पालखी सोहळ्यामध्ये सहभागी होण्यासाठी हा वारकरी निघाला होता. पण पालखी सोहळ्यात सहभागी होण्यापूर्वीच भयंकर घडलं आणि वारकऱ्याला मृत्यूनं गाठलं.

मिळालेल्या माहितीनुसार, पिंपरी -चिंचवड शहरातील देहू- आळंदी रोडवर वारकऱ्याचा अपघातात मृत्यू झाला. सकाळी साडेअकरा वाजताच्या सुमारास कुदळवाडीजवळ हा अपघात झाला. भरधाव क्रेनने रस्त्यावरून जाणाऱ्या वारकऱ्याला धडक दिली. या अपघातामध्ये वारकरी गभीर जखमी झाला होता. त्याला तात्काळ नजकीच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. पण उपचारादरम्यान या वारकऱ्याचा मृत्यू झाला.

Accident: पुण्यात वारकऱ्याचा अपघातात मृत्यू; देहू- आळंदी रोडवर क्रेननं चिरडलं
Pune Accident : रस्ता ओलांडताना घात झाला; भरधाव डंपरच्या धडकेत महिलेचा जागीच मृत्यू, परिसरात हळहळ

नारायण गोरावे (५६ वर्षे) असं या मृत वारकऱ्याचे नाव आहे. सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्यातील अहिरे गावचे ते रहिवासी होते. देहू- आळंदी रोडवर एका क्रेनने नारायण गोरावे यांना धडक दिली. अपघातामध्ये ते गंभीर जखमी झाले. जास्त रक्तस्राव झाल्यामुळे या वारकऱ्याचा मृत्यू झाला. या अपघातानंतर देहू-आळंदी रोडवरील मोठी वाहतूक कोंडी झाली होती. पोलिसांनी काही वेळानंतर वाहतूक सुरळीत केली.

Accident: पुण्यात वारकऱ्याचा अपघातात मृत्यू; देहू- आळंदी रोडवर क्रेननं चिरडलं
Bus Accident : दैव बलवत्तर! काळ होता पण वेळ नव्हती; प्रवाशांनी भरलेली बस विहिरीत कोसळताना थोडक्यात राहिली

आज जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांचा पालखी सोहळा प्रस्थान करत आहे. तर उद्या संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज यांचे पालखी सोहळा प्रस्थान ठेवणार आहे. त्यानिमित्ताने आळंदी आणि देहू परिसरात लाखोंच्या संख्येने वारकरी दाखल झाले आहेत. अशावेळी वाहतुकीचे नियोजन करण्यासाठी पिंपरी चिंचवड शहर पोलिसांनी चोख वाहतूक बंदोबस्त लावला आहे. तर देहू आणि आळंदी परिसरात जाणारे कित्येक रस्ते चारचाकी आणि दुचाकी वाहनांसाठी बंद करण्यात आले आहेत. असं असताना देखील आज एका वारकऱ्याला अपघातात आपला जीवे गमाव लागला आहे.

Accident: पुण्यात वारकऱ्याचा अपघातात मृत्यू; देहू- आळंदी रोडवर क्रेननं चिरडलं
Truck Accident: भरधाव कंटेनरची अ‍ॅसिड टँकरला धडक, चालकाचा जागीच मृत्यू; अपघाताचा थरारक CCTV VIDEO

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com